फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसावनेरच्या विकासासाठी जनप्रतिनिधी बदला: रणजीत देशमुख

सावनेरच्या विकासासाठी जनप्रतिनिधी बदला: रणजीत देशमुख

Advertisements

सावनेरमध्ये रणजीत देशमुख यांचा ‘अभिष्टचिंतन’ सोहळा

आशिष देशमुख यांनी सावनेरमधून लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी

२९ मे २०२३: आज सावनेरचा विकास खुंटला आहे. राजकीय स्वार्थासाठी जनप्रतिनिधी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. आमदार हा समाजासाठी स्वत:ला झोकून देणारा असावा. परंतु, विधानसभेत या क्षेत्राचा आवाज कमजोर झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आता लोकांना बदल हवा आहे. नवे नेतृत्व जनतेला न्याय मिळवून देऊ शकेल. सावनेरमध्ये गुन्हेगारी, बेरोजगारी, शेतकरी समस्या वाढली आहे. नवे उद्योग यावेत, यासाठी विद्यमान आमदाराने काहीच प्रयत्न केला नाही. आमदारच रेतीच्या व्यवसायात गुंतला असेल तर जनतेने कोणाकडे जावे, हा मोठा प्रश्न आहे. सर्वांनी ठरवल्यास जनप्रतिनिधी बदलणे सहज शक्य आहे आणि जनतेला आता बदल हवा आहे. तेव्हा, सावनेरचा जनप्रतिनिधी बदला आणि सावनेर मध्ये परिवर्तन घडवा, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री रणजीत देशमुख यांनी केले.

सावनेर विधानसभा क्षेत्राचे २-३ दशकापेक्षा जास्त प्रतिनिधित्व करणारे विकास महर्षी, रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दिनांक २९ मे २०२३ ला अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेटी (सुर्ला) तह. सावनेर येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित आला होता. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. मानपत्र, हार, शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक धोटे (माजी जि.प. अध्यक्ष, नागपूर) यांनी म्हटले,की रणजीत देशमुख यांनी त्याकाळी सावनेरचा कायापालट केला. रणजीत देशमुख हे खरे विकास महर्षी आहेत. त्यांनी जनकल्याणासाठी गाव-गाव पिंजून काढले आणि जनतेचे प्रश्न निकाली लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेच्या सुख-दु:खात सामील झाले. समाजाच्या कल्याणासाठी ते झटले. ते ग्रामविकासाचे खरे शिल्पकार आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे रणजीतबाबू देशमुख म्हणजे विकासाची गुरुकिल्ली आहे. सावनेरमध्ये आज काही नवीन कामे झाल्याचे दिसत नाही. विद्यमान आमदाराचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. सावनेरच्या कायापालटासाठी डॉ. आशिष देशमुख यांच्यासारखा धडाडीचा आमदार असावा. रणजीत देशमुख यांच्या छत्रछायेत राजकारणात आपली वेगळी छाप उमटवलेले डॉ. आशिष देशमुख यांच्याकडून मोठी आशा आहे.

रणजीत देशमुख हे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्रात अमुलाग्र आणि परिणामकारक बदल हा विकास कामांच्या माध्यमातून केला. ग्रामविकास, सिंचन, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, औद्योगीकरण, रोजगार निर्मिती, रस्ते विकास, सांस्कृतिक इत्यादी ज्यामुळे सावनेर क्षेत्राची प्रतिष्ठा राज्यातच नव्हे तर देशातही उन्नत करण्यासाठी त्यांनी अतुलनीय आणि अथक प्रयत्नांची पराकाष्टा केली, हे सर्वश्रुतच आहे. अशा या कर्तुत्ववान लोकनेत्याचा वाढदिवस सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने साजरा करण्यात आल्यामुळे एक प्रकारे जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

श्रीमती रूपाताई देशमुख आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आशिष देशमुख यांनी सावनेरमधून लढावे, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

रमेश मानकर, चंद्रशेखर बरेठीया, प्रफुल्ल मोहोटे, बाबासाहेब वासाडे आदि मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि रणजीत देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेकडो नागरिक या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन समारंभास उपस्थित होते.

सत्कार समितीमध्ये शांतारामजी गावंडे अध्यक्ष, अॅड. अरविंद लोधी सचिव, कोमलचंद राऊत उपाध्यक्ष, अॅड. चंद्रशेखर बरेठिया संयोजक, बाबा महाजन सहसचिव, अॅड. शैलेश जैन सहसंयोजक आणि सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या