फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजननागपूरकर कलाकारांनी फूंकला एकीचा बिगूल

नागपूरकर कलाकारांनी फूंकला एकीचा बिगूल

Advertisements

नागपूरकर कलाकारांनी फूंकला एकीचा बिगूल


 आॅस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीच्या पहील्या बैठकीत विशद केले एकीचे महत्व

लॉक-डाऊनच्या काळात ऑकेस्ट्रा कलावंत सर्वात उपेक्ष्ति घटक:सरकारचे अर्थसहाय्य शून्य

ऑकेस्ट्रा कलावंताना सरकार आणि समाज दोघांनी सोडले वा-यावर:बैठकीत अनेकांच्या गाथा

नागपूर,ता.२४ डिसेंबर: जागतिक महामारी कोविड-१९ च्या संसर्गात समाजातील अनेक घटकांसोबत सर्वाधिक भरडला गेलेला घटक जर असेल तर तो ऑकेस्ट्रा कलावंत आहे.तब्बल आठ महिने या कलावंताच्या जगण्या-मरण्याच्या विदारक परिस्थितीकडे ना मायबाप सरकारने ना समाजातील दारशूरांनी ना कलावंतांच्याच मांदियाळीतील चांगल्या पगाराच्या नोकरदार कलावंतांनी या दीन-दलित,उपेक्ष्ति,गरजू,स्वाभिमानी कलावतांकडे लक्ष् दिले,ना मदत केली ना त्यांना स्वाभिमानाने जगवण्यासाठी हात पुढे केला,परिणामी नागपूरातील काही तरुण कलावंतांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र शासन दरबारी नुकतीच अधिकृत व नोंदणीकृत अशी ‘ऑस्कर सांस्कृतिक संगीत कला अकादमीची’नोंदणी केली,आज या संस्थेची पहीली बैठक अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे दूपारी २ वा.पार पडली.या बैठकीत उपस्थित कलावंतांनी एकीचा बिगूल फूंकला व या पुढे जगातील कोणत्याही संकटात सभासद सदस्यांच्या आर्थिक,सामाजिक,राजकीय तसेच आरोग्य संदर्भातील संघर्षात एकीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

याप्रसंगी मंचावर अध्यक्ष् पदी भिम-शक्तीचे विदर्भ प्रदेश सरचिटणीस पंकज मेश्राम उपस्थित होते तर ऑकेस्ट्रा म्यूझिकल विनर्सचे संचालक विजय कीर्तने,ऑकेस्ट्रा फनकारचे संचालक अब्बदूल जहीर,ज्येष्ठ ताल वादक अशोक ठवरे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना विजय कीर्तने यांनी संस्थेला शुभेच्छा प्रदान करताना ज्या तत्परतेने संस्थेने समाजातील गरीब,गरजू कलावंतांच्या स्वाभिमानासाठी शासन दरबारी नोंदणी केली,ती कौतूकास्पद असल्याचे सांगितले.यावरुन या पदाधिका-यांची कलावंतांच्या प्रती तळमळ दिसून पडते. संस्थेच्या प्रयत्नातून कलावंतांच्या समस्यांचे निराकरण होईल अशी आशा व्यक्त करीत नागपूरसह राज्यातील जास्तीत जास्त कलावंतांनी संस्थेचे सभासद होण्याचे आवाहन केले.संस्थेने शुल्क मात्र अल्प ठेवावे,लॉक डाऊन आणि झालेली उपासमार यामुळे साधे ७१० रु.शुल्क भरण्यासाठी देखील आता कलावंतांकडे पैसे नसल्याकडे त्यांनी लक्ष् वेधले.वार्षिक शुल्क घेण्याऐवजी प्रत्येकी १ रु.दररोज म्हणजे वर्षाचे ३६० रु. सभासदांकडून घेण्याची सूचना त्यांनी केली.माय बाप सरकार कलावंतांना मदत करते मात्र काही श्रेणींमध्ये,अनेक जाचक अटींवर,यातही ख-या कलावंतांऐवजी सरकार दरबारी ओळखीचे,सरकारी नातेवाईक,चाटूकार मंडळी ही मदत मध्येच लाटते.प्रत्येक कलाकाराला ही मदत मिळत नाही.परिणामी संस्थेच्या पदाधिका-यांनी प्रयत्न करावे प्रत्येक सदस्य कलावंताकडे योग्य वेळी योग्य ती मदत पोहोचेल,यात माझा कायम सहयोग राहील,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

