
ते बोलले आणि त्यांनी जिंकलं…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत तूफान फटकेबाजी
‘भावूक’ क्षण…..
विश्वास प्रस्तावार आघाडीला १०० मतेही दुरापस्त:१६४ विरुद्ध ९९ मतांनी युती सरकारचा विजय
पवार जे बोलतात त्याच्या विरुद्धच घडतं!
राज्य-केंद्र सरकार एकत्र आले तर राज्याचा वेगाने विकास:बाळासाहेबांच्या शब्दासाठीच आघाडीतून बाहेर
बांगर आले ख-या शिवसेनेत:गोगावलेंच्या व्हिपचे उल्लंघन:ठाकरे गटातील आमदारांवर होणार कारवाई
आषाढी एकादशीची पूजा आता एकनाथांच्या हस्ते:आघाडीत शिवसेनेच्या आमदारांची घूसमट
अजित पवारांची नगरविकास खात्यातही लुडबूड:जयंत पाटील शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला देत होते बळ
भाजप-सेना युती जिंगणार २०२४ मध्ये २०० जागा
अमरावतीच्या घटनेवर यंत्रणा अलर्ट
नागपूर,ता.४ जुलै २०२२: हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेच शब्द होते ‘मी नसेल तेव्हा शिवसेनेची काँग्रेस झाली असेल!’बाळासाहेबांच्या याच शब्दांमुळे व शिवसेनेची काँग्रेस न बनू देण्यासाठी शिवसेनेचे ३९ आमदार महाविकासआघाडी सरकार मधून बाहेर पडले आणि ज्यांच्याशी त्यांची नैसर्गिक युती होती त्या भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युतीचे सरकार महाराष्ट्रात आणले असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्यानंतर आभार प्रदर्शन चर्चेला उत्तर देताना केले.
युती सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी हा विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकला.आपल्या भाषणात त्यांनी राजकारण आणि राजकीय नेत्यांवर चौफेर फटकेबाजी करीत सभागृहाचे मन जिंकले.आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच त्यांनी शहीद होईल पण शिवसेना संपू देणार नाही असे सांगून पांडूरंगाने आषाढी एकादशीला एकनाथाला बोलावले असल्याचा भक्तीभाव व्यक्त केला.आपल्या भाषणाची सुरवता त्यांनी सर्व दैवतांचे स्मरण करुन बाळासाहेब ठाकरे व आंनद दिघे यांच्या स्मृतींना वंदन केले.
काही लोकांनी माझा ‘बाप’काढला मात्र माझ्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला हे मात्र ते विसरले होते,असे सांगताना ते अतिशय भावूक झाले होते.महत् प्रयत्साने त्यांनी अश्रू आवरले.अनेक वेळा त्यांनी सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण केला.विरोधकांवर खोचक चिमटेही काढले.शिंदे यांचे भाषण आज सर्व समाज माध्यमांवर ट्रेंड होत होते.महाराष्ट्रातच नव्हे तर जगातील मराठी भाषिक वर्ग यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सर्वाधिक पसंदी दर्शवली.
आपल्या भाषणात त्यांनी संजय राऊतांची शाळा ही घेतली.गेल्या १५ दिवसांपासून एवढा मोठ्या संख्येने आमदारांनी माझ्यावर विश्वास ठेऊन फार मोठे धाडस केले असल्याचे ते म्हणाले.मला तर आजही विश्वास बसत नाही मी या सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय.राजकारणात विरोधक हे नेहमी विरोधी पक्षाकडून सत्ताधारी होण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र आम्ही तर सत्ताधारी असूनही अनेक मंत्र्यांसह आघाडी सरकारकडून बाहेर पडलो.या ऐतिहासिक घटनेची फक्त भारतच नव्हे तर फडणवीस यांच्या म्हणन्याप्रमाणे जगातील ३३ देशांनी नोंद घेतली आहे.
