
(रविवार विशेष)
प्राध्यापिकेला केली शरीरसुखाची मागणी!
तुमची माय किती पुरुषांसोबत……!प्राध्यापकांसोबत प्राचार्यांची ही अशी भाषा?
माझ्यावर आळ घेणा-यांच्याच बायका माझ्यासोबत झोपल्या!
व्हिडीयो व्हायरल होऊन तब्बल महिना उलटला अद्याप प्राचार्यांवर कारवाई नाहीच!
पुरोगामी महाराष्ट्रानेच लाज विकून खालली का?
गाडगे महाराज महाविद्यालयाचे संचालक मौन!‘मिलीजुली’ सरकार आहे का?नेटीझन्सचा सवाल
प्राध्यापिकेच्या एफआयआरनंतर ही प्राचार्यांची गुर्मी कायम:वेतनवाढ रोखली!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २० जून: जूनच्या पहील्या आठवड्यात एका विद्वान प्राचार्य डॉ.संतोष ठाकरे यांचा त्यांच्या श्री गाडगे महाराज महाविद्यालय,मूर्तिजापूर जि.अमरावती येथील प्राध्यापकांना कमरे खालच्या शिव्या देतानाचा व्हिडीयो अखख्या महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला होता.या व्हिडीयोमध्ये या महान प्राचार्याच्या तोंडी अश्लील शिव्यांची कशी ज्ञानगंगा ओसंडून वहावी?तर ‘एकाच बापाचे आहात की तुमची माय झोपयाला गेली होती कोणाकोणासोबत!असे ते त्यांच्याकडे खुलासा मागायला आलेल्या प्राध्यापकांनाच ऐकवत असलेले बोल कानी पडतात आणि या प्राचार्यांच्या भाषेने गाडगे महाराजांवर नितांत श्रद्धा असणा-या मराठी भाषिकांचे कान अगदी तृप्त होऊन जातात….!
एवढंच नव्हे तर त्यांची व्हिडीयो रेकॉर्डिंग होत आहे हे माहिती असतानासुद्धा त्यांनी ‘माझ्यावर ज्यांनी ज्यांनी आळ घेतला त्यांच्या बायकाच माझ्यासोबत झोपल्या…..!’असे गंगा-जमूनातील वारांगनांच्या भाषेलाही लाजवेल अश्या ‘उच्च कोटीच्या’ भाषेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेतील संभाषण तेवढ्याच गुर्मीत करुन किती ही व्हिडीयो रेकॉर्डिंग केली तरी माझं कोणीही काहीही बिघडूव शकत नसल्याची वलग्ना केली,दूर्देवाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होऊनसुद्धा‘अद्यापतरी’ अतिशय पवित्र समजल्या जाणा-या शिक्ष् ण क्ष्ेत्रातील या महान विभूतीच्या केसालाही धक्का लागला नाही……!
हा सन्माननीय पदावर बसलेला ‘ लिंगपिसाट’ माणूस संत गाडगे महाराज सारख्या अतिशय श्रद्धेय असणा-या नावाच्या महाविद्यालयाचा प्राचार्य आहे की एखाद्या देह व्यापाराच्या ठिकाणातला ‘दलाल’असाच प्रश्न त्याची एकंदरित भाषा ऐकून सामान्य माणसाला पडतो.हे व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर अर्थातच नेटीझन्सच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया यावर उमटल्या मात्र दू:ख त्या प्राध्यापिकेसाठी वाटलं जिने ‘पुरुष’ म्हणून या भूतळावर जन्माला आलेल्या नराधमाला शरीरसुखासाठी नकार दिल्यानंतर असहनीय असा मानसिक व भावनिक क्लेष सहन केला.
तिची पगारवाढच या नराधमाने रोखली,त्याचा तथाकथित ‘पुरुषार्थ’दुखावल्यानंतर त्याने तिला कश्या-कश्यारितीने प्रताडीत केले,तिचा आत्मसन्मान दुखवला याची वाच्यताच त्या प्राध्यापिकेने आपल्या एफआयआरच्या कॉपीमध्ये केली आहे जी वाचून किमान सभ्य माणसाचं तरी मन पेटून उठेल.एवढा माज या प्राचार्याला आपल्या पदाचा?पुरुष होण्याचा?कोणाच्या बळावर आला असावा?
