

भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू
स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षी देखील शासकीय रुग्णालयात फायर अलार्म सिस्टिम नाही!
भंडारा,दि.९ जानेवारी: भंडा-यातील शासकीय जिल्हा रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री दीड वाजता १० नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली.या घटनेने समाजमन सुन्न झालं असून स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षी देखील आम्ही जर ग्रामीण किवा जिल्हा पातळीवरील शासकीय रुग्णालयात नवजात बालकांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी सज्ज करण्यात आलेल्या कक्ष्ात साधी अलार्म सिस्टिम देखील बसवू शकलो नाही,याचा अर्थ राजकारणी व प्रशासनाच्या नजरेत गोर गरीब जनतेच्या प्राणाचे किती मोल आहे,हे लक्ष्ात येतं.या घटनेनंतर अनेक वाहिन्यांवरील चर्चेत देशातील अनेक बालरोगतज्ज्ञ हेच सांगत होते,नवजात बालकांना अनेक संयंत्रणेत ठेवल्या जात असल्यामुळे तिचे विजेचा अतिरिक्त दाब असतो,देशातील खासगी रुग्णालयांमध्ये याबाबची दक्ष् ता घेत अश्या कक्ष्ात अलॉर्म सिस्टिम व आगीवर नियंत्रणासाठीची संपूर्ण तंत्रे बसवली जात असतात.मग शासकीय रुग्णालयांमधील निष्पाप जीवांनाच एवढे स्वस्त मरण का?

ही बालके अक्ष् र शहा त्या काळ्याशार धुक्यांमध्ये काळीठिक्कर पडली होती.मरताना त्यांना वेदना ही सांगता आली नसावी.गुदमरुन त्यांचे प्राण गेलेत.रात्री दोन वाजता तेथील परिचारिकेला त्या कक्ष्ातून धूर बाहेर निघताना दिसला.तिने लगेलच जवाबदार अधिका-यांना माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे.मात्र असे घडले असते तर कक्ष्ातील सुरक्ष्ा रक्ष क ,जिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावर असणारा डॉक्टर यांनी वेळीच धावपळ करुन दहा जिवांना वाचवण्यासाठी प्राणाची शर्थ का लावली नाही?असा विलाप आता मृत बालकांच्या जन्मदात्यांचा व नातेवाईकांचा ऐकू येत आहे.
यातील एक बालक तर या १२ ता.एक महिन्याचा होणार होता.एकाचे वजन हे १ किलो ३०० ग्रामच भरल्याने त्याला काचेत ठेवण्यात आले होते.असे एक नव्हे तर १७ बालके त्या कक्ष्ात जगण्यासाठी उपचार घेत असताना संवेदना हरवलेल्या व्यवस्थेने त्यांची जणू ‘हत्या’ केली….खून केला!१७ पैकी ७ बालकांचा जीव वाचवण्यात यश मिळाले ,हे ही नसे थोडके मात्र १० नवजात शिशू..ज्यांना त्यांच्या मातांनी ९ महिने मोठ्या आशा आकांक्ष्ेनी गर्भात वाढवले होते…वजन कमी भरणे किवा इतर काही विकारांमुळे त्यांच्या काळजाच्या तुकड्यांना त्या कक्ष्ात जिवनदान देण्यासाठी भर्ती करण्यात आले होते.मात्र त्यांच्या वाट्याला शनिवारच्या त्या बेसूर रात्रीत आला काळाशार जीवघेणा धूर…..!गुदमरुन टाकणारा…!किती यातना झाल्या असतील त्या निष्पाप अजाण जिवांना…जिवाच्या आकांताने ते रडले असतील…ओरडले असतील मात्र….गेंडयाची कातडी पांघरलेली..सडली.गळलेली प्रशासकीय व्यवस्था…यांना ती ऐकूच गेली नसावी!