एकीकडे बलाढ्य अशी सत्ता,नेते,मंत्री,यंत्रणा व दूसरीकडे बाळासाहेब व दिघे साहेबांचा छोटासा सैनिक,या सैनिकावर ४० शिवसेनेचे आमदार व १० अपक्षांनी प्रचंड विश्वास ठेवला व एकानीही विचारलं नाही,कुठे चाललोय,कशासाठी चाललोय,किती दिवस लागतील?ज्या दिवशी विधान परिषदेचे मतदान होते,त्या दिवशी माझ्याशी जी वागणूक झाली त्याचे साक्षीदार या बाजूचे तसेच त्या बाजूचे आमदारही साक्षीदार असल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.ही बाळासाहेबांचीच शिकवण आहे,आपल्याविरुद्ध अन्यायासाठी बंड असेल उठाव असेल ते करा!त्यामुळेच मला काय झाले माहीती नाही,माझे फाेन धडाधडा सुरु झाले आणि कोणत्याही आमदारांनी मला काहीही न विचारला माझ्या सोबत आले.
त्याच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही मला फोन आलेत,कुठे चालले,केव्हा येणार,माझे हेच उत्तर होते,मला माहिती नाही….!याही वेळेस एकाही आमदारांनी मला मुख्यमंत्र्यांशी भेटून मग पुढे जाऊ या असे सांगितले नाही.हा त्यांच्या मनाचा मोठेपणा,हा त्यांचा विश्वास आहे त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री या सर्व घडमोडीला ‘एका दिवसाचा कार्यक्रम ’असे जे म्हणतात ते सपशेल चुकीचे आहे.
हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही,सुनील प्रभूंना देखील माहिती आहे कस माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता.त्यामुळेच मी ठरवलं जे काही होईल ते होऊ देत,लढून शहीद झालो तरी चालेल तरी आता माघार नाही.शिवसेसना वाचवण्यासाठी एकटा शहीद होईल पण बाकी सगळे वाचतील.माझ्या आमदारांना मी हाच विश्वास दिला होता ज्या दिवशी तुमच्या मतदारसंघात तुमचे नुकसान होईल असे जेव्हा मला वाटेल त्या दिवशी मी राजकारणातून निवृत्त होईल.पुन्हा शेतीकडे वळेल,माझा गोंडस नातू आहे,तो तर फूल टाईमपास आहे,त्याच्यासोबत वेळ घालवले.
ही काही छोटी मोठी घटना नाही,साधा ग्रामपंचायत सदस्य,नगरसेवक देखील या पक्षातून त्या पक्षात जाण्याची हिंमत करीत नाही.मग हे का झालं?कशासाठी झालं?याच्या मूळाशी जाऊन कारण शोधल्याच गेले नाही.माझ्याकडे माणसे पाठवली चर्चेसाठी आणि लगेच दूसरीकडे मला गटनेता पदावरुन काढून टाकण्यात आलं.माझी बदनामी करण्यात आली,माझ्यासाठी ‘गद्दार’ शब्द वापरण्यात आले.पुतळे जाळायला लावायचे,घरावर दगडफेक करायला लावायचे,एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारणारा अजून तरी पैदा झाला नसल्याचा उघड आव्हान त्यांनी दिले.
ज्याप्रमाणे मधुमाश्यांचं मोहोळ उठतो त्याप्रमाणे माझ्यासाठी जीवावर उदार होणारे शिवसैनिक मी तयार केले आहेत.गेल्या ३५ वर्षांपासून मी पक्षासाठी जीवाचं रान केलं आहे,रक्ताचं पाणी केलं,मी १७ वर्षांचा होतो त्याचवेळी बाळासाहेबांच्या विचारांनी मला वेडं केलं होतं,आणि मी शिवसैनिक झालो.एका कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघेंशी भेट झाली आणि पुढची दिशा गवसली.वयाच्या १८ व्या वर्षीच मी शाखाप्रमुख झालो.मला पाच वर्षांपूर्वीच नगरसेवकाचे पद मिळणार होते मात्र युतीमध्ये भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली.मला पद नव्हे तर शाखा महत्वाची वाटत होती.
