Homeसांस्कृतिक / मनोरंजनरोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल गायकीने रंगली ‘संगीत रजनी’

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या सुरेल गायकीने रंगली ‘संगीत रजनी’

नितीन गडकरी यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन 

नागपूर, २६ मे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या बहारदार संगीत मैफिलीत प्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकर यांनी सुरेल गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली.

Advertisements
सुरुवातीला खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने नितीन गडकरी यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी कांचनताई गडकरी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर व अशोक मानकर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, अविनाश घुशे, किशोर पाटील, मनिषा काशीकर, भोलानाथ सहारे, विजय फडणवीस, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान डॉ. राजू मिश्रा, डॉ. सी. डी. मायी, प्रमोद पेंडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते.
‘मल्हार वारी’ या गीताने रोहित व जुईलीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर रोहितने
“माझे माहेर पंढरी”, अबीर गुलाल ही भक्तिगीत सादर केले. हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत,  पाहिले न मी तुला, मन उधाण वाऱ्याचे, हृदयात वाजे हे भावगीत सादर केले.

जुईली ने येळकोट, आदिमाया अंबाबाई, गोऱ्या गोऱ्या, अधीर मन, आताच बया ही गाणी सादर केली.
रोहितने नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, माझे लहानपण महाल भागात गेले. देशपांडे गुरुजीकडे पहिल्यांदा गाणे शिकलो. तेव्हापासून गडकरी साहेबांचे नाव कानावर पडत होते. ते देशातले अतिशय कर्तृत्ववान नेते आहेत. ते नागपूरचे आहेत याचा अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी गाण्यांची इच्छा आज पूर्ण झाली.

रोहित व जुईली ने रंजिश ही सही, चुपके चुपके, हंगामा है क्यों, काश कोई मंजर, मितवा या गझल तर फड सांभाळ तुऱ्याला, मथुरेच्या बाजारि, आई अंबाबाई गं यासारखी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीत तसेच हिंदी-मराठी चित्रपटसंगीताची रंगतदार मेजवानी सादर केली. सर्वच गीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
जुई जोगळेकर यांनी सादर केलेल्या देवीगीतांनी वातावरण भक्तिमय झाले, तर रोहित राऊत यांच्या दमदार सादरीकरणाने रसिकांना अक्षरशः ठेका धरायला लावला. दोघांनी सादर केलेल्या ड्युएट गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली.
आदिनाथ पातकर, किरण वेहेले, वरद कुलकर्णी, रत्नदीप जामसंडेकर, विपुल ढोले या वादकांनी उत्तम साथसंगत केली.
नितीन गडकरी यांच्या हस्ते रोहित राऊत व जुईली जोगळेकर  व वादकांचा सत्कार करण्यात आला.
रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले.
सर्वांच्या आशीर्वादामुळे चांगले काम करण्याची मिळते प्रेरणा – नितीन गडकरी 
सर्वांचे प्रेम आशीर्वादामुळे समाज आणि देशासाठी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. यापुढेही असेच प्रेम, सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा करतो, असे म्हणत नितीन गडकरी यांनी सर्वांचे आभार मानले.
………………………………
Advertisements
Advertisements

Latest बातम्या