हेच सरकारी डॉक्टर्स,परिचारिका,सुरक्ष्ा रक्ष क,लाखोंचा पगार उचलतात,कर्तव्याची पोल मात्र अश्या दूर्देवी घटना घडल्यावरच उघडते…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेच पीडीत कुटुबियांना ५ लाखांची मदत देणय्ाचे आश्वासन दिले.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील दोषींवर कारवाई करण्याचा सूतोवा केला.मात्र त्या ओल्या बांळतीणींच्या विलापाला यातील काहीही नको आहे…त्यांना फक्त त्यांचे निष्पाप बाळ हवेत जे त्यांनी शासनावर विश्वास ठेऊन यंत्रणेवर सोपवले..ज्यांना ९ महिने गर्भात घडवले…ज्यांच्या दूधाचा पान्हा झरझर फूटून वाहत होता…..मात्र आता ते अमृत पिण्यापूर्वीच गेल्या ७० वर्षांच्या सडल्या गळल्या सरकारी व्यवस्थेने त्यांच्या पाडसांना गुदमरुन मृत्यूच्या दाढेत ढकळले…..!
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत महाविकासआघाडी सरकाच्या कारभारावर ताशेरे ओढले तर सत्ताधारी नेत्यानंी फडणवीस यांच्याही काळात कश्याप्रकारे १५ मार्च,१६ जुलै,२७ जुलैला दूर्घटना घडल्या,याची यादी सांगितली!

वाहीन्यावर या मातांचा आक्रोश कोणत्या ही संवेदनशील मनाच्या माणसाला हेलावून टाकणारा होता.ओळी बांळतीण असल्याने डोक्याला पट्टी बांधलेल्या एक माऊलीच्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते तर इतरांचे नातेवाईक सांगत होते,रात्रीच्या ४ वा.पासून आम्हाला रुग्णालयाच्या फाटकाजवळ फक्त बसवून ठेवण्यात आले आहे.कोणी काहीच सांगत नाही आहे.
शॉर्ट सर्कीटमुळे नवजात बालकांच्या त्या कक्ष्ात आग लागल्याचे सांगितले जात आहे मात फायर अलॉर्म बसवला असता तर त्या सायरनच्या आवाजाने रुग्णालयात त्यावेळी उपस्थित मानव जात नक्कीच त्या निष्पाप ज़ीवांना वाचवण्यासाठी धावली असती मात्र…जेव्हा धूर कक्ष्ाच्या बाहेर दारांच्या फटीतून बाहेर पडला…पेंगाळलेल्या परिचारिकेला दिसला असावा तोपर्यंत…फार उशिर झाला होता…खूप..खूप उशिर…!
सर्व आधी स्वत:चा प्राण वाचवण्यासाठी खाली धावले…एका बालकाच्या आईने टाहो फोडत सांगितले…मला वर जाऊन तान्हूल्याला वाचवण्यापासून रुग्णालयाच्या स्टाफने अडवले…वरती आग लागली आहे…कोणीही आता जाऊ शकत नसल्याचा सबबीखाली बसवून ठेवण्यात आले.
नंतर अग्निशमन दल आले मात्र…..त्या काळ्याशार धूराने तब्बल दहा प्राण तोपर्यंत गडप केले होते…कायमचे….!
करोनासारख्या महामारीतूनही आम्ही काहीच शिकलो नाही….!एकीकडे खासदार,आमदारांच्या पगारवाढ,भत्तेवाढ यासाठी एकी दाखवणारे
सारे राजकारणी कधीच संसदेत…जिल्हा…ग्रामीण पातळीवर…रुग्णालयात..नवजात बालकांच्या कक्ष्ेत फायर अलॉर्म बसवण्यात आले का हो?या मुद्दासाठी भांडतांना दिसत नाही…तब्बल ७० वर्षांपासून भारतीय जनतेला तरी दिसले नाही…..!
आता काही दिवस पुन्हा या दहा निष्पाप जीवांसाठी महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप…समिती..चौकश्या..निलंबन…फक्त एवढीच खानापूर्ती होईल मग पुन्हा…एखाद्या दुस-या दूर्देवी घटनेची वाट……!




आमचे चॅनल subscribe करा