अब्बदूल जहीर यांनी,आपल्या शहरात कलावंतांच्या भल्यासाठी संस्था अाधी पण निर्माण झाल्या होत्या,नष्ट ही झाल्या याकडे लक्ष् वेधत झाले-गेले विसरुन पुढे चालावे असा संदेश दिला.या पूर्वीचे जे कोणी कलावंतांच्या संस्थांचे संचालक होते त्यांना त्यात कोणताही वैयक्तिक लाभ नव्हता,यात माझा ही समावेश आहे.मी देखील दहा वर्षे अश्‍याच एका कलावंतांच्या संस्थेचे संचालन केले मात्र अनेक कटू अनुभव आल्यानंतर संस्था विसर्जित केली.तुम्हाला देखील या संस्थेचे सदस्यत्व घ्यायचे असेल तर आपण या संस्थेकडून फक्त घेणे लागतो,हे विसरुन जावे.आपण या संस्थेला फक्त देणे लागतो या भावनेतून सदस्य व्हा,आर्थिक नाही तर शारिरिक,बौद्धिक,वैचारिक श्रम द्या मात्र आशा ठेऊ नका.कलावंतांचा कोणताही धर्म नसतो.‘कलावंत हा धर्मच जगात सर्वश्रेष्ठ आहे’आम्ही बौद्ध मठ,साई मंदिर,गुरुद्वारा,दरगाह सर्व ठिकाणी सरख्याच श्रद्धेने कला सादर करतो.संपूर्ण आत्म्याने आपल्या कलेप्रती नतमस्तक होतो.आपण या जगात धर्मापेक्ष्ा ही श्रेष्ठ अश्‍या ‘कलावंत धर्मामध्ये’ आपली गणना होते त्यामुळे एवढ्या महान धर्माप्रमाणे वागणूक ठेवण्याचा प्रयत्न करा,असा सल्ला त्यांनी दिला.कलाकार म्हणून आपले पावित्र्य जपा,आपले पुन्हा जुने वैभव परत येईल असे सांगून करोनाला खरे तर धन्यवाद दिले पाहिजे किमान या विषाणूने आपल्याला एकत्रित तर आणले,असे ते म्हणाले.

पंकज मेश्राम यांनी संघटनेचे,एकीचे महत्व विशद करताना संघटनेने असे काम करुन दाखवावे की पुढल्या काळात राज्यातील कलावंत तुमचा पत्ता विचारत घरी येतील,या संस्थेत आज जे सात पदाधिकारी आहेत त्यांच्या जागी संस्थेतील इतर सदस्यांना पुढल्या काळात जवाबदारी सोपवता आली पाहिजे,एवढी लोकशाही संस्थेत असावी.आज संस्थेने नागपूरातील कलावंतांसाठी बैठक घेतली तसेच पुढील वेळी विदर्भातील तर त्या पुढे राज्यातील कलावंतांसाठी बैठक आयोजित करावी.सरकार दरबारी सांस्कृतिक संचालनालयातर्फे कलावंतांसाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यात ऑकेस्ट्रातील कलावंत मात्र शासकीय निकषात बसत नाही.लावणी,गझल,नाट्य ,कव्वाली इ. सर्व क्ष्ेत्र सरकारला चालतात पण ऑकेस्ट्रातील कलावंताला मायबाप सरकार कलावंत मानत नाही.ऑकेस्ट्रातील नृत्य कलावंत,गायक,वादक, बॅक स्टेज कलावंत,निवेदक हे कलावंत नसतात का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऑकेस्ट्रा कलावंताना खरे तर शासनाने आर्थिक मदत द्यायला हवी होती.आरोग्य विमा,त्यांच्या पाल्यांची फि माफी,कलाकारांना नोकरी व शिक्ष् णात देखील दोन टक्के का होईना आरक्ष् ण मिळाले पाहिजे.हे सर्व संघटनेमार्फत साध्य होऊ शकते.संघटनेचे सदस्य होऊन आमचा काय फायदा?असा कोता विचार न करता,इतके वर्षे कलाकार म्हणून जगलो काय फायदा झाला?असा सवाल त्यांनी केला.या पुढे सभासद होऊन कलाकारांसाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

