Advertisements

नागपूर,ता.१३ जून २०२४: जिल्ह्यातील वडधामना गावाजवहच्या चामुंडी एक्सप्लोसिव कंपनीत गुरुवारी दुपारी स्फाेट झाला.या स्फोटा चार तरुणी,एक विवाहिता व एक पुरुष अशा सहा जणांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले.या घटनेमुळे परिसरात प्रचंड तनाव निर्माण झाला असून वातावरण शोकसंतप्त झाले आहे..गावक-यांनी अमरावती-नागपूर महामार्ग रोखून धरला.
नागपूर-अमरावती महामार्गावर नागपूरपासून २५ किलोमीटर अंतरावर धामना हे गाव असून गावालगत महामार्गावरच चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा.लि.कंपनी आहे.२२ एकरात पसरलेल्या कंपनीत फटाक्यासाठी लागणारे बारुद व वाती तयार केल्या जातात.दोन शिफ्टमध्ये कंपनीत काम चालत असतं.विविध विभागात कंपनीचे कामगार काम करीत होते.पॅकेजिंग तसेस बारुदपासून तयार करण्यात आलेल्या वाती एकत्रित करण्याचे काम ज्या विभागात सुरु होते,तेथे एक महिला,५ तरुणी आणि ३ पुरुषांसह एकूण ९ जण काम करीत होते.
दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला.तो विभागच नव्हे तर आजुबाजूचा परिसरातही भीषण आग लागली.त्यामुळे अन्य विभागातील कामगार,कर्मचारी आणि अधिकारी स्फोट झालेल्या पॅकेजिंग विभागाकडे धावले.
जिवावर उदार होऊन काही जणांनी आतमध्ये होरपळून पडलेल्यांना बाहेर काढले.दरम्यान,स्फोटामुळे बसलेल्या हाद-यांनी आजुबाजुच्या गावातील गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली.अनेकांनी प्रशासन,अग्निशमन तसेस पोलिसांना फोनवरुन माहिती दिली.
अत्यंत गंभीर अवस्थेत विव्हळणा-या जखमींना तातडीने उपचार मिळावे म्हणून गावकरी वारंवार रुग्णवाहीकेसाठी फोन करीत होते.मात्र,प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.तब्बल दीड तासांनी रुग्णवाहीका पोहोचली.तोपर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला होता.त्यांचे पार्थिव व जमखींना रविनगर येथील डॉ.दंदे रुग्णालयात तसेच सेनगुप्ता रुग्णालयात नेण्यात आले.तेथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले.
चार जखमींपैकी नंतर शीतल चटप (क्षीरसागर) या विवाहितेचाही मृत्यू झाल्याचे वृत्त धामन्यात धडकले.या भीषण स्फोटाचे वृत्त धामना परिसरात आगी सारखे पसरले.शोकसंतप्त गावक-यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल,सहआयुक्त अस्वती दोरजे यांच्यासह मोठा पोलीस ताफा,दहशतवाद विरोधी पथक,बीडीडीएस,फॉरेन्सिक चमूसह विविध विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.स्फोटाच्या कारणांचा त्यांनी शोध घेतला.
तत्पूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख,माजी जि.प.अध्यक्ष सुनीता गावंडे,जि.प.सदस्या भारती पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचून जखमींसाठी मदत राबविणे सुरु केले.घटनास्थळी प्रचंड तनाव निर्माण झाला होता.आ.समीर मेघे,माजी आ.प्रकाश गजभिये यांनीही धाव घेत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.
या भीषण घटनेनंतर संतप्त कामगार व गावक-यांनी कपंनीच्या व्यवस्थापन व प्रशासनाच्या अनास्थेवर प्रचंड रोष व्यक्त केला.परिस्थिती चिघळण्याचे संकेत मिळताच मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला.
मृतकांच्या कुटूंबियांना आज प्रत्येकी २५ लाख रुपयांचा धनादेश कंपनीच्या मालकांनी दिले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
अशी आहे मृतांची नावे-
प्रांजली किसन मादरे(वय वर्ष २२)रा.धामना
वैशाली आनंद क्षीरसागर(वय वर्ष २०)रा.धामना
प्राची श्रीकांत फालके(वय वर्ष १९)रा.धामना
मोनाली शंकरराव अलोने(वय वर्ष २५)रा.धामना
पन्नालाल बंदेवार(वय वर्ष ६०)रा.सातनवरी
शितल आशिष चटप(वय वर्ष ३०)रा.सातनवरी
जखमींची नावे-
श्रद्धा वनराज पाटील(वय वर्ष २२)रा.धामना
प्रमोद चवारे(वय वर्ष २५)रा. नेरी
दानसा मरसकोल्हे(वय वर्ष २६)रा.मध्यप्रदेश
…………………
Advertisements

Advertisements

Advertisements