महाविद्यालयांच्या संचालकांच्या बळावर?एवढे मोठे प्रकरण घडून ही त्यांनी स्वत:च्या नावासमाेर ‘डॉक्टर’ही उपाधी लावणा-या या तथाकथित उच्च विद्याभूषित प्राचार्याला बाहेरचा रस्ता नाही दाखवला नाही याचा अर्थ संचालकांसोबत प्राचार्याची ’मिलीजुली सरकार’ आहे का?असा प्रश्न नेटीझन्सलाही पडला आहे.संचालकांचे असे कोणते ‘कर्म’प्राचार्यांना अवगत आहे ज्यामुळे ते या महान प्राचार्याच्या पदावरुन काढू शकत नाही?पुरोगामी म्हणून मिरवणा-या महाराष्ट्राने आपले संस्कार,आपली संस्कृती आपली लाज विकून खालली आहे का?हा प्रश्न समस्त महीला वर्गाला पडतोय.महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याचे गुणगान करताना त्याच संतांनी महिलांसाठी खूप सन्मानाची,आदराची भावना आपल्या अंभंगात रचली आहे.येथे तर चक्क श्री.गाडगे महाराजांचे अतिशय आदरनीय नाव असणा-या महाविद्यालयाच्या प्राचार्यानेच आपल्या पुरुषी वासनेतून त्यांच्या नावाला बट्टा लावण्याचे महाघोर पाप केले असताना त्यांचे काेणीच काहीच वाकडे करु शकले नाही?
स्त्री ही चार भिंतीतच सुरक्ष्ि त का समजली जाते?याचे कारण समाजातील हे असले लिंगपिसाट पुरुष आहेत.स्त्री नोकरीनिमित्त किवा शिक्ष् णासाठी सुरक्ष्ति समजल्या जाणा-या चार भिंतीच्या बाहेर बाहेर पडली तर तिला भोगणे हा आपला जणू निसर्गदत्त अधिकार असल्याचा समज अश्या काही लिंगपिसाट पुरुषांचा होतो आणि ती त्याच्या किळसवाण्या वासनेला बधत नसेल तर हा नराधम तिला छळण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती अवलंबतो.आपली शक्ती,आपली ताकद एका स्त्रीचे आयुष्य,तिचे अस्तित्वं,तिची अस्मिता,तिच करियर उधवस्त करण्यात खर्ची घालतो आणि तरीही…स्वत:ला ‘पुरुष‘म्हणून घेतो…..!
शिक्ष् णासारखेच पवित्र समजल्या जाणा-या पत्रकारितेच्या क्ष्ेत्रातही गेल्या तीन दशकांपासून हीच कीड रुजल्याची अनेक उदाहररणे आहेत, ज्या स्त्रियांनी संपादकांच्या किवा वरिष्ठांच्या वासनेला बळी पडण्यास नकार दिला,त्यांना आपली सगळी प्रामाणिकता,सगळी स्वप्ने गुंडाळून घरी बसावे लागले,काय केलं वृत्तपत्रांच्या मालकांनी?कोणती शिक्ष्ा दिली त्यांना?हा असा असतो का लोकशाहीचा चौथा स्तंभ?प्रामाणिक स्त्रियांचा आत्मसन्मान डावलून पुरुषी वृत्तीबाबत डोळेझाक करणे?लोकशाही ही फक्त पुरुषांसाठीचाच अधिकार आहे का?ज्यांनी संपादकांची ‘मर्जी’राखली त्या सुखी झाल्या,चांगले पद व पगारा मिळवत्या झाल्या.मात्र शिक्ष्ण क्ष्ेत्रातली ही प्राध्यापिका मानी होती,तिला प्राचार्यांना खूश करुन नोकरी वाचवायची नव्हती किवा प्रमोशन ही मिळवायचं नव्हतं.
तिची बुद्धिमत्ता,तिचं कर्तृत्व ती समाजाला देणं लागत होती,देह नाही….! नोकरी हा तिचा संविधानाने दिलेला अधिकार होता तर वेतनवाढ हा तिचा न्याय हक्क होता.सदीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा मध्यंतरी एक अप्रतिम चित्रपट आला होता ‘पिंक’.या चित्रपटात स्त्रीचा नकार ‘No means No‘हा पुरुषाला पचवता आला पाहिजे,स्वीकारता आला पाहिजे असा मोलाचा संदेश देणारा हा चित्रपट होता,न की तिचा सूड घेण्यासाठी आपला पुरुषार्थ वापरला गेला पाहिजे.शेवटी ती पण एक माणूस असते,तिला एक स्वत:चं मत असतं,हे या जगातले पुरुष जेवढ्या लवकर स्वीकारतील तेवढ्या लवकर तिच्या प्रगतीची दारे उघड होत राहतील.