पुणे-मुंबईमधील मोठमोठ्या संघटनेशी जुळलेले काही महाभाग कलावंत नागपूरात देखील आहेत मात्र त्यांनी कधीही विदर्भातील कलावंताच्या भल्यासाठी त्यांच्या संघटनेत एक शब्द ही उच्चारला नाही.अश्‍या सदस्याचा फायदा काय?आपण पुणे-मुंबईतील कलावंतांच्या संघटनेचे सभासद आहोत,ही माहिती विदर्भातील कलावंतांपासून का लपवून ठेवली?या संस्थेशी खरे सभासद जोडा असा सल्ला देत,आपापसातील भांडणे स्वत:पुरती ठेवा,कुटुंबावर याचा परिणाम होऊ देऊ नका,असे सांगत नुकतेच करोना काळात नागपूरातील ज्येष्ठ गायक विजय चिवंडे यांचा करोनामुळे दूर्देवी मृत्यू झाला,आज त्यांच्या कुटुंबियांकडे कोणाचे लक्ष् आहे?त्यांचे पाल्यांच्या शिक्ष् णाचे काय होत आहे?अशी उद्धवीग्नात त्यांनी व्यक्त केली.

रमाई घरकूल योजना ही अनूसूचित जातीसाठी तर पंतप्रधान घरकूल योजना ही सर्वांसाठी असते.किती कलावंतांनी शासन दरबारी या योजनेसाठी आवेदन केले?याची यादी ऑस्कर संघटनेने आता काढावी,नागपूर महानगरपालिकेचे महापौर तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे ऑकेस्ट्रा कलावंतांसाठी विशेष बाब म्हणून योजना लागू करावी,असे निवेदन देण्यात यावे,ग्रामीण भागात जिल्हा परिषदचे अध्यक्ष् तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दय्ावे.संघटनेतील सदस्यांना प्रमाणपत्र द्यावे.एस.टी.बसेसमध्ये कलावंतांना सूट मिळावी यासाठी प्रयत्न करावे.नागपूर शहरात केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचे वास्तव्य आहे.पालकमंत्री नितीन राऊत आहेत.त्यांच्याकडे संघटनेने निवेदन घेऊन जावे.महिलांसाठी एवढ्या योजना सरकारकडून राबविल्या जातात.महिला व बाल कल्याण मंत्री ॲड.यशोमती ठाकूर या आपल्या विदर्भातीलच आहेत.त्यांच्याशी संपर्क साधून महिला कलावंतांनी योजनांचा लाभ घ्यावा,असा सल्ला मेश्राम यांनी दिला.या पुढे देखील संघटनेच्या संपूर्ण पुढील यशस्वी वाटचालीत सहयोग करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

याप्रसंगी उपस्थित अनेक ज्येष्ठ ऑकेस्ट्रा कलावंतांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुप्रसिद्ध निवेदक रज्जाक भाई यांनी ‘ताल्लुकात बढ जाये तो गम मिलते है..इसलिये हम अब लोगो से कम मिलते है’अश्‍या चिरपरिचित शायरीतून मनोगत व्यक्त करताना लॉक डाऊनच्या काळात ते स्वत: कार्यक्रम तसेच उत्पन्ना अभावी नैराश्‍यात गेल्याचे कबूल केले. मानसिक संतूलन गमावून बसील का?अशी स्थिती उद भवली होती. आज सगळे एकत्रित आल्याचे बघून आशा पल्लवीत झाली असल्याचे ते म्हणाले.एक कलाकार हजारोंचे मनोरंजनक करतो मात्र हजारो मिळून एका कलाकाराच्या घरात,जीवनात डोकावून बघू शकले नाहीत,अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कलावंत विजय मधूमटके यांनी नागपूर शहरात काही मोठ मोठे नोकरदार कलावंत होते,ऑकेस्ट्राचे संचालक ही होते मात्र अनेकांनी गरीब,गरजू कलावंतांच्या भूकेकडे,जिवनाच्या संघर्षाकडे दूर्लक्ष् केले.यातील फक्त पाच संचालक ही पुढे आले असते तर किमान एक लाख रुपये जमा होऊ शकले असते,त्यातून ९० टक्के गरजू कलावंतांना अाधार मिळाला असता,मी स्वत: अनेक गरजू कलावंतांना रेशन कार्डचे वाटप करण्यात पुढे सरसावलो असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र ही मदत तुटपूंजी होती.सर्वानीच एकत्रित यायला हवे होते,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

