फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामेश्‍वरीच्या नागरिकांना बाजार नाही पाहीजे पण मनपा सभापतींना पाहीजे!

रामेश्‍वरीच्या नागरिकांना बाजार नाही पाहीजे पण मनपा सभापतींना पाहीजे!

Advertisements

 

काशीनगर बाजारावरून नागरिकांचा महापौरांनाच घेराव

धंतोली झोन सभापती वंदना भगतवर स्थानिकांचा रोष

– तणावपूर्ण वातावरणात रहीवाश्‍यांचे पुन्हा आंदोलन

नागपूर,ता.५ मार्च: नगरसेवक असले तरी किवा झोन सभापती असले तरी आपल्या मतदारांना काय हवे ते नगरसेवकांनी द्यावे,नागरिकांना नको असेल तर नगरसेवकांनी नागरिकांवर ‘मला पाहीजे’म्हणून ती गोष्ट जबरदस्ती लादू नये,असा संताप आज रामेश्‍वरी भागातील नागरिकांनी व्यक्त केला.आम्हाला येथे बाजार मुळीच नाही पाहिजे,जागा अपूरी,बाजारात बसणारे लोकं जास्त,मग काय?संपूर्ण बाजारच मग रस्त्यांवर येतो,अश्‍यावेळी त्या भागातील नागरिकांचे,रहीवाश्‍यांचे काय हाल होतात याची जाणीव नगरसेवकांना नको व्हयला हवी का?मात्र धंतोली झोन सभापती वंदना भगत या ठिकाणी बाजार होणारच असा दम देतात,यामुळे काशीनगर परिसरातील नागरिकांचा चांगलाच रोष धंतोली झोन सभापती वंदना भगत यांच्यावर दिसून पडला.

शहरातील दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रामेश्वरी, काशिनगर, द्वारकापुरी, सम्राट अशोक कॉलोनी, हावरापेठ मधील प्रभाग क्रमांक-३३ च्या रहिवासीयांना गेल्या अनेक वर्षांपासून वस्तीतील रस्त्यावरच ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत सोमवार बाजाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. गत वर्षात कोरोना येण्यापूर्वी नागरिकांच्या विरोधानंतर उपरोक्त बाजार बंद पाडण्यात आले.
यानंतर पुन्हा रामेश्वरी रोडवर बेकायदेशीररित्या हा बाजार सुरू झाला. तसेच खसरा क्रमांक ५१/१, ५१/२ मौजा बाबुळखेडा काशीनगरात नागपूर महानगर पालिकेचे चार ते पाच तुकडयांमध्ये मोकळे भूूखंड आहे. ही जागा मंजुरी विकास योजनेत भाजी बाजार आरक्षणा खाली आहे. ही जागा प्रशासनातर्फे भाजीपाला बाजारासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, तुकडयांमध्ये असलेला हा भूखंड कोणत्याही पद्धतीने बाजारासाठी योग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

तसेच या भूखंडाचा वापर सध्या असामाजिक तत्वांकडून होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या मोकळया पट्टयात जर दवाखाना, शाळा, .बगिचा, क्रीडा संकुल (खेळाचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, स्वीमिंग पूल, जाॅगींग ट्रॅक आदी), वाचनालय, समाजभवन इत्यादी साठी करावा, या मागणीसाठी परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून निवेदन देत आहेत.

उपरोक्त भाजी बाजाराचे आरक्षण रद्द करण्याबाबत प्रभाग क्रमांक-३३ च्या नगरसेविका विशाखा शरद बांते (भाजप), नगरसेवक मनोज गावंडे (काॅंग्रेस), नगरसेविका भारती विकास बुंदे (भाजप) व सुश्री. वंदना भगत (भाजप) चारही नागरसेवकांचे पत्र जोडून नागरिकांनी गत वर्षी सविस्तर निवेदन तत्कालीन महापौर संदीप जोशी यांना दिले होते. त्यावर महापौरांनी बाजार दुकानदारांना पर्यायी जागा देण्याचे कबूल केले.मात्र, कोरोनाचा काळ आल्यानंतर उपरोक्त मागणीची पूर्तता झाली नाही.

