नागपूर पदवीधर निवडणूकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच गृहनगरातील सोले यांच्या बंडखोरीकडे लागले होते मात्र,अपेक्षेप्रमाणे पदवीधरचे माजी आमदार प्रा.अनिल सोले यांनी बंडखोरी कायम राखत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आता काँग्रसचे विद्यमान आमदार ॲड.अभिजित वंजारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यासह नागपूरात तिहेरी लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
मी ५ ऑक्टोबर रोजी जेव्हा निवडणूक अर्ज भरला होता तेव्हाच माध्यमांसमोर स्पष्ट केले होते,मी माघार घेणार नाही,त्या पूर्वी ही माझ्यावर टिकेची झोड उठत होती.ही उमेदवारी मी खूप विचार करुन लढत असल्याचे ते म्हणाले.हा माझा एकट्याचा निर्णय नाही.गिरीश व्यास यांच्यासारखे माजी आमदार तसेच अनेक पक्षनिष्ठ कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले.बडकस चौकातील पंडित बच्छराज व्यास यांना माल्यार्पण करुन त्यांचे आर्शिवाद मी घेतले.पं.बच्छराज व्यास हे जेव्हा संयुक्त विदर्भ होता त्या दोन्ही डिविजनच्या पदवीधर विधान परिषदेचे निवडून आलेले पहिले आमदार असून, भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.पं.दिनदयाल उपाध्ये यांनी जे ‘एकात्म मानव दर्शन’ ज्या कार्यकारीणी समोर मांडलं,त्या कार्यकारीणीचे अध्यक्ष पं.बच्छराज व्यास होते,अशी माहिती त्यांनी सांगितली.
त्यामुळे पदवीधर निवडणूक लढण्याचा जो निर्णय गिरीश व्यास तसेच आमच्या संपूर्ण कार्यकारिणीने घेतला आहे तो संपूर्ण विचारांती घेतला असल्याचे सोले म्हणाले.आज ४५ वर्षांपासून नागपूर शहर व जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम मी केलं.त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांसोबत माझे खूप आत्मीयतेचे व आपुलकीचे संबंध आहेत.या सगळ्यांच्या आग्रहामुळेच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला कारण प
क्षातील ‘निरंकुशता’ही पुढे जाऊन कुठे तरी घातक होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
निर्णय प्रक्रिया खालून वर व्हायला पाहिजे,वरुन खाली नाही!त्यामुळेच वरुन उमेदवारी घोषित होईल व कार्यकर्ते गपगुमान ते मान्य करतील,हे कार्यकर्त्यांनाच मान्य नव्हतं.म्हणून पदवीधरची निवडणूक लढणार असल्याचा निर्णय आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घेतला असल्याचे ते म्हणाले.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पदवीधर असो किंवा शिक्षण क्षेत्र,पदवीधरचा आमदार असताना मी भरपूर काम केले आहे.ही निवडणूक इतर निवडणूकीसारखी नाही.या निवडणूकीतील मतदार म्हणजे विविध संघटनेचा पदवीधर मतदार असतो.जे त्यांच्या विकासाकरिता काम करतात,विद्यार्थ्यांसाठी काम करतात,प्राथमिक,माध्यमिक शिक्षण क्षेत्रात काम करतात,एनसीबीसी असेल,तांत्रिक शिक्षण असेल,कौशल्य विकास असेल किंवा इतर कोणतेही उच्च शिक्षण असेल,संशोधन क्षेत्र असेल,या सर्व क्षेत्रात काम करणा-यांसोबत माझे जवळीकीचे संबंध असल्याचे सोले यांनी सांगितले.
