

(छायाचित्र-महापौर,अरविंदकुमार रतौडी व ज्येष्ठ करोना योद्धे पांडूरंग निमजे,महापौर…फक्त छायाचित्रातच उपयोगी पडलेत!)
सुप्रसिद्ध समाजसेवी अरविंदकुमार रतौडी यांचा प्रशासनाला गंभीर इशारा
करोना योद्धे चंदन पांडूरंग निमजे यांनाच वेळेवर मिळाला नाही बेड!
धरमपेठ झोनने फक्त घरावर बॅनर चिटकवण्याची केली खानापूर्तता:कुटुंबियही पॉझिटीव्ह:शेजारी भयकंपित
नागपूर,ता. ८ मे: गेल्या वर्षभरापासून करोना संसर्गितांसाठी प्राणाची बाजी लावणारे ६७ वर्षीय व किंग कोब्रा संघटनेचे सक्रिय सदस्य अरविंद रतौडी यांना ४ दिवसांपूर्वी अखेर कराेनाने गाठलेच.आतापर्यंत ते दहन घाटांवर मृतकांसाठी आपल्या किंग कोब्रा संघटनेतील सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र झटत होते.४ दिवसांपूर्वीच त्यांनी पत्नीसोबत लस घेतली.त्यांना ताप आला,अश्यात त्यांना करोना झाला असल्याचे निदान झाले मात्र मनपा प्रशासनाने त्यांच्या प्रियदर्शनी सदनिका,त्रिमूर्ती नगर येथील त्यांच्या घरावर प्रतिबंधित भाग म्हणून बॅनर लावण्याची औपचारिकता केली,त्यांच्या दोन मुली,पत्नी या देखील करोना संसर्गित झाल्या मात्र अरविंद यांना ना त्यांच्या कुटुंबियांना मनपाच्या धरमपेठ झोनकडून गोळ्या,औषधे पोहोचविण्यात आली ना त्यांचे घर सेनिटायीझ करण्यात आले,त्यांच्या या कृतीवर मात्र शेजा-यांच्या मनात धडकी भरली व कोणीही या कुटुंबियांच्या मदतीला पुढे सरसावले नाही.
अश्या कठीण प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष् अरविंदकुमार रतौडी यांनी त्यांच्यासाठी अनेक रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.महापौर दयाशंकर तिवारी यांना देखील फोन लावला मात्र शहराचे प्रथम नागरिक असणारे महापौरांनी त्यांना फक्त कंट्रोल रुमचा नंबर देण्याची औपचारिकता पूर्ण केली.कंट्रोल रुमला १०० वेळा फोन लाऊनसुद्धा फोन लागला नाही,ना जिल्हाधिकारी यांनी शपथपत्रावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जे कंट्रोल रुम सुरु केले असल्याचे शपथपत्र सादर केले त्या क्रमांकारवर फोन लागले!
अथक प्रयासाने शेवटी त्यांना वर्धमान नगर येथील डॉ.शेंडे यांच्या खासगी रुग्णालयात बेड मिळू शकले.मात्र या संपूर्ण धावपळीत ४ दिवस व्यर्थ गेले तोपर्यंत त्यांची ऑक्सीजनची पातळी ६० पर्यंत घसरली होती.आज शनिवार दि. ८ मे रोजी रतौडी यांच्या आवहानानंतर अनेक प्लाझ्मा डोनर पुढे आले,या महान माजी अप्पर सचिव,वाणिज्य दुतावास,दिल्ली येथील अधिका-याला आज प्लाझमा चढवण्यात आला मात्र तरी देखील त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर सांगतात आहे.
या महान करोना योद्धाच्या जीवाला जर काही झालं तर मी त्यांचा मृतदेह मनपा मुख्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन ठेवणार असल्याचा संताप रतौडी यांनी ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केला.मनपा प्रशासनाकडून चार दिवसांपूर्वीच त्यांना योग्य उपचार घरीच मिळाला असता तर या महान व जिगरबाज करोना योद्धाचा जीव धोक्यात नसता आला,असे रतौडी सांगतात.