९७ मध्ये मी नगरसेवक झालो.मी कधीही मागे वळून पाहिले नाही,कुटूंबाचा,घरचा विचार केला नाही मात्र तरीही आमचे ‘बाप’काढले!कोणी रेडा म्हणाला कोणी वराह म्हणाले.कोणी प्रेतं म्हणाले,कोणी पोस्टमार्टन म्हणाले,कोणी बळी द्यायचे म्हणाले.आमच्यासोबत महिला आमदार होत्या त्यांनाही ‘वेश्या‘म्हणेपर्यंत त्यांची मजल गेली!
मी शांत आहे,मात्र जेव्हा अन्याय होतो त्यावेळी मला शांत राहणे जमत नाही.माझं काम केसरकरांनी हलकं केलं.त्यांच्या अश्या भाषेला,आरोपांना उत्तर केसरकरांनीच प्रसार-प्रचार माध्यमातून दिलं.माझा ‘बाप’काढण्यात आला.माझे वडील जिवंत आहेत.माझी आई गेली मात्र एकदा मी गावी गेलो असता उद्धव ठाकरेंनी मला फोन केला तेव्हा माझ्या आईशी देखील ते बोललेत,आई उद्धव ठाकरेंना म्हणाली ‘माझ्या बाळाला सांभाळा’उद्धव ठाकरे म्हणाले,एवढा मोठा झाला तरी आईसाठीच बाळच आहेस का?माझे वडील खूप कष्ट करुन पुढे आलेत.कष्ट करुन त्यांनी माझे पालन पोषण केले.ते जेव्हा घरी यायचे मी शाळेत असायचो मी घरी यायचाे तेव्हा ते कामावर असायचे.आमची भेटच दुरापस्त होती.हीच परिस्थिती माझ्या मुलासोबत श्रीकांत सोबत माझी झाली.पक्षाच्या कामासाठी मी माझ्या मुलालाही वेळ देऊ शकलो नाही.मी संघटनेला वेळ दिला,पक्षाला वेळ दिला,मी शिवसैनिक हेच माझं कुटूंब मानलं.
माझ्या आयुष्यात जो दु:खद प्रसंग आला,माझी दोन मुले जेव्हा माझ्या डोळ्यासमोर देवाघरी गेली…त्या वेळेस मला आनंद दिघेंही मानसिक आधार दिला.पुन्हा पक्ष कार्यात आणले.माझं कुटुंब उधवस्त झालं होतं.कशासाठी जगायचं?कोणासाठी जगायचं?मात्र एक,दोनदा नव्हे तर दिघे साहेब माझ्या घरी पाच वेळा आलेत.एकदा रात्री नाक्याजवळ बोलावून खांद्यावर हात ठेऊन म्हणालेत,तुला तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसावेच लागलीत,तुला दुस-यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे आहेत,त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊच नये यासाठी प्रयत्न करावे लागतील,तुला स्वत:साठी नाही तर समाजासाठी जगायचं आहे.
बाळासाहेब आणि दिघे साहेब माझं दैवत होतं,मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही आणि त्यांनी मला सभागृह नेता बनवले.यानंतर मी मागे वळून पाहीले नाही.जितेंद आव्हाड दुस-या पक्षात होते तरी त्यांना माहिती होतं हा एकनाथ शिंदे वेड्यासारखा कामाला लागला आहे.मनतातील माझं दालन रात्री ११-११ वाजेपर्यंत सुरु असायचं.मी खूप परिश्रम घेतले.त्या वेळी लेडीज बारचा राज्यात सुळसुळात होता.प्रचंड प्रमाणात पैशांची उधळण चालली होती. आया बहीणींची इज्जत थांबवू शकत नाही तर महीला आम्हाला शिव्या घालायच्या,तुमचा उपयोग काय?१६ लेडीज बार मी स्वत: तोडलेत.माझ्यावर १०० पेक्षा जास्त पोलिस केसेस आहेत.
त्यावेळी मुंबईत गँगवॉरही सुरु होतं.त्यांच्याही टार्गेटवर मी होतो.दिघेंनी एकदा त्यांच्या चार-पाच सदस्यांना बोलावले आणि विचारलं ’ये क्या चल रहा है?’एकनाथला कुछ हो गया तो देखना और सुधर जाओ’दिघेंच्या फक्त एवढ्या सांगण्यावरुन माझा विषय त्यांच्या लेखी संपला.आंदोलनात तर माझं आयुष्य खर्ची पडले पण मी शिवसेना वाढवली.एमएससीबी असो,तेल असो किवा साखरेचे आंदोलन असाे,माझ्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिणामांचा विचार केला नाही.
