Homeनागपूर न्यूजअतिवृष्टिमुळे दोघांचा दूर्देवी मृत्यू: बारा वर्षीय मुलगा गेला वाहून

अतिवृष्टिमुळे दोघांचा दूर्देवी मृत्यू: बारा वर्षीय मुलगा गेला वाहून

नागपूरात दूस-या दिवशीही पावसाचे थैमान

नागपूर,ता.२२ जुलै २०२४: शनिवारी २१ जुलै रोजी नागपूरात कोसळलेल्या मुसळधार पावसात विविध भागातील नाले हे ओसंडून वाहू लागले.परिणामी सर्वदूर परिसरांना नदीचे रुप आहे.यात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर श्रावण विजय तुलसीकर हा अवघ्या बारा वर्षीय मुलगा पूरात वाहून गेला.सुधा वेळूळकर(रा.श्रीहरी सोसायटी,नरेंद्रनगर)तसेच भोजराज बुलिचंद पटले अशी मृतांची नावे आहेत.

रविवारी देखील मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली.परिणामी,जनजीवन सामान्य होऊ शकले नाही.शनिवारी नाल्यांना पूर आल्यामुळे पाण्याचा निचराच होऊ शकला नाही.अनेक तास हे पाणी शहरातील अनेक परिसरात तुंबून राहीले.बेलतरोडी भागाला तर नदीचे स्वरुप आले होते.सर्वदूर रस्ते,वस्ती इत्यादी ठिकाणी पाणी साचून होते.हे पाणी बघण्यासाठी बेलतरोडी भागातील ८५ वर्षीय महिला सुधा वेळूळकर बेलतरोडी-बेसा रस्त्यालगतच्या नाल्याजवळ गेल्या मात्र,तोल गेल्याने त्या नाल्यात वाहून गेल्या.यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सेंट पॉल शाळेजवळील श्‍यामनगर परिसरातील नाल्यात आढळला.मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

दूसरी दूर्देवी घटना श्‍यामनगर पुनापूर भागात घडली.येथील भोजराज बुलिचंद पटले(वय ५२(हे नाल्याजवळ उभे असताना अचानक त्यांचा पाय घसरला.पाण्यात पडल्यानंतर पाण्याच्या प्रवाहासोबत ते वाहून गेले.त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला.पोलिसांनी मृतदेह मेयाे रुग्णालयात पाठवला.
भरतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहनबाबानगर परिसरात बारा वर्षीय मुलगा श्रावण विजय तुलसीकर नाल्याच्या बाजूने धावत येत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहात गेला.वृत्त लिहेपर्यंत मुलाचा शोध लागला नव्हता.
…………………..

Latest बातम्या