फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशधाडसी महिला पत्रकार जिने एपस्टीन फाईल्स आणली जगा समोर

धाडसी महिला पत्रकार जिने एपस्टीन फाईल्स आणली जगा समोर

Advertisements
(एपस्टीन फाईल्स भाग-३)

एक १४ वर्षांची मुलगी पाम बीचच्या बाहेर उभी असते,ती आतून खूप हादरुन गेली आहे,भीतीने थरथर कापंत असते.तिच्या हातातील ३०० डॉलर तिचीच जणू थट्टा करीत होते.ते पैसे ज्याची तिच्या कुटूंबाला खूप गरज असते.पण,तिच्या वडीलांच्या वयाच्या एका अब्जाधीशने,तिचं सर्वस्व… अगदी तिचं बालपणही क्रूरतेने हिरावून घेतलेलं असतं.ज्याचं नाव असतं जेफ्री एपस्टीन.फक्त एक नाही,अश्‍या शेकडो चिमुरड्या ज्यांच्यासोबत हेच गुदरलं पण,जगाने आपले डोळे घट्ट मिटले होते.ना काही केले ना काही बोलले.कारण तो इतका प्रभावशाली होता की देशाच्या राष्ट्राध्यक्षापासून तर राजघराण्यातील प्रिंस हे देखील त्याच्यासमोर नतमस्तक होत होते.
पण,जे काम जगभरातील संपूर्ण वकीलांची प्रतिष्ठित चमू ही करु शकली नसती ते काम एका खूप सामान्य महिला पत्रकाराने करुन दाखवले. व्यवसायाने एक संघर्षरत पत्रकार व एकल पालक.ही गोष्ट आहे ज्यूली.के ब्राऊनची. जिने जेफ्री एपस्टीनसारख्या जगातील सर्वात प्रभावशाली प्रवृत्तीला दाखवून दिले की एक स्त्री जी संपूर्ण जबाबदा-या उचलू शकते ती, वेळ पडल्यास तलवार पण उचलू शकते.
ज्यूली.के.ब्राऊन मायामीच्या एका लहानशा न्यूजरुममध्ये बसली असते.आपल्या संपादकाचा नकार देणारा इमेल बघत असते ज्यात तिची आणखी एक शोध बातमी धुडकावण्यात आली असते.एक महिना आणखी तिचा कोणत्याही कामाशिवाय जात राहत असतो.ती एकल पालक असल्याने व पौंगडावस्थेतील एक मुलगा व एका मुलीच्या संगोपण,शिक्षणाची जबाबदारी तिच्यावरच असल्याचे चिंतेत असते,तिचा पगार गेल्या पाच वर्षांपासून वाढलाच नव्हता.तिचे सहकारी तिला ’द रिर्पोटर हूं चेसज द डेड स्टोरीज’संबोधत असत,ती कोणत्याही धोकादायक बातम्यांपासून आणि प्रभावशाली माणसांपासून सैव दूर राहत होती .किंबहूना कोणत्याही अश्‍या बातम्यांपासून दूर राहात होती जे तिच्या व तिच्या मुलांच्या जिवनावर वाईट प्रभाव पाडू शकेल.
तीन वर्षांपूर्वी तिने एका सिटींग काऊंसिल पुरुषाविषयी एक बातमी प्रसिद्ध केली होती.जो भ्रष्टाचार करीत होता.बातमी खरी होती पण एका आठवड्यातच जुलीच्या कारचे टायर फोडण्यात आले.रात्रीच्या २-२ वाजता तिला धमकावणारे फोन कॉल्स येऊ लागले.एक माणूस तर तिच्या मुलीचा शाळेपासून घरापर्यंत पिच्छा ही करु लागला.न्यूजपेपरने चुपचाप हे प्रकरण ठंड केले.ही बातमी नंतर गायब झाली.