काय आहे एफआयआरमध्ये?
श्री.गाडगे महाराज महाविद्यालयातील या सहा.प्राध्यापिकेने लिहले की ती १६ जून २००९ पासून या महाविद्यालयात कार्यरत आहे.प्राचार्य पदावर डॉ.संतोष ठाकरे हे २२ नोव्हेंबर २०१६ पासून रुजू झाले.२०१७ पासून ठाकरे यांनी प्राध्यापिकेसोबत जवळीक साधण्याचे व लगट करण्याचे प्रयत्न केले. २८ जुलै २०१७ रोजी प्राध्यापिकेच्या प्रथम स्थान निश्चितीच्या फाईलवर सह्या घ्यायचा होत्या.दुस-या दिवशी सकाळी ९ वा.प्रा.डी.डी.शहाडे व प्राध्यापिकेच्या पदोन्नतीची बैठक होती.तरी प्राचार्य ठाकरे यांनी जाणीवपूर्वक सायंकाळी ६ वा.पर्यंत तिच्या फाईलवर सह्या केल्या नाहीत व नंतर खूप उशिरा सह्या केल्या.अमरावतीला जाण्यासाठी बसने जाण्यास संभाजी चौक,मूर्तिजापूर बायपासवर त्या आल्या असत्या मागून कारने ठाकरे आले व कारने सोडून देतो म्हणून कारमध्ये बसायला सांगितले.दुस-या दिवशी पदोन्नतीचे काम असल्याने ठाकरे हे त्यात अडथळे आणू शकतील म्हणून कारमध्ये प्राध्यापिका बसली.
अमरावतीपर्यंतच्या प्रवासात प्राचार्यांनी त्यांच्या वैयक्तीक गोष्टी केल्या.माझी बायको वेगळी राहते व मला एकटं वाटतं…तुम्ही मध्यप्रदेशचे आहात माझ्यासाठी अशी पहा जी तुमच्यासारखी असेल…!त्यांच्या गोष्टी ऐकून मला गुदमरल्यासारखं वाटत होतं,पण नोकरी व प्रमोशन थांबवतील या भितीने मी काही बोलले नाही.
त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये महाविद्यालयात उन्हाळी सुट्या असताना एज्युकेशनल टूर संदर्भात तुम्ही माझ्यासोबत चला असे मला फोन केला.तेव्हा मला माझ्या मुलाचे शाळेचे काम आहे,मी नंतर बसने येते असे सांगितल्यानंतरही तुमचे काम होईपर्यंत मी थांबतो असे म्हणून दुपारी १ वा.मी वारंवार त्यांना फोन करुन तुम्ही जा मला उशिर होईल असे म्हणत असतानाही ते माझ्यासाठी थांबून राहीले.मी पुन्हा नोकरीच्या भितीने त्यांच्यासोबत कारने त्या दिवशी एज्यूकेशनल टूरच्या संदर्भात कॉलेजला आले.सायंकाळी ६ पर्यंत त्यांनी पुन्हा थांबवले.पुन्हा घरी जाताना कारमध्ये बसवून ‘तू मला खूप आवडते,माझं तुझ्यावर प्रेम आहे,मला तुझ्यासारखीच पाहीजे….असे म्हणून माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवशील तर आपण यूरोप टूर वर जाऊ’असे बोलायला लागल्याने खूप भीती वाटली….!
सर तुम्ही हे काय बोलत आहात?आताच्या आता मला गाडीतनू उतरुन द्या म्हणून कारच्या खाली उतरले आणि….त्या दिवसापसून अतोनात मानसिक छळाला सुरवात झाली….!२ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या मुलींच्या पथकाची मी इंजार्ज असतानाही दूर गावच्या मुलींना ४ वाजेपर्यंत घरी जायचे असताना प्राचार्यांनी ६ पर्यंत मुलींना थांबवून ठेवायचे.मी जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत मुलींना थांबावेच लागेल नाही तर त्यांचा प्रवेश रद्द करतो,मुलींना फाट्यावरुन पायी एकटे जावे लागते,अशी विनंती त्यांना करायचे पण त्यांना काही फरक पडत नसे.