मृतदेह जाळण्यासाठी डिझेलची व्यवस्था करणे असो,वेळेवर कोणाला रुग्णवाहिका,शववाहिका मिळवून देण्यासाठी या महान योद्धाने रात्रीचाही दिवस केला मात्र जेव्हा त्यांना उपचाराची गरज भासली तर मुर्दाड आणि भंपक मनपा प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंट्रोल रुमने धोका दिला.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे हे नागपूर शहराचे मिनी मुख्यमंत्री समजले जातात,संपूर्ण आरोग्य व्यवस्था तेच सांभाळत आहेत,अशी आरोग्य व्यवस्था सांभाळतात ते?फोन नंबर बंद करुन?नागपूरच्या सर्वसामान्य जनतेला वा-यावर सोडून,मृत्यूच्या दारावर लोटून?असा संताप रतौडी व्यक्त करतात.
मनपा और जिल्हाधिकारी के ये कंट्रोल रुम आखिर है किसके लिये?जब वक्त पे वहा से काई भी मदत नही मिलती!शासन,प्रशासन,सरकार सब सो रहे है और लोग सिर्फ मर रहे है’असा संताप ते व्यक्त करतात.अगद मेरे इस बंदे को कुूछ हो गया तो उनकी लाश मै मनपा मे लाकर जलाऊंगा,असा इशारा अरविंदकुमार रतौडी देतात.
इस महापौर,जिल्हाधिकारी और मनपा आयुक्त की सात पुश्ते याद रखेगी इतनी बडी न्याय की लढाई मै मेरे इस बंदे के लिये लडूंगा,इन सबको जेल मे भेजूंगा!
माझे कुटुंबिय स्वत: आता घाबरलेले आहेत.मला स्वत:ला दोन लहान मुली आहेत.आजपर्यंत मानवतेच्या सेवेसाठी, माणूसकीच्या धर्मासाठी कधीच माझ्या कुटुंबियांनी मला या सेवाव्रतापासून नाही रोखले मात्र आता ते सुद्धा घाबरले.या नागपूर शहरात खासगी असो कि सरकारी एकाही रुग्णालयात एखाद्या करोना योद्धाला बेड ही मिळू नये!
अर्ध्या रात्री आम्हाला त्यांच्या सीटी स्कॅनसाठी ,रुग्णवाहीकेसाठी धावाधाव करावी लागली.भरमसाठ पैसा द्यावा लागला,असे ये मूर्दो का शहर हो गया है क्या?ये प्रशासन नही मदत कर सकती तो क्यो घर पर बॅनर लगाया?समाज से उनके परिवार काे बहीष्कृत किया?पत्नी,बहन और उनकी बेटीया सहमी हूयी है,,मोठी विवाहित मुलगी दारासमोर जेवणाचा डबा ठेऊन जाते,त्यांना त्यांचे फॅमिली डॉक्टर फोनवर औषधी सांगतात तेच ते कुटुंबिय घेत आहे,घरी उपचार घेणा-यांसाठी मनपाची काहीच जवाबदारी नाही का?
त्यांचा साधा ताप ही मोजून नाही गेले?गेल्या वर्षी तर सर्व नगरसेवकांमध्ये त्यांचा प्रभाग सेनिटाईझ करण्यासाठी स्पर्धा लागली होती,आता कुठे गेले सगळे नगरसेवक?सेनिटायझरचे पैसे संपले का केंद्राने दिलेले?की फक्त दाखवण्यासाठी व बिले काढण्यासाठी फव्वारणी केली?अरे कुठे फेडाल हे पापं ……!
वे
ळेवर त्यांना कोविड केअर केंद्रात पाठवले गेले असते,वेळेवर त्यांना औषधे मिळाली असती तर ते आज जीवन-मृत्यूच्या संघर्षात असे अडकले नसते……!
(
संपर्क क्रं. अरविंदकुमार रतौडी- ९०४९५५०८५४)




आमचे चॅनल subscribe करा
