Advertisements

‘जनसेवा सप्ताह’ निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीमध्ये आज नागपूरकरांच्या व कार्यकर्त्यांच्या जनसागराने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची अजिबात तमा न बाळगता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध रॅली काढून आपले लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
ही महारॅली दुपारी २:३० वाजता सीताबर्डी येथील ऐतिहासिक व्हेरायटी चौक येथून सुरू होऊन संविधान चौक येथे पोहोचली. मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रॅलीमध्ये अजितदादा पवार यांच्या समाजोपयोगी कार्याची व विकासात्मक उपक्रमांची माहिती देणारे १० विशेष सजवलेले देखावा वाहने (Display Vehicles) नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
रॅली संविधान चौकात पोहोचल्यानंतर परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदराने माल्यर्पण करून रॅलीचा अधिकृत समारोप करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष बजरंग सिंग परिहार, रमेश फुले, रमण ठवकर, जानबाजी मस्के, विशाल खांडेकर, राजकुमार नागुलवार, ब्रह्मानंद मस्के, मुकेश रेवतकर, माधुरी पालीवार, मंगेश मेंढे, राजेश समर्थ, राजू मिश्रा, संतोष भुजाडे, पुंडलिक राऊत, किरण झाडे, भूषण हरडे, सुरेश करणे, नितीन ढेंगे, मनोज जरेल, बोला पटेल, रवींद्र वाट, अमरपाल सिंग राजपूत, कुलवंत सिंग बामरा, रूपाली पिचकाटे, अमित पिचकाटे, विश्वास सेलसूरकर, निसार अली, आशिष खुबाडकर, रमेश कांबळे, शेखर वैरागडे, राहुल वायरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल, नागपूर जिल्ह्याचे निरीक्षक खासदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या जनसेवा रॅलीमध्ये पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, प्रदेश व शहर कार्यकारिणी सदस्य, फ्रंटल व सेल प्रमुख तसेच शालेय विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाने सहभागी झाले होते. पावसाचा जोर असूनही अत्यंत शांततेत आणि कायद्याचे पालन करत ही रॅली पार पडली.
रॅलीच्या समारोपप्रसंगी बोलताना श्रीकांत शिवणकर (कार्याध्यक्ष, नागपूर) यांनी सांगितले की, “अजितदादा पवार यांनी संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी वेधले आहे. ‘जनसेवा सप्ताह’च्या माध्यमातून दादांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा आणि सामान्य जनतेशी बांधिलकी जपण्याचा हा आमचा संकल्प आहे. आजच्या मुसळधार पावसातही कार्यकर्त्यांनी दाखवलेली निष्ठा हीच दादांवरील प्रेमाची पावती आहे.”
………………………………..