४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वच्छता अभियान सुरु असताना प्रा.दिलीप शहाडे,प्रा,सातपुते,प्रा.डॉ.बडगुजर,प्रा. सचिन माटोडे हे सगळे सर्व मैदानात हजर असताना प्राचार्यांनी प्राध्यापिकेला ‘तू चूप रहा,माझ्यासमोर कोणी तोंड उघडत नाही,तुझी हिंमत कशी झाली थांब तुला आता दाखवतो हरामखोर,तुझ्या मायचा….!तुला सस्पेंड करतो….!असे….मानसिक खच्चीकरण केले…….!
अश्या एक नाही अनेक घटनांचा उल्लेख या प्राध्यापिकेच्या एफआरआरमध्ये आहे.कोरोना झाल्याने सुटी घेतली मात्र पगारातून ४० हजार रुपये प्राचार्याने कापले,वेतनवाढीचा अर्ज एक वर्षांपासून दाबून बसले आहे.वरुन आदेश आल्यानंतरही त्रिसदस्यीय समिती नेमली.७ व्या वेतन आयोग लागू होण्यासाठी फक्त एक कवरिंग लेटर देण्यासाठी पदाचा सतत दुरुपयोग करुन आर्थिक नुकसान केले…..!
थोडक्यात भारत हा देश ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतोय त्याच संविधानात आंबेडकरांनी समानतेचा पुरस्कार करताना स्त्रियांना समान काम,समान वेतनासोबतच कामाच्या ठिकाणी समान सन्मानाची बाब ठलकपणे अधोरेखित केली आहे.स्वतंत्र्याच्या ७० व्या वर्षांत ही मात्र असे घडले का?समान सन्मान तर सोडा कामाच्या ठिकाणी ती अपमानित केली जाते,तिचे शोषण केले जाते.जी बधत नाही ती व्यवस्थेबाहेर फेकली जाते किवा घरी बसवल्या जाते मग ते क्ष्ेत्र शिक्ष् णाचे असो,पत्रकारितेचे असो,कलेचे असो,चित्रपटसृष्टि असो किवा अन्य कोणतेही. असभ्य किवा मानसिक संतुलन बरोबर नसणारा व्यक्तीच अश्या स्तरापर्यंत जाऊ शकतात,असेच आता म्हणावे लागेल.
किती राजकीय व अराजकीय महीला संघटना प्राध्यापिकेच्या या आत्मसन्मानाच्या लढाईसाठी समाेर येतील…….?
नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाने यांची या घटनेवर फेसबूक पोस्टवरील पोस्ट-
शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांची नग्न धिंड का काढू नये?कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार ही जणू आता आम घटना झालेली आहे. सतत एक तर विनय भंगाच्या तक्रारी असतात, नाहीतर लैंगिक शोषणाच्या. कार्पोरेट जग, मोठमोठे प्रायव्हेट ऑफिसेस, मेडिकल इन्स्टिट्यूट पासून तर थेट महाविद्यालयांपर्यंत हे लोन पोचलेले आहे. प्राध्यापक, शिक्षक, प्राचार्य हेही यात मागे नाहीत. शिक्षकांनी शिक्षणाचाच नुसता बाजार मांडलेला आहे, असे नाही तर चारित्र्याचाही मांडला आहे. असल्या शिक्षक, प्राध्यापकांकडून आजचा विद्यार्थी काय आदर्श ठेवणार आहे? शिक्षकांना आपण आचार्य म्हणतो; पण आजचा शिक्षक दुराचारी झालेला आहे. खरे तर शिक्षक हा बागेतल्या माळ्यासारखा असावा. फुलझाडांची योग्य वाढ होण्यासाठी कुठेही कीड लागू नये म्हणून बागेतला माळी जसा सतत जागरूक असतो, लागलेली कीड वाढण्यापूर्वी तिला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, करायला हवे, पण शिक्षकच स्वतः कीड वाढवत असेल तर त्या फुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी जायचे तरी कुठे?




आमचे चॅनल subscribe करा
