फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजसंजय राऊत उवाच.....

संजय राऊत उवाच…..

Advertisements

गुवाहाटी से आएँगी 40 लाशें': संजय राउत ने कामाख्या मंदिर व छठ का किया अपमान

केसरकर यांच्या ट्टीटमध्ये बंडासाठी राऊतांवरच खापर

नागपूर,ता.२७ जून २०२२: बंडखाेर आमदार दिपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे व इतर अामदारांच्या बंडखाेरी मागील विस्तृत भूमिका ट्टीटरवर विशद करताना शिवनेतेचे नेते,खासदार व महाविकासआघाडीचे ‘शिल्पकार‘संजय राऊतांवर बरीच आगपाखड केली .आपल्या तीन पानी जाहीर पत्रात केसरकर यांनी शिवसेना आमदारांचे हे बंड ‘हिंदुत्वाच्या राक्षणासाठी’असल्याचे सांगून हे बंड नव्हे तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाच लढा असल्याचे विशद केले.

या ट्टिटररुपी पत्रात त्यांनी ‘आम्ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे,शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो तर घाण ठरलो,डुकरं ठरलो,आमच्या भरवश्‍यावर राज्यसभेत बसणारे व रोज विखारी भाषा करणा-यांना आता आमच्या मृतदहेांची आस लागली असल्याचा टोला त्यांनी राऊतांवर हाणला.(कालच रविवारी राऊतांनी गोहावटी येथून मुंबईत ४० प्रेते येणार व मुंबईत त्यांचे सरळ शवविच्छेदन होणार असल्याची भाषा वापरली होती).

आज आम्ही विकले गेलो असाही अारोप केला गेला.आज जी परिस्थिती उद् भवली त्याची पाळेमुळे जुनी आहेत असे सांगून, २०१४ मध्ये भाजप व शिवसेना लोकसभेची निवडणूक एकत्रित लढले.यात शिवसेनेचे १८ खासदार संसदेत पोहोचले.शिवसेनेची ताकद,नरेंद्र मोदींचे नेतृत्व व उद्धव ठाकरे यांच्या परिश्रमाचे ते फळ होते.विधान सभा देखील एकत्रितच लढणार होतो.स्वत: आदित्य ठाकरे यांनी त्या निवडणूकीत ‘मिशन १५१‘ची घोषणा दिली होती.भाजपाने १४० जागांचा प्रस्ताव दिला पण वाटाघाटीनंतर भापने १२७ जागा व शिवसेनेने १४७ जागा लढायच्या,यावर शिक्कामोर्तब झाले.शिवसेनेची ताकद होतीच पण ४ जागांचा तिडा न सुटल्याने युती तुटली.

वेगवेगळे लढून देखील भाजप-सेनेने राज्यात सत्ता स्थापन केली.२०१९ मध्ये ही तेच घडले.मात्र निवडणूकीत जरी युती तुटली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किवा भाजपचे केंद्रिय अथवा राज्यातील नेते असो,आदर्श व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन कधीही टिका केली नाही.पुढे काही दिवसातच शिवसेना व भाजप पुन्हा सोबत आली.केंद्रात शिवसेनेचे मंत्रीही झालेत मात्र हाच तो कालखंड होता,जेव्हा पासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टिका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला,असे केसरकर नमूद करतात.

म्हणजे केंद्रात मंत्रिपदं घ्यायची,मोदींच्या मंत्रिमंडळात रहायचे,राज्यातील सरकारमधील घटकपक्षही राहायचे आणि मोंदीवर जहरी टिका सुद्धा करायची.यातून दोन पक्षामधील दरी वाढवण्याचे काम पद्धतशीरपणे राऊतांनी केले.याही काळात शिवसेनेचे अनेक आमदार वेळोवेळी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात हे आणून देण्याचे काम करीतच होते मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.दररोज अतिशय अश्‍लाघ्य टिकांचा मारा सुरुच राहीला.

काँग्रेस,राष्ट्रवादी किवा देशातील अन्य कोणत्याही विरोधी पक्षसुद्धा जी भाषा वापरत नाही ती भाषा संजय राऊतांच्या तोंडी कायम राहत असे.मोदी यांच्या नेतृत्वात देशात हिंदूत्वाचा विचार आणखी भक्कम होत गेला.याचा आम्हालाही आनंद होत होता कारण युती,आघाड्यापेक्षाही आपला आक्रमक हिंदूत्व बाणा,ही बाळासाहेबांची आम्हाला पहिली व अंतिम शिकवण आहे व ती आजन्म राहील,आमचा मृत्यूही हिंदूत्वाची चादर पांघरुनच होईल,असे केसरकर विशद करतात.

