फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसला आणखी एक मोठा धक्का !नामदेव ऊसेंडींचा भाजपात प्रवेश

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का !नामदेव ऊसेंडींचा भाजपात प्रवेश

Advertisements


जो पैसे देईल त्याला मिळत आहे काँग्रेसचे तिकीट!ऊसेंडीचा गंभीर आरोप

काँग्रेसच्या काळात आदिवासी भागाचा विकास नाही

राहूल गांधींचे नेतृत्व देश आणि महाराष्ट्र स्वीकारण्यास तयार नाही:बावणकुळे

नागपूर,ता.२६ मार्च २०२४ : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला आज महाराष्ट्राच्या गडचिरोलीत आणखी एक मोठा धक्का बसला असून गडचिरोली-चिमूरचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव ऊसेंडीनी आज काँग्रेसचा त्याग करुन भारतीय जनता पक्षात आपल्या अनेक कार्यकर्तांसोबत प्रवेश घेतला.प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेतला.यावेळी चिमूरचे भाजपचे आमदार बंटी भांगडीया तसेच भाजप ओबीसी सेलेचे अध्यक्ष आशिष देशमुख मंचावर उपस्थित हाेते.

याप्रसंगी उसेंडींनी काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले.काँग्रेस पक्ष व प्रदेश महासचिव यांच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती असे सांगत मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार असल्याने पक्षाकडे गडचिरोली-चिमुर लोकसभेची उमेदवारी मागितली होती मात्र,पक्षाने बाहेरचा उमेदवार लादला.स्थानिक पातळीवर लाखोच्या संख्येने मी आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षासोबत जोडले .माझे काम बघून मला लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र,स्थानिक व राज्य पातळीवरील काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लाेकसभा क्षेत्राबाहेरील उमदेवार गडचिरोली-चिमुरसाठी दिला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.काँग्रेस पक्ष हा पैसाने उमेदवारी देत असल्याचा गंभीर आरोप याप्रसंगी त्यांनी केला.

घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील स्थानिक आदिवासींचे प्रश्‍न व समस्या लोकसभेत सोडवले जावेत यासाठी हा मतदारसंघ आदिवासींसाठी आरक्षीत ठेवण्यात आला आहे.मात्र,या उद्देश्‍याला छेद देऊन क्षेत्राबाहेरील व्यक्तीला काँग्रेसने उमेदवारी दिली व स्थानिक नेतृत्वावर अन्याय केल्याचा आरोप उसेंडी यांनी केला.

माझ्यासारख्या पक्षासाठी दिवस-रात्र झटणा-या कार्यकर्त्याला काँग्रेसचे स्थानिक व राज्य पातळीवरील नेतृत्व फक्त गटबाजीने ग्रस्त असल्यानो,अश्‍या पक्षाकडून न्याय मिळू शकत नाही,असा आरोप त्यांनी केला.या क्षेत्रातील माझ्या समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश घेतला असल्याचे उसेंडी यांनी सांगितले.आज ही आमच्या भागात रुग्णाला दुचाकीवरुन अनेक किलोमीटर दूर असणा-या दवाखान्यात घेऊन जावे लागते,अशी तक्रार त्यांनी मांडली.

याप्रसंगी बोलताना बावणकुळे म्हणाले,की विकसित भारतच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण,उमरेडचे राजू पारवे तसेच आता गडचिरोलीचे मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी भाजपशी जुळले आहेत.काँग्रेस पक्षाला अश्‍या नेत्यांचा सांभाळ करता आला नाही ज्यांनी पक्षासाठी खूप काही केले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कधीही अशोक चव्हाण किवा उसेंडीसारख्या नेत्यांचा सन्मान केला नाही,असा आरोप बावणकुळे यांनी केला.

भाजप हा काँग्रेसमुक्त भारतचे स्वप्न बघत असताना आता ‘काँग्रेसयुक्त भाजपा’नाही होत आहे का?असा प्रश्‍न विचारला असता,आम्ही संन्यासी नाही,आमचा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे,असे ते म्हणाले.उसेंडीसारख्या नेत्याने आपले संपूर्ण जीवन गडचिरोलीत काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अपर्ण केले.त्यांनी आदिवासी समाजासाठी खूप काम केले आहे.अश्‍या नेत्याला भाजप का पक्षात नाही घेणार?असा सवाल बावणकुळे यांनी विचारला.

काँग्रेसने आता आत्मपरिक्षण केले पाहिजे,असा टोला हाणत राहूल गांधी हे २०४७ पर्यंत देशाचे पंतप्रधान बनू शकत नाही असे ते म्हणाले.राहूल गांधीचे नेतृत्व देश तसेच महाराष्ट्रमध्ये स्वीकार्य नाही,असे बावणकुळे यांनी सांगितले.राहूल गांधी हे ओबीसीचा अपमान करतात.आदिवासींचा अपमान करतात,स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात,ते कधीही विकसित भारताची गोष्ट करत नाही फक्त मोदींना शिव्या देण्याचे काम करतात.त्यामुळे भाजपमध्ये इतर पक्षाचे जे कोणी येत आहेत त्यांचा मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास असल्याने ते भाजपात येत असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.

इतर पक्षातून भाजपात अनेक नेते प्रवेश घेत असल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा निरर्थक असल्याचे बावणकुळे म्हणाले.भाजपात भरपूर ‘स्पेस’आहे.सर्वांना समान सन्मान मिळतो.फडणवी,गडकरी या सारख्या नेत्यांमध्ये सर्व समाजाला सोबत नेण्याची भावना आहे.अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी यावर छेडले असता,अशोक चव्हाण हे कतृत्ववान नेते आहेत त्या स्तराच्या नेत्याला राज्यसभेत नाही पाठवणार तर कुठे पाठवणार?असा सवाल बावणकुळे यांनी केला.आमच्या पक्षात कोणीही नवा-जुना कार्यकर्ता किवा नेता नसतो.डॉ.उसेंडी हे स्वत: डॉक्टर असून त्यांनी गडचिरोली भागात आदिवासींची सेवा केली आहे.त्यांचा मुलगा देखील डॉक्टर झाला आहे.अशी माणसे जी समाजासाठी हितकारी असतात अश्‍या लोकांची काँग्रेस किंमत करीत नसल्याची टिका याप्रसंगी बावणकुळे यांनी केली.

अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार असल्याचे उत्तर त्यांनी एका प्रश्‍नाच्या संदर्भात दिले.याशिवाय नाशिकसाठी फडणवीस,अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

उद्या सकाळी गडकरी हे उमेदवारी अर्ज भरणार असून त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महायुतीचे प्रफूल्ल पटेल,जोगेंद्र कवाडे,सुलेखा कुंभारे आदी महारॅलीसाठी उपस्थित राहणार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.
…………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या