त्या सगळ्यांचा आग्रह होता मी पदवीधर निवडणूक पुन्हा एकदा लढवावी,त्यामुळे मी हा निर्णय घेतला. विधान परिषदेचा सदस्य असताना मी माझ्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत बेरोजगारांसाठी काम केलं.अंशकालीन पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडले.डीएमएलटी करिता काऊंसिल निर्माण केली.पती-पत्नी एकत्रिकरण नोकरीच्या संदर्भात जिल्हा परिषद पातळीवर कसोशिने प्रयत्न करुन तो निर्णय करुन घेतला.तांत्रिक शिक्षणामध्ये ग्रामीॅण भागातील विद्यार्थी देखील सक्षम झाला पाहिजे यासाठी अनेक शाळांमध्ये संगणक शिक्षणाची सुरवात केली.ग्रंथालय सक्षम केलेत.सहकार क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या त्या क्रेडित कॉ.सोसायटी असो किंवा अर्बन काॅपरेटीव सोसायटी असो,बँक असो तिथेही काम केलं.शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन समितीपासून तर २०२० मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘नॅशनल एज्यूकेशन पॉलिसी’पर्यत सर्व उपक्रमांमध्ये अभ्यासपूर्ण सहभाग घेतला.माझा या क्षेत्राशी जीवाभावाचा संबंध असल्यानेच कार्यकर्त्यांनी पदवीधरची निवडणूक लढण्याचा आग्रह धरला.त्यांच्या आग्रहामुळेच मी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मला विश्वास आहे नागपूर जिल्ह्यातील सुज्ञ पदवीधर मतदार.ज्येष्ठ,श्रेष्ठ शिक्षक,मार्गदर्शक,शिक्षणावर विश्वास असलेले प्राध्यापक,विभिन्न आयटी क्षेत्रात काम करणारे मतदार,विविध प्रतिष्ठांनामध्ये काम करणारे कर्मचारी मतदार,अर्बन असो किंवा राष्ट्रीयकृत बँकमधील पदवीधर मतदार,विविध शासकीय संस्थांपासून मॉईलमध्ये कार्यरत अधिकारी,कर्मचारी,वकील वर्ग,वैद्यकीय डॉक्टर्स,अभियंते,कंत्राटदार तसेच पत्रकार हे देखील माझ्या पाठीशी राहील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक बटण दाबण्याची नसून ‘१’लिहण्याची आहे.पसंदीक्रम देण्याची निवडणूक आहे.माझा विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांची प्रेरणा,सहकार्य,परिश्रम व ज्येष्ठांचा आर्शिवाद,सुज्ञ मतदारांनी दिलेला कौल हा २३ ऑक्टोबर मतदानाच्या दिवशी निश्चितपणे माझ्याच बाजूने राहील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नैतिकता स्वीकारुन प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा: गिरीश व्यास
याप्रसंगी बोलताना,माजी आमदार गिरीश व्यास म्हणाले की,सोले यांची उमेदवारी ही बंडखोरी नाही.या निवडणूकीत कोणताही पक्ष लढत नसतो,पक्ष चिन्ह नसतं,बॅनर नसतं,उमेदवारा समोर पक्ष चिन्ह नसतं तर फक्त त्यांची नावे आणि पसंदी क्रमांक असतात.त्यामुळे याला पक्षासोबत बंडखोरी म्हणता येत नाही.आधीच्या २०२० च्या निवडणूकीत संदीप जोशी यांना उमेदवारी घोषित झाली त्यावेळी आम्ही शांतपणे पक्षाचा निर्णय स्वीकारला.सगळ्यांनी मिळून काम केलं मात्र,त्या निवडणूकीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.यंदा पुन्हा निवडणूक जाहीर होण्या पूर्वी अनिल सोले यांनी पक्षातील शीर्षस्थ नेत्यांना ते ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते.मी हा मतदारसंघ शंभर टक्के पुन्हा भाजपकडे ओढून आणेल,माझ्या नावाचा निश्चित विचार करा,त्यांनी फार पूर्वी पासून सर्व जिल्ह्यात प्रचाराची तयारी ही पूर्ण केली.तरीही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही.त्यामुळे सोले यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्धार कयम ठेवला.
आम्ही सर्व जण त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे गिरीश व्यास यांनी सांगितले.ही निवडणूक छोटी निवडणूक नाही,प्रचाराची निवडणूक ही नाही तर मतदारांच्या संपर्कात राहण्याची निवडणूक आहे.ही निवडणूक सहा जिल्ह्यांची निवडणूक आहे.गडचिरोलीपासून तर उमरेडपर्यंतच्या अवघ्या १२ दिवसात पदवीधर मतदारांशी संपर्क साधायचा आहे.
ही निवडणूक आपण जिंकण्यासाठी लढत आहोत,हरण्यासाठी नाही,असे आवाहन व्यास यांनी कार्यकर्त्यांना केले.
दोन आमदारांनी पक्षाशी फारकत घेल्याचे वृत्त प्रसारित होत आहे मात्र,आम्ही आमची नैतिकता स्वीकारली असून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे व्यास यांनी सांगितले.पण पुढे जेव्हा केव्हा पुन्हा निवडणूका येतील तेव्हा आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते म्हणून पक्षासाठी कार्य करु,अशी पुश्ती त्यांनी जोडली.कोणी आम्हाला रोखू शकत नाही,तो अधिकार आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही कारण ते नातं आमच्या रक्तात आहे,ते तसंच कायम राहील.मात्र,पदवीधरच्या निवडणूकीत पक्षश्रेष्ठींनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला ती पद्धत योग्य नसल्याची टिका याप्रसंगी गिरीश व्यास यांनी केली.सोले यांनी आपली उमेदवारी कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी कायम ठेवली आहे,आम्हाला दोघांनाही अनेक प्रकारचे ऑफर आले पण आम्ही आमची भूमिका सोडली नाही.
याप्रसंगी माजी उपमहापौर सुनील अग्रवाल,नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु गौरीशंकर पाराशर,माजी प्र.कुलगुरु संजय दुधे आदी यांनी देखील मत मांडले.
प्रचार कार्यालयाच्या उद् घाटनापूर्वी सोले यांनी पं.बच्छराज व्यास यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले व कार्यालयात प्रवेश केला.समर्थकांनी जोरदार फटाके उडवून प्रचाराचा श्रीगणेश केला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)