हळूहळू शिवसेनेच्या राजकारणाने नवीन आयाम प्राप्त करने प्रारंभ केले,राजकारणाची दिशा बदलत होती,हा बदल शिवसेनेच्या वाढीसाठी,हिंदूत्वाच्या विचारवाढीसाठी असता तर ते समजूनही घेता आले असते.ते सत्तेचे राजकारण असते तर ते ही समजून घेता आले असते पण सत्ता कशाच्या बळावर मिळवली?तर स्वत:ला संपवून? हे आम्हाला कसं मान्य होईल?शिवसेनेचे अस्तित्वच राहणार नाही तर मिळणारी पदं,सत्ता काय कामाची?

हळूहळू हे लोण जिल्हा परिषद,नगरपालिका,ग्रामपंचायत पातळीवर जाऊन पोहोचले.ज्यांच्यासोबत भांडणात आमची हयात गेली,किंबहूना शिवसेनेचा पायाच ज्या काँग्रेस विरुद्ध लढण्यासाठी रचण्यात आला,संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्षच शरद पवारांच्या दावणीला बांधण्यात आला,मग शिवसेनेचे अस्तित्व उरलेच कुठे?

ज्या काश्‍मीरच्या प्रश्‍नावर वंदनीय हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली.नव्हे काश्‍मिीरी पंडितांंना महाराष्ट्रात निमंत्रण दिले,ते कलम ३७० कायमचे हटताना शिवेसेनेच्या नेत्यांनी उघडपणे बोलू ही नये,इतकी वाईट अवस्था आमची झाली?सोनिया गांधी आणि शरद पवारांना खुश ठेवण्यासाठी आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा?सर्व महत्वाची खाती राष्ट्रावादी ,काँग्रेसला देऊन टाकायची आणि तेवढं मुख्यमंत्री पद ठेवायचं!दाऊदशी संबंध असल्याच्या आरोप असणा-या मंत्र्याचा बचाव करायचा तरी कसा?राज्यसभा निवडणूकीतही या पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवारालाच हरवायचे,मग करायचे तरी काय?नुसतं सहन करीत बसायचं?

दूर्देव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत,ते संजय राऊत पक्ष संपवायला निघालेत.संजय राऊत शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत.भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल पण शिवसेनेला जर हिंदूत्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे?आणखी दूर्देव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणा-या आमदारांना दूर ढकलले जात असेल तर करायचे तरी काय?असा उद्वीग्न सवाल ही केसरकरांनी आपल्या पत्ररुपी ट्टीटमध्ये उपस्थित केला.

उद्धव ठाकरे आणि आमच्यामध्ये दरी वाढविण्याचे पाप संजय राऊतांनी केले. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची,खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले कोण जाणार? तर पक्षाचे शत्रू नव्हे तर आपणच!हे आम्हाला मान्य नाही,म्हणूनच आमचा लढा शिवसेनेचा आहे,शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा आहे,शिवसेनेच्या अस्त्विाचा आहे,मराठी आणि हिंदूत्वाच्या अस्मितेचा आहे.हे बंड नाही,हा शिवसेनेच्या आत्मसन्माचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही.म्हणूनच महाराष्ट्राच्या सदिच्छांचे,आर्शिवादाचे बळ आम्हाला लाभत असल्याचे केसरकर आपल्या ट्टिटमध्ये विशद करतात.

आम्ही शिवसेनेसोबतच आहोत.शिवसेनेचे व आमचे पक्ष नेते उद्धव ठाकरे यांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा व विद्यमान आघाडी ऐवजी भाजपसोबत युती करावी.महाराष्ट्राच्या जनतेने युती म्हणून निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करण्याची मागणी त्यांनी केली.

आम्ही संपणार नाही,आम्ही थांबणार नाही,महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,जय महाराष्ट्र.

केसरकरांनी समाज माध्यमात प्रसिद्ध केलेल्या या प्रदीर्घ पत्रात आपला बंडीखोरीमागील संपूर्ण दोष संजय राऊतांवर मढला.हे खरे आहे २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीनंतर महाविकासआघाडी घडवून आणण्यात राऊतांचीच प्रमुख भूमिका राहीली आहे.मात्र तेव्हापासून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना वेगवेगळ्या मुद्दांवर ‘नॉन स्टॉप’फक्त विरोधकांवर शेलक्या शब्दात टिका करताना,टोमणे मारताना,आव्हान देताना,पानउतारा करताना व आरोप करतानाच बघितले आहे.