जेव्हा आनंद दिघेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी कोलमडून गेलो मात्र माझ्या लक्षात आलं आता ही कोडमडून पडण्याची वेळ नाही कारण कार्यकर्ते पेटून उठले होते.रुग्णालयच पेटून देणार होते. २०० रुग्णांचा जीव टांगणीला होता.महत प्रयासाने मी दिघेंचा पार्थिव पोलिसांच्या व्हॅनमध्ये घेऊन बाहेर पडलो तेव्हा ही गर्दी पाठोपाठ चालू लागली,अन्यथा सिलेंडच्या स्फोटातून रुग्णालयाच उधवस्त झालं असतं.हा कार्यकर्त्यांचा उद्रेग होता.संपूर्ण रुग्णालयाच बेचिराख करुन टाकण्यात आलं होतं.आमचा बाप मेला,आम्ही निराधार झाल्याची ती शिवसैनिकांची भावना होती.१५० कार्यकर्त्यांवर पोलिस कारवाई झाली.जाणीवपूर्वक कोणी केलं नाही,हे प्रेमापोटी झालं आहे,दिघेंना देव मानित होती लोकं.
त्यावेळी विरोधकांना वाटलं,ठाण्यातली शिवसेना संपून जाईल पण दिघेंच्या पुण्याईनेच आजही ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका,नगरपंयायतींवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत आहे.यानंतर मी आमदार झालो,मंत्री झालो, फडणवीस यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
अजित पवार जे म्हणाले की समृद्धि महामार्गासारखं एमएसआरडीचं खातं दिलं ते अडगळीत पडलेलं नव्हतं तर ते आव्हानात्मक खांत होतं आणि खातं देण्याचं काम फडणवीसांचं नव्हतं,तरीही त्यांनी जे खातं दिलं ते बुडीत झालं होतं मात्र आज समृद्धि महामार्ग हा राज्याच्या विकासाचा एक महत्वाचा प्रकल्प झाला आहे.मी ते आव्हान स्वीकारलं.हे गेम चेंजर प्रकल्प होता.माझेच पुतळे लोकं फासावर चढवायचे.एकदा तर समृद्धि महामार्गाच्या कामानिमित्त जाताना आमचं विमान ढगात हेलकावे खाऊ लागले.मोपलवार हे सोबत होते,ते तर देवाचाच ध्यास करीत बसले होते.आमच्या पायलटने विमान सरळ ढगात घूसवून दिले होते.
पावसळ्यात बुलढाण्याला जाताना ही घटना घडली.मी स्वत:साक्षीदार म्हणून सही केली.आमच्या बाजूला येणारे विमान अहमदाबादला गेले आणि लॅण्ड झाले मात्र आमचा सरदार पायलट घूसला ढगामध्ये.आमचा कार्यक्रमच त्या दिवशी होणार होता.दहा-दहा,पंधरा-पंधरा फूट विमान वर उसळत होतं.खाली उतरल्यानंतर तो पायलट आम्हाला विजयाची खूण दाखवत होता!
आज समृद्धि महामार्गामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे.फडणवीसांचे शिंदेंनी आभार मानले समृद्धि महामार्गाचे काम दिल्याबद्दल.शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद ही देणार होते,बरोबर आहे?अशी विचारणा त्यांनी फडणवीसांना करताच,फडणवीसांनी मानेनेच हसून होकार दिला.भिवंडीच्या कार्यक्रमात गडकरी हे देखील आले होते त्या कार्यक्रमात फडणवीस मला म्हणाले,आता एक चांगली जवाबदारी तुम्हाला भेटेल!मी काहीच प्रतिसाद दिला नाही कारण मला माहिती होतं,ते पद घेणारच नाही कारण मला ते पद द्यावं लागणार आहे म्हणून!अश्य शब्दात त्यांनी शिवसेना प्रमुखांची फिरकी घेतली.




आमचे चॅनल subscribe करा
