फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजटेनिस बॉल क्रिकेट, ज्युडो, बॅडमिंटन, पंजाकुस्ती आणि लॉन टेनिस स्पर्धा १३ जानेवारीपासून

टेनिस बॉल क्रिकेट, ज्युडो, बॅडमिंटन, पंजाकुस्ती आणि लॉन टेनिस स्पर्धा १३ जानेवारीपासून

Advertisements

खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर,९ जानेवरी २०२५: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून टेनिस बॉल क्रिकेट, विदर्भस्तरीय ज्युडो, विदर्भस्तरीय बॅडमिंटन, पंजा कुस्ती (आर्म रेसलिंग) आणि लॉन टेनिस या स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

सोमवारी १३ जानेवारीपासून नागपूर शहरातील विविध सहा क्रीडांगणांवर पुरुष खुल्या गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरु होतील. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ६ लाख ८४ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक डॉ. पीयूष आंबुलकर (8928646746) व समन्वयक  बादल राऊत (9595338156) यांच्याशी संपर्क साधावा.

विदर्भस्तरीय ज्युडो स्पर्धा १३ व १४ जानेवारी रोजी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय हनुमान नगर येथे पार पडेल. १९ वर्षाखालील, १५ वर्षाखालील आणि १२ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख १२ हजार २०० रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक  सौरभ मोहोड (9579117650) व समन्वयक  राजेंद्र सोनकुसरे (9168072347) यांच्याशी संपर्क साधावा.

१३ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सुभेदार सभागृह रवी नगर येथे होणार आहे. खुला गट पुरुष व महिला, १७ वर्षाखालील, १५ वर्षाखालील, १३ वर्षाखालील, ११ वर्षाखालील आणि ९ वर्षांखालील मुले व मुली तसेच प्रौढ गट ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील व ५५ वर्षावरील पुरुष आणि महिला गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक  सचिन देशमुख (9766893380) व समन्वयक  शांतनू येरपुडे (8698960440) यांच्याशी संपर्क साधावा.

१३ आणि १४ जानेवारी रोजी पंजा कुस्ती (आर्म रेसलिंग) स्पर्धा सक्करदरा तलाव परिसरात पार पडेल. पुरुष आणि महिलांच्या विविध  वजन गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ३२ हजार ७०० रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक श्री. सचिन माथने (9860440747) व समन्वयक  गुड्डु गुप्ता (9325657070) यांच्याशी संपर्क साधावा.

लॉन टेनिस स्पर्धा १३ ते १६ जानेवारी या कालावधीमध्ये राम नगर टेनिस कोर्टवर खेळली जाईल. खुला गट पुरुष एकेरी, दुहेरी आणि १६ वर्षाखालील, १४ वर्षाखालील, १२ वर्षाखालील, १० वर्षाखालील मुले, मुली एकेरी गटामध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ७२ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक  विशाल लोखंडे (9420855731) व समन्वयक  प्रगती पाटील (9890048737) यांच्याशी संपर्क साधावा.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या