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पदावर बसेल या त्यांच्या विधानात आत्मविश्‍वासा ऐवजी ‘अहंकारच’दडलेला अवघ्या महाराष्ट्राने बघितला होता.मुंबई ते दिल्ली ते राज्यातील तसेच केंद्रातील विरोधकांवर फक्त दहाडतच होते.गेल्या अडीच वर्षात सर्वात जास्त किंबहूना दरराेजच सकाळी-सकाळी विविध वृत्त वाहिन्यांच्या कॅम-यांच्या फ्रेममध्ये झळकणारे ते राज्यातील ’एकमेव’नेते हाेते.

म्हणूनच आज शिवसेनेचे जेवढे नुकसान एकनाथ शिंदेंच्या बंडानेही केले नसेल तेवढे नुकसान एकट्या संजय राऊतांनी केले असल्याची टिका आज विविध वृत्त वाहिन्यांवर तसेच समाज माध्यमांवर झळकत हाेती.

हातात लेखणीची ताकद असल्याने व मराठी माणसांचे ‘सामना’वर प्रेम असल्यानेच अग्रलेखात गेल्या अडीच वर्षात त्यांनी सर्वाधिक वेळेस मोदी,शहा यांच्यावर खालच्या पातळीची टिका झोडली व भाजपला सतत डिवचण्याचे काम केले.

शरद पवार यांना देखील इडीची नोटीस आली होती तरी देखील दिल्लीत शरद पवार यांच्या एका फोनवर मोदींचे दरवाजे पवार भेटीसाठी खुले होतात,सगळेच राजकीय पक्ष एक दार आपल्या विरोधकांसाठी खुले ठेवीत असतात कारण राजकारण हा नेहमीच ‘बे-भरवश्‍याचा‘खेळ असतो,कधी कोणाला,कोणाची गरज भासेल याचा नेम नसतो मात्र संजय राऊत यांनी स्वत:साठी आपल्या बोलघेवडेपणामुळे,असे एक ही दार उघडे ठेवलेच नाही.

शरद पवार हे स्वत:एका राजकीय पक्षाचे नेते आहेत व त्यांचे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रात आज आहे मात्र ज्या पद्धतीचे फूटीचे राजकारण राऊतांनी महाराष्ट्रात केले,पवार देखील त्याला अपवाद ठरतात.’बागियो को मुंबई में तो आना होगा,हमारे लाखो शिवसैनिक जमीन पर है,हमारे एक इशारे का इंतजार है….!‘असे राऊत खुलेआम सांगतात.

सत्तेच्या हव्यासापोटी या राज्याच्या कायदे-व्यवस्थेला सुरुंग लावणारा नेता प्रसंगी संजय राऊतच असू शकतात,असेही आता बोलले जात आहे.त्यांच्या कालच्या ४० प्रेतांच्या आव्हानामुळेच आज एकनाथ शिंदे गटाला फार मोठा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाला,याची उपरती देखील राऊतांना झाली नाही.

आधी उच्च न्यायालयात का गेला नाहीत?असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने विचारले असता,राज्यात या आमदारांच्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले व राऊतांच्या विधानांचा दाखला देण्यात आला,यामुळे बंडखोरांच्या याचिकेची सुनवाई सर्वोच्च न्यायालयासमोरच झाली,बंडखोरांना आपले म्हणने विधान सभा उपाध्यक्षांसमोर मांडण्यासाठी ११ जुलै पर्यंत मुदत मिळाली,या दिलासात राऊतांच्या बोलघेवडेपणाचाही फार मोठा वाटा ठरला.

राऊत उवाच’चे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी ‘वैफल्यग्रस्त भाजपकडून राज्यात दंगली घडविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप १६ एप्रिल रोजी केला.‘नवहिंदूत्ववादी ओवेसीच्या भोंग्यांमुळे राज्यातील वातावरण तनावपूर्ण करायचे,मग ख-या ओवेसींनी येऊन राज्यात दंगे घडवायचे,लगेच राजभवनातून राज्यात कायदा व्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करुन राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची,असे कटकारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप करीत, हनुमान आमच्याच पाठीशी असल्याची वल्गना केली होती मात्र त्यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांची ‘वैफल्यग्रस्तता’ दिसलीच नाही त्यामुळेच आज शिवसेनेच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला.