अजय पातरे यांनी बित गई उसे छोड देते है,असे सांगत देशातील फक्त एका व्यक्तिमुळे ९९ टक्के जनतेने शिक्ष्ा भोगली असा अप्रत्यक्ष् वार पंतप्रधान मोदी यांच्यावर केला.२२ मार्चच्या त्यांच्या लॉक डाऊनच्या घोषनेतून कलाक्ष्ेत्र उधवस्त झाले.ते आजतागत सावरले नाही.आपण असंगठीत असल्यामुळेच सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही.मुंबईत घरकूलसाठी सरकारल तेथील कलावंतांना ५० टक्के सबसिडी देते,विदर्भातील कलावंताना ती का मिळत नाही?आज संघठित होऊनच आपले आर्थिक,सामाजिक व राजकीय समस्या सूटू शकतात.एकत्रित आलो तर आपली पुढली पिढी ही कला क्ष्ेत्रात कलेची साधना करण्यास पुढे येईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.बिहारच्या निवडणूकीत चार लाखांची गर्दी सरकारला चालते.नुकतेच नागपूरमध्ये एका आमदाराच्या घरी लग्नात हजारो राजकीय नेते एकत्रित विना मास्क येऊ शकतात मात्र कलावंत एकत्रित आले की करोना होतो!हजार राजकीय नेते मिळून एक कलाकार पैदा नाही करु शकत मात्र एक कलाकार एखाद्या राजकीय नेत्याला प्रसिद्धीचा उच्चांक गाठून देत असतो,असे परखड सत्य त्यांनी मांडले.

ज्येष्ठ गायिका निलीमा गावंडे यांनी आजच्या बैठकीत शहरातील जे अनेक प्रसिद्ध कलावंत अनुपस्थित राहीले त्यांना पुन्हा सन्मानाने पुढील बैठकीचे निमंत्रण देण्यात यावे,असा सल्ला दिला.कलाकारांचा ना धर्म असतो ना वर्ग, कलाकार हा पश्‍चिम नागपूरचा की उत्तर नागपूरचा,अशी वर्गवारी करता येत नाही.सर्वच कलाकारांना संघटनेशी जोडून घेण्यात यावे,असे विचार त्यांनी मांडले. तुमसर येथील ज्येष्ठ कलावंत सुरेंद्र मेश्राम यांनी शासनाला झूकण्यासाठी बाध्य करण्यासाठी संगठीत व्हावेच लागेल,सरकारच्या योजनांचा लाभ ऑकेस्ट्राच्या कलावंतांनाही मिळण्यासाठी संघटनेने पाठपुरावा करावा,असे मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकेत संघनेचे सचिव रितेश जाने यांनी लॉक डाऊनच्या काळात अनेक कलावंतांच्या घरातील विदारक आर्थिक स्थिती,एकमेकांना केलेली मदत,याविषयी भाष्य केले. सूत्र संचालन प्रमोद देशमुख यांनी केले.आभार कोषाध्यक्ष् संदीप मेश्राम यांनी मानले.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष् पी.कूमार,उपाध्यक्ष् प्रशांत खडसे,उपसचिव शेखर शामकूवर,सदस्य राजू गजभिये,संगीता गावंडे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या