तेव्हापासून ज्यूली अश्‍या अडचणीत आणणा-या बातम्यां टाळू लागली.स्थानिक गुन्हे किंवा लहान-मोठ्या बातम्या ती देऊ लागली पण असं काहीच नाही ज्यामुळे तिची पगार वाढ होऊ शकेल आणि तिच्या तुटपुंज्या प्रपंचाला आर्थिक हातभार लागेल.तिचा संपादक सातत्याने तिच्यावर नाराजी व्यक्त करीत होता.शोध पत्रकारिता आता तुला जमणार नाही म्हणून हिणवत होता.ती स्वत:ला ४२ वर्षाच्या वयात अप्रासंगिक व पत्रकार म्हणून कुठेतरी हरवत चाललेली समजू लागली होती.ती प्रभावशाली पुरुषांना घाबरत होती कारण तिला वाटत होतं ते नेहमीच जिंकत असतात आणि त्यांच्या ताकदीसमोर सत्य नेहमी पराभूत होतो.
पण,हे सगळं काही बदलणार होतं.एका शुक्रवारच्या दुपारी ती आपलं फाईलींचे कपाट स्वच्छ करीत असताना तिला एक जुना फोल्डर दिसतो.त्यात २००५ ची एक पोलिस रिपोर्ट असते.त्या रिपोर्टवर तपास अधिकारी मार्जिन मेक हे नाव लिहलं होतं.पिडीतेचे नाव लिहले होते व्हजिर्निया रॉबर्ट,वय अवघे १४ वर्ष!केस’डिसमिस’.आणखी एक नाव होते जे वारंवार दिसत होते आणि ते नाव होते जेफ्री एपस्टीन.जो राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व राजघराण्यातील प्रिसंचा खास मित्र होता.
या फाईलमधील ‘डिसमिस’शब्द वाचून तिला काही तरी वेगळं वाटू लागतं.ती एपस्टीनला गुगलवर सर्च करते.राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन,प्रिंस ॲण्ड्यू,प्रसिद्ध उद्योगपती,कलावंत,खेळाडू,अभिनेते,सेलिब्रिटी सगळ्यांसोबत त्याचे छायाचित्र असतात.एक असा अब्जाधीश ज्याच्याकडे खासगी बेट आहे,खासगी हवाई जेट आहे,न्यूर्याकमध्ये हजारो एकरमध्ये आलिशान बंगला आहे आणि एक खूप मोठ्या न्यू मेस्किको रँचचा तो मालक आहे.ज्युलीच्या शोध पत्रकारितेच्या कक्षापासून खूप…खूप दूरचा एक अब्जाधीश.
पण तो पोलिस अहवाल ज्यात अवघ्या १४ वर्षांच्या अनेक पिडीतांनी त्या ५३ पानांच्या अहवालात त्याच्यावर जे गंभीर आरोप केले होते,ज्युलीला अस्वस्थ करतात कारण ती स्वत: त्याच वयाच्या एका मुलीची आई असते.ती फाईल बघून पुन्हा बंद करुन ज्युलीने ठेऊन द्यायला हवी होती,कारण हेच तिच्यासाठी योग्य होतं.
मात्र,त्या रात्री ती तीन वाजेपर्यंत झोपू शकली नाही. हा विचार करुन की व्हर्जिनिया रॉबर्टची केस डिसमिस का झाली,अशी कोणती कारणे होती?ज्युली चूपचाप यावर संशोधन करण्यास सुरवात करते.गुप्तपणे जेवणाच्या सुटीत व रात्री जेव्हा तिची मुलगी झोपून गेलेली असते.तिला व्हर्जिनियाचे नाव २०१५ मध्ये एका फेडलर लॉ सूट मध्ये देखील दिसून पडतं,यातही गंभीर आरोप असतात एपस्टीन व त्याच्या सर्वाधिक प्रभावशाली मित्रांच्या विरोधात.लॉ सूटला थांबविण्यात आले होते.नंतर ही केस कायदेशीर दावपेचात दाबून टाकण्यात आली असते.यानंतर ही केस कोणत्यातरी अनडिस्कोल्ज अमाऊंसाठी सेटल झालेली दिसून पडते.