राजधानी दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेत दोन समुदायांमध्ये दंगल उसळली तेव्हा महाराष्ट्रातही अश्‍या प्रकारचा हिंसाचार घडवायचे षडयंत्र होते,अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली,यावर राऊत हे फ्रस्टेड व्यक्ती असल्याची टिका करीत ते दिवसभर काहीही बोलतात,अशी उपरोधिक टिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

राजकारणच नव्हे तर न्यायव्यवस्थेवरही राऊतांनी टिका करीत ‘न्यायव्यवस्थेत एका विचाराचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत असल्याचा खळबळजनक आरोप करीत , न्यायव्यवस्थेकडून काहींना झुकते माप दिल्या जात असल्याची वल्गना केली.

नवनीत राणांच्या मातोश्रीसमाेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या आव्हानावर ‘कोण नवनीत राणा?पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर वेळ द्यायला नवनीत राणा आहेत तरी कोण?त्यांना दिल्लीत वेळ दिला जातो,तेवढे पुरेसे असल्याचा टोला हाणला होता.राऊत हे स्वत: राज्यसभेचे खासदार असून त्यांना नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत,हे अवगत नव्हते?

विरोधकांची बदनामी करण्याचे कारस्थान २०१४ पासून सुरु झाले असून त्यासाठी भाजपाकडून गोबेल्स नीतीचा वापर केला जात आहे,असा आरोपही त्यांनी केला.पं.बंगाल,गुजरातच्या निवडणूकीतही त्यांनी हेच केले.आपण मात्र नैतिकता सांभाळत बसलो आहे.याला जर ते युद्ध म्हणत असतील आणि त्याची नैतिकता पाळत नसतील, पाठीमागून वार करत असतील तर आपल्यालाही त्यांचा कोथळा काढण्याचा अधिकार असल्याचे राऊतांनी शिवसेनेच्या साेशल मिडीया सैनिक मेळाव्यात सांगितले.

भाजपने जी गोबेल्स नीती अवलंबिली आहे तो गोबेल्स हिटलरच्या सैन्यात होता.पंतप्रधान मोदींनाही हिटलर आवडतो.मोदी हिटलरला फॉलो करतात.ज्या प्रकारचे इव्हेंट हिटलर करायचा,त्याच प्रकारचे इव्हेंट मोदी करीत असल्याचे बोलबच्चन राऊतांनी केले होते.
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्यामुळे अन्य राज्यातही शिवसेनेचा विस्तार करणार असल्याचे सांगितले.यावर आशिष शेलार यांनी शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू लागली असून संजय राऊतांनी तर कोट ही शिवून ठेवला असेल,अशी बोचरी टिका केल्याने महाराष्ट्रात काय घडले आहे हे तुम्ही पाहिलेच ना?असे प्रतिउत्तर देत,२०२४ नंतर तुम्हाला तुमचे कोट भांडीवालीला द्यावे लागतील,असा पलटवार केला.

आयएनएस विक्रांत वर्गणी प्रकरणी सुनावणीसाठी किरीट सोमैय्या व त्यांचा मुलगा नील सोमैय्या गैरहजर राहील्याने ‘सोमैय्या बाप-बेटे फरार असून मिल्खा सिंगहून वेगाने पळत आहेत,भाग सोमय्या भाग!अशा शब्दात ट्टिट केले होते.तेच सोमेय्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा,पालघरमधील जमीन,दादरचा फ्लॅट व किहीमच्या भूखंड घोटाळ्याच्या विरोधात संजय राऊतांना कारागृहात डांबण्याचे आव्हान करताना ज राऊतांना मिळालेल्या इडीच्या समन्सनंतर माध्यमात झळकले!सोमेय्यावर राऊतांनी १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याचाही आरोप केला आहे.

राज्यात होत असलेली इडीची कारवाई बघता एखादवेळी शिवसैनिकांच्या वडापावच्या गाडीवरही ईडी कारवाई करेल,अशी भीती वाटते,‘असत्यमेव जयते’अश्‍या शब्दात त्यांनी ईडीची टर उडवली होती.

काहीतरी द्या’चे महाराष्ट्राचे जे राज्य होते,ते दोन वर्षांपूर्वी घालवण्यात आले आणि कायद्याचे राज्य आले,त्यामुळे त्यांची वेदना मी समजू शकतो’,असा घणाघात राऊतांनी फडणवीसांवर केला.