भगत यांनी मग ते पत्र का दिले?

अशातच नव्याने धंतोली झोनच्या सभापती स्थनिक नगरसेविका वंदना भगत या धंतोली झोनच्या सभापती झाल्यानंतर त्यांनी हा विषय उकरुन काढला. त्यांनी बाजार उपरोक्त भूखंडात भरविण्याचा निश्चय केला.

तसेच महोपौरांना जागेची पाहणी करण्यास बोलवले. मात्र स्थानिकांना बाजार हवे नसल्याने त्यांचा विरोध कायम होता.
शुक्रवारी सकाळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी उपरोक्त जागेची पाहणी केली. याप्रसंगी सभापती वंदना भगत, नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे, माजी नगरसेवक शरद बांते यांची उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी पाहणी केल्यानंतर दाट वस्तीत असलेल्या उपरोक्त जागेचा वापर बाजारासाठी करू नये हा विषय भूपेंद्र (गोलू) बोरकर, संजय वर्मा, डॉ. विक्रम कांबळे, डॉ. मधूकर मून,दिपाली कांबळे, सुरेश मुन, अमिय पाटील, भूषण भस्मे, शिरीष जंगले, रजनी पाटील, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, रवि रामटेके, अमित उपासक, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदिंनी लावून धरला.

दरम्यान, जर भगत यांना बाजाराचा विरोध नव्हता तर त्यांनी ते पत्र तत्कालीन महापौरांना का दिले? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.त्या सभापती आहेत,कामे झाली पाहिजे असा त्यांचा हेतू जर असेल तरी त्यांना हवे म्हणून त्यांनी नागरिकांवर बाजार लादण्याच जबरदस्ती करु नये,असा इशारा येथील नागरिकांनी दिला.
वंदना भगत यांच्याशी ‘सत्ताधीश‘ने त्यांची बाजू ऐकायला संपर्क केला असता कॉल उचलला गेला नाही.

आधी भूखंड नियीमत करा-

नागरिकांच्या मते आरक्षीत जागेवर मोठया प्रमाणात रहिवाशी भूखंड असून ९० टक्के घरांचे वास्तव्य आहे. आणि सर्व भूखंड धारकांनी हजार रूपये भरून भूखंड नियमित करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडे गुंठेवारी अंतर्गत अर्ज सादर केलेले आहे. परंतु, या ठिकाणी व्हेजीटेबल मार्केटचे आरक्षण असल्यामुळे परिसरातील भूखंडाचे नियमीती करण झाले नाही. नुकतेच महाराष्ट्र शासनाने नासुप्र प्रन्यास ऐवजी नियोजन प्राधिकरण मनपा कार्यालयाकडे देण्यात अाल्यामुळे सदर जागेवरील आरक्षण हटवून या लोक वस्तीला नियीमत करावे अशी मागणी नागरिकांनी केली.

मात्र, अशातच सभापती यांनी उपरोक्त जागेवर बाजार आणनार अशी भूमिका मांडल्यानंतर स्थानिक रहिवासी संतप्त झाले. यापूर्वी बाजार हटविण्यासंदर्भात पत्र दिल्यानंतर पुन्हा बाजार बसविण्याची भूमिका भगत यांनी घेतल्याने नागरिकांचा रोष वाढला. दाट वस्तीत पुन्हा बाजार बसले तर अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागेल असेही नागरिक यावेळी म्हणाले.

यावेळी नारेबाजी करून काशीनगर रहिवासी कृती समितीच्या राहिवसीयांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

मनपाच्या बुलडोजरसमोर महिलांचा ठिय्या-

महापौर गेल्यानंतर काही वेळातच मनपाचे बुलडोजर मोकळ्या भूखंडाला समतल करण्यास पोहोचले. मात्र, स्थानिक महिलांनी बुलडोजर समोर येऊन मनपाचे काम होऊ दिले नाही. जो पर्यंत या बाजाराचा प्रश्न निकाली लागत नाही तो पर्यंत काम होऊ देणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली. यावेळी जोरदार नारेबाजी सुद्धा करण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या