व्हर्जिनिया आता ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती.जगापासून लपून.स्वत:च्या जीवनाला सामान्य करण्याचा प्रयत्न करीत होती.ज्यूलीने तिला एका रात्री मेल केला.‘मी एक शोध पत्रकार आहे,मी एपस्टीच्या कोर्ट केसेसचा मागोवा घेत आहे,माझ्यावर विश्‍वास असेल तर माझ्याशी नक्की बोल’.तीन दिवस निघून जातात.ज्युलीला माहिती असंत ती बोलणार नाही.

तीन दिवस निघून जातात पण एका रात्रीच्या ४ वा.ज्युलीचा फोन वाजतो.कॉल एका ऑस्ट्रेलियन नंबरवरुन असतो.ज्युली समजून गेली हा व्हर्जिनियाचा कॉल आहे.तिचा आवाज कांपत होता,इतक्या वर्षांची वेदना तिच्या एकाच प्रश्‍नात दिसून पडतो.तू कोणाकाणोच्या विरोधात लिहणार आहेस?कारण ज्या-ज्यावेळी मी प्रयत्न केले मीच बर्बाद झाले.ज्युली काहीच वचन देत नाही,फक्त ऐकत असते.व्हर्जिनिया तिला सांगते १४ वर्षांच्या वयात तिला एका नामांकित नाव गिलेन मॅक्सवेल (एपस्टीनची भागीदार व गर्लफ्रॅण्ड)भेटली.तिने व्हर्जिनियाला ‘ला गो रिसॉर्ट टफ्लोरिडामध्ये मसाजचे काम दिले.गिलेननेच तिला तयार केले.गिलेनने तिला सांगितले की एक खूप श्रीमंत पुरुष आहे ज्याला तुला मसाज द्यायचा आहे.तिने मला सांगितले की २०० डॉलर दर तासाला कमावू शकते.मी खूप गरीब होते आणि मला पैशांची खूप गरज होती.गिलेनने तिला शिवकवलं की प्रभावशाली पुरुषांना खुश कसे केले जाते.
यानंतर व्हर्जिनियाचे जीवन नर्क बनले.चार वर्षापर्यंत १४ ते १८ वयापर्यंत जोपर्यंत ती ऑस्ट्रेलियाला पळून गेली नाही तोपर्यंत एपस्टीनसह जगभरातील प्रभावशाली पुरुषांनी तिचं शोषण केलं.खासगी बेटावर,हवाई जहाजांवर,न्यूयार्कच्या आलिशान बंगल्यात…सर्वदूर.मी ही गोष्ट आधी देखील अनेकांना सांगितली आहे.एफबीआयच्या तपास अधिका-यांना,खटला लढणारे वकीलांना,पत्रकारांना,पण कोणीही माझ्यावर विश्‍वास केला नाही.विश्‍वास केला तरी मला न्याय देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.त्याचे वकील कोणालाही उधवस्त करुन टाकतात जे कोणी त्याच्या विरोधात बोलत असतात.ते तुला ही उधवस्त करुन देतील…!ज्यूली थरथरणा-या हाताने आपला फोन खाली ठेवते.
ती आपल्या किचनमध्ये दिवे बंद करुन बसली असते.तिची मुलगी आत खोलीत झोपलेली असते.तिला याची खात्री असते ही एक शोध बातमी नव्हे हा एक ‘भूकंप’आहे.जर ती या बातमीवर काम करेल तर एक तर त्या शेकडो पिडीतांना न्याय मिळेल किंवा ज्युली व तिची मुले हे भयंकर अडचणीत येतील.ती आपल्या मुलीविषयी व तिच्या सुरक्षेविषयी विचार करते.नंतर ती व्हर्जिनियाचा विचार करते.अवघ्या १४ वर्ष वयात पाम बीचच्या बाहेर थरथर कांपणारी व्हर्जिनिया हिचा विचार करते.मग…ती एक निर्णय घेते.
ज्युलीला हे माहिती असतं की एका प्रभावशाली अब्जाधीशच्या विरोधात फक्त एका पिडीतेचे बयाण पुरेसे नाही.त्यांच्याकडे एक ताकतपूर्ण असे प्रशासकीय व अन्यायपूर्ण व्यवस्थेचे सैन्य आहे ज्यांनी दशकांपासून सर्व पिडीतांना गप्प बसवले आहे.ज्युली जुन्या पोलिस रिपोट्सचा शोघ घेऊ लागते.याच शोधात तिला कोटनी वाईल्स भेटते जिच्यावर १४ वर्षांच्या वयात पाम बीचवर एपस्टीनने बलात्कार केला होता.तिला मिशेल रिर्गाट भेटते जिला १५ वर्षांची असताना मॉडलिंगच्या नावाखाली पाम बीचवर नेण्यात आलं असतं.तिला एकानंतर एक अश्‍या अनेक पिडीत भेटत जातात ज्या आता वयाने ३० वर्षांच्या पार झालेल्या आहेत.
पण आतापर्यंत त्या ती वेदना घेऊन जगत आहेत जी त्यांना अगदी कोवळ्या वयात मिळाली होती.एपस्टीन कश्‍याप्रकारे त्याच्या मसाज खोलीत त्यांना हात लावत होता,त्यांचे फोटोज घेत होता, कुटूंबाविषयी विचारत होता.२००-३०० -५०० डॉलर्स कमविण्याच्या कहाण्या.इतके पैसे की कोणत्याही गरीब घरातील कुटूंबासाठी फार मोठा खजिना राहत होता.याशिवाय याच पिडीत मुलींकडून आणखी नव्या त्यांच्याच वयाच्या मुलींची मागणी एपस्टीन करीत होता.यासाठी त्यांना २०० डॉलर दिले जात होते.पिडीतांना रिक्रूर्टस बनविण्याच्या कहाण्या.विश्‍वासघाताच्या कहाण्या,पश्‍चातापाच्या कहाण्या जे कोणाच्याही जिवनातून कधीही जात नाहीत..
ज्युली आता १८-१८ तास काम करु लागली.रात्री फक्त ३ तास झोपू लागली.तिची मुलगी तिला दररोज डिनरसाठी घरी येण्यास सांगत होती.पण ज्युली या केसमुळे अस्वस्थ झाली होती.तिला एकच ध्यास होता,तिची रिर्पोट इतकी मजबूत झाली पाहीजे की एपस्टीन व त्याची प्रभावशाली माणसे ही या रिर्पोटला खोटी ठरवू शकणार नाहीत.ती आपल्या रिर्पोटमध्ये एपस्टीनच्या खासगी जेट विमानाला देखील समाविष्ट करते ज्याचं नाव होतं ’लोलिता एक्सप्रेस’जे लहान-लहान मुलींना जगभरात भ्रमण करवित होतं.ती त्याच्या खासगी बेटांच