ईडी हे भाजपचे एटीएम सेंटर असून ईडीचे अधिकारी आणि राज्यातील भाजपचे काही नेते मिळून राजकीय सिंडिकेट चालवीत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.ईडीचे अधिकारी हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतात.‘मार्क माय वर्ड’ईडीचे काही अधिकारी लवकरच तुरुंगात जाणार असून देशातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारची आणि खंडणी वसुलीची तपासणी मुंबई पोलिस करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही शिवसैनिक जन्मत:माजोरडे आहोत.आमचा माज तुम्ही बघितला.यापुढेही तुम्हाला तो दाखवू.शिवसेनेच्या अंगावर याल,तर स्मशानात गोव-या रचून या,अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याविना राहणार नाही,हे आव्हान देखील राऊतांचेच!शिवसैनिकांच्या नादाला लागले तर २० फूट खाली गाडू असा गर्भित इशारा ही राऊतांचाच!

महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांच्या यादीवर राज्यपालांच्या आक्षेपावर, ती राजकीय नसून सरकारने केलेली आमदारांची शिफारस स्वीकारणे राज्यापालांना बंधनकारक आहे, मात्र राज्यपाल काेश्‍यारी हे घटनाबाह्य वागत आहेत.त्यामुळे केंद्राने त्यांना परत बोलवावे.आम्हाला न्यायालयात जाण्यास भाग पाडू नये’ असे आव्हान राऊतांनी दिले व ‘राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार’ पंगा घडवून आणला.

शरद पवारांना राष्ट्रपती बनविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरुन विरोधकांची मोट बांधणार असल्याचा सूतोवा देखील राऊतांचाच.आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली.एक विठ्ठल आज आमच्याबरोबर मंचावर बसले आहे,ते आहेत शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे!शरद पवारांनी महाराष्ट्रातून परिवर्तनाची सुरवात केली.ते आता दिल्लीमध्येही तेच परिवर्तन घडवतील,हे भाकीत देखील राऊतांचेच!

ज्या दिवशी पवारांना ईडीची नोटीस आली त्याच दिवशी बदल व्हावा,हे मनात आले होते व त्यातूनच महाविकास आघाडीची पायाभरणी झाली होती,असा गोप्यस्फोटही राऊतांनी, आव्हाड यांचा प्रजासत्ताक दिनी ठाणे फेस्टिवलमध्ये पवार यांच्या हस्ते सत्कार झाला,त्यावेळी केला.बाळासाहेबांनी आपल्या एका व्यंगचित्रात ’एक शरद दो गारद’रेखाटले होते, मात्र आज आम्ही असे म्हणतो ’एक शरद सगळे गारद’.

आपल्या बोलघेवडेपणामुळे राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी या माफिया डॉन करीम लाला यांना भेटत असत,अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर आघाडीतील काँग्रेस पक्ष चांगलाच नाराज झाला.यानंतर पवार यांनाच सारवासारव करावी लागली होती.

हा वाद शमतो ना शमतो तेच ’स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणा-यांना अंदमान-निकोबारमधील कोठडीत किमान दोन दिवस पाठवायला हवे,असे वक्तव्य करुन राऊत यांनी सेना-काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा तनाव निर्माण केला होता मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ’इतिहासावर किती दिवस बोलणार?अशी थेट भूमिका मांडली.

असे असले तरी ‘माझे नाव राहूल सावरकर नाही,राहूल गांधी आहे.खरे बोलल्याबद्दल मी मरण पत्करेन,पण कधीही माफी मागणार नाही’असे वादग्रस्त विधान राहूल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसतर्फे आयोजित ‘भारत बचाव’रॅलीत केले.यावर मात्र राऊतांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान व्हायलाच हवा,त्याच्याशी कधीही तडजोड होऊ शकत नाही,अशा शब्दात राहूल गांधी यांचे कान टोचले होते.सावरकर नावात राष्ट्राभिमान आहे आणि स्वाभिमान आहे.नेहरु,गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला.आम्ही पंडित नेहरु,महात्मा गांधी यांना मानतो,तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करु नका,सुज्ञास सांगणे न लगे’असे ट्टीट केले होते.

खुलताबादमधील औरंगजेबच्या कबरीचे एमआयएम पक्षाचे खासदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी दर्शन घेतल्यावर त्यावर टिका करीत,औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली,त्याला कबरीत आम्ही टाकले आहे.तुम्ही कबरीवर येऊन नमाज पठण करत आहात,कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल.औरंगजेब शेजारी तुम्हालाही गाडू’असा इशारा राऊतांनी दिला होता.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या