फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदैनिकांनी छापले चुकीचे वृत्त!विद्यापीठाकडून एकही झाड तोडले गेले नाही

दैनिकांनी छापले चुकीचे वृत्त!विद्यापीठाकडून एकही झाड तोडले गेले नाही

Advertisements

विद्यापीठाचा दावा:विद्यापीठाच्या परिसरात पाच हजार झाडांचे केले रोपण व संवर्धन

सुबाभळींच्या झुडपांविषयी १९ ऑक्टोबर रोजीच दिले होते मनपाला पत्र

नागपूर,ता.२८ ऑक्टोबर २०२२: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात,देशातील सर्वात मोठा वैज्ञानिक सोहळा ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या १०८ व्या परिषदेचे आयोजन रातुम विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात येत्या जानेवारी महिन्यात होणार आहे,येथील शैक्षणिक विभागाच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे.या सोहळ्यासाठी अनेक हॅरिटेज वृक्षे विद्यापीठाच्या उद्यान विभागाद्वारे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली असल्याचे वृत्त काल एका सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकात छापून आले,त्या पाठोपाठ आज अनेक मराठी वृत्तपत्रांनी देखील विद्यापीठाकडे कोणतीही शहनिशा न करता वृत्त छापल्यामुळे, नागरिकांमध्ये संतापाची भावना उमटली. मात्र, या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून वृत्तपत्रांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केल्याची खंत विद्यापीठाच्या प्रशासनातर्फे खास ’सत्ताधीश’कडे व्यक्त करण्यात आली.

कोणतेही वृत्त प्रसिद्ध करताना ज्यांच्या संबंधी वृत्त प्रसिद्ध केले जात आहे त्यांची देखील बाजू वृत्तामध्ये उमटणे ही नैतिक बाब असताना, नागपूरातील अनेक दैनिकांनी फक्त एकच बाजू प्रसिद्ध केली.विद्यापीठाकडून या सोहळ्यासाठी एकाही वृक्षाची कत्तल झाली नसून नागपूर महानगरपालिकेकडे दिनांक १९ ऑक्टोबर रोजीच पत्र पाठवून या ठिकाणची केवळ झुडपे व मोठमोठ्या झुडपांमधील वारा व पाऊसामुळे उन्मळून पडलेली सुबाभूळची झाडे जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने उचलण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

जमीनीपासून अर्धवट उन्मळून पडलेले सुबाभूळ,बोर व बाभळीचे लहान झाडांचे झुडपांमध्ये(Bushes)रुपांतर झाले असून त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरात सरपटणा-या विषारी प्राण्यांचे ब-याच प्रमाणात वास्तव्य वाढलेले असल्याने या शैक्षणिक परिसरात सातत्याने वावरत असणारे प्राध्यापक,विद्यार्थी व इतर नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.जंगली गवत व झुडपांमुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आग लागत असल्यामुळे विद्यापीठातील विभागाच्या इमारतींना देखील धोका संभवू शकतो व यामुळे आर्थिक नुकसान होण्याची देखील दाट शक्यता असल्याचे निवेदनात उल्लेखल्या गेले,एवढंच नव्हे तर अश्‍या या जंगली झुडपांमुळे इतर चंागल्या प्रजातीच्या झाडांच्या,वनस्पतींच्या वाढीला देखील नुकसान पोहाेचत असल्याचे ठलकपणे उल्लेखित केल्या गेले.

याच अनुषंगाने विद्यापीठाच्या परिसरातील सुबाभूळ,बाेरी,बाभळीची अंदाजे ५ ते ८ फूट उंचीची झुडपे काढण्याचे काम सुरु असून सपाटीकरणाचे काम सुरु असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

इंग्रजी माध्यमाच्या त्या दैनिकात जो लाकडांचा ढिग प्रसिद्ध झाला आहे तो देखील उन्मळून पडलेल्या सुबाभूळचा असल्याचा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला.विद्यापीठावर कोणतीही शहनिशा न करता आरोप करण्यापूर्वी विद्यापीठाच्या सुभेदार हॉल जवळील परिसरात मनपाच्या सहकार्याने पाच हजार झाडे लावण्यात आली असून तीन वर्षांपर्यंत मनपानेच त्यांचे संगोपन व संवर्धन ही केले असल्याने पर्यावरणस्नेही विद्यापीठावर बिनबुडाचे आरोप प्रसिद्ध करने योग्य नव्हते,अशी खंत आता व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाची जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत ही हॅरिटेजमध्ये येते.याच परिसरात इंडोर स्टेडियम करण्याचे प्रस्तावित होते मात्र विद्यापीठाने स्टेडियम न उभारता या परिसरात पाच हजार वृक्षरोपण करुन या परिसरात घनदाट वन साकारले.या इंडोर स्टेडियमसाठी या ठिकाणची एकूण २४३ वृक्षांचा बळी गेला असता,परिणामी विद्यापीठातर्फे असा कोणताही प्रकल्प राबविला जात नाही ज्यात वृक्षांचा बळी जाईल.

विद्यापीठ परिसरातील फक्त बुशेस कापण्यात आली.जी रोपटे चार ते पाच फूटांची वाढली असते त्या झुडपांना कापण्यात आले असून ती रोपटे सुबाभूळची होती.नियमानुसार १० ते १५ सेंटीमीटरपर्यंतची उंचीची झाडेच ही वृक्ष या श्रेणीत गणल्या जातात.सुबाभूळ ही अशी वृक्षे आहेत ज्यांना पाण्याची गरज भासत नाही व जी वेगाने वाढत जातात.मात्र तेवढीच ती कमकुवत देखील असतात त्यामुळेच ती लवकरच उन्मळूनही पडत असतात,अशी माहिती विद्यापीठाच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली.

ज्या सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या वार्ताहराने हे वृत्त छापले त्यांना देखील आम्ही परिसरातील कापण्यात आलेली झुडपे, व सुबाभूळ,बोरीची उन्मळून पडलेल्या ५ ते ८ फूट उंचीच्या वृक्षांची तसेच जंगली गवत कापत असल्याची माहिती दिली व छायाचित्रे ही दाखवली मात्र त्यांनी एकतर्फीच वृत्त प्रसिद्ध केले,जे कदापि योग्य नव्हते,असा ही आक्षेप विद्यापीठ प्रशासनाकडून आता घेतला जात आहे.

या संबंधी मनपाच्या उद्यान विभागाचे अधिक्षक अमोल चोरपगार यांच्याकडे विचारणा केली असता सायंकाळी सात वाजता पर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्याची माहिती प्राप्त होणार असल्याची माहिती त्यांनी दिली मात्र यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या