फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमायबाप सरकार कार्यक्रम सुरु करा:कलावंताची पालकमंत्र्याना मागणी

मायबाप सरकार कार्यक्रम सुरु करा:कलावंताची पालकमंत्र्याना मागणी

Advertisements


कधी संपणार कलाकरांमागील बंदीचं शुक्लकाष्ठ?

आता आंदोलनाचा मार्ग पत्कणार: विदर्भलाईट असोसिएशनचा पवित्रा

नागपूर,ता. ३१ मार्च: मायबाप राज्य सरकारने ’मिशन बिगिन अगेन’अंतर्गत आज ३१ मार्च २०२१ रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार पालकमंत्री नितीन राऊत यांनी उपराजधानीतील लॉक डाऊन तर उठवला मात्र पुन्हा एकदा १५ एप्रिलपर्यंत सर्वप्रकारच्या सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांवर सरसकट बंदी घातली,यामुळे आधीच होरपळून निघणा-या कलावंतांचे जग हे अगतिक होऊन आता आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.विदर्भ लाईट ओनर्स असोसिएशनचे कोषाध्यक्ष् मिथून मित्रा यांनी आता कला क्ष्ेत्राशी जुळलेल्या प्रत्येकाला जगण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे सांगितले.

असोसिएशनसोबत १०० सदस्य जुळले आहेत.प्रत्येक सदस्यामागे कुटुंबिय असतात,याशिवाय सहायक वर्ग जुळलेला असतो,त्यांना देखील कुटुंबिय अाहे,एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना पालकमंत्री असो किवा ठाकरे सरकार,उपाशी कशी मारु शकते?असा ज्वलंत प्रश्‍न ते उपस्थित करतात.

आता खूप झाले,सहनशीलतेचा कडेलोट झाला,निवेदन देऊन झाले,राजकारण्यांचे उंबरठे झिजवून झाले,याचना करुन झाली,जीव देण्याचा प्रयत्न ही करुन झाला,या सरकारकडे करोनावर एकच उपाय अाहे तो म्हणजे कार्यक्रमांवर सरसकट बंदी!

सभागृह,मंगल कार्यालयवाले,साऊंडवाले,गायक,वादक,बॅक स्टेज कलावंत,कॅटरिनचा व्यवसाय करणारे,स्टेज डेकोरेशनवाले,फूलवाले,घोडेवाले,बॅण्डवाले,किती-किती नागरिकांना हे सरकार उपाशी मारणार आहे?कलाकारांना हात पसरण्यासाठी लाचार करत राहणार आहे?याला कुठेतरी अंत आहे की नाही?गेलं संपूर्ण वर्ष आम्ही सगळ्यांनी भारताचे जवाबदार नागरिक म्हणून सरकारला सहकार्य केले ना?आता हे वर्ष पण कामधंदे बंद ठेवले तर आम्ही जगणार कसे?पालकमंत्र्यांनीच याचे उत्तर द्यावे,अशी उद्विग्नता ते व्यक्त करतात.

पूणे,मुंबई,कोलकता सगळीकडे कलावंत जगतोय,मग नागपूरचाच कलाकार का मारताय?पालकंत्री म्हणाले होते लग्नसराईमुळे करोना वाढतोय मग गेल्या अनेक महिन्यांपासून लग्नसराईच लोकांनी बंद करुन ठेवली,कलाकार,डीजेवाल्यांनाही काम नाही तरी करोना का वाढला?याचे उत्तर कोणताच मंत्री देत नाही फक्त करोना वाढला यासाठी जनतेलाच दूषणे देत लॉक डाऊन आणि कार्यक्रम बंदी सुरु असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र उत्तरप्रदेश का नाही?
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले लग्नसराईत अनावश्‍यकरित्या नियमांच्या नावाखाली कोणालाही त्रास देता कामा नये,अशी तक्रार आढळल्यास संबंधित अधिका-यांनाच जवाबदार धरले जाईल,योगी आदित्यनाथ यांना कळतं सर्वसामान्यांच्या जीवनात लग्नसराईचं काय महत्व आहे,जरी पुढील वर्षी उत्तरप्रदेशची निवडणूक डोळ्यासमाेर ठेऊन त्यांनी हे निर्देश दिलेत मात्र महाराष्ट्रात कधीच निवडणूक होणार नाही का?तेव्हा आम्हाला जगण्या मरण्याच्या संकटात टाकणा-या या सरकारला,मंत्र्यांना,आमदारांना आम्ही सोडणार आहे का?मत मागायला तर आमच्याच दारावर येतील ना?हे त्यांनी विसरु नये,असा सज्जड दम ही मित्रा यांनी दिला.

आम्ही सगळे नियम व अटींचे पालन करु मात्र आता सरकारने कार्यक्रमांवरील बंदी उठवावी,ही बंदी उठवली जाणार नसेल तर आता कला जगताशी संबधित सर्वच असोसिएशन्स रस्त्यावर उतरुन आंदोलन करु,मग आमच्यावर गुन्हे दाखल करुन गृहमंत्र्यांनी आम्हाला तुरुंगात टाकले तरी बेहत्तर,असा संताप ते व्यक्त करतात.

करोना वाढला त्यात आमची काय चूक आहे?ही सरासर प्रशासनाची हलगर्जी आहे.आता त्याचे खापर आमच्यासारख्या कलावंतांवर फोडून गलेलठ्ठ पगार घेणे नोकरशाहीचे सुरुच आहे.कार्यक्रम बंदी कधी संपणार ?किमान आम्हाला आता पालकमंत्र्यांनी एक निश्‍चित तारीख सांगावी,आम्ही तेवढं सहकार्य करण्यास तयार असल्याचे मित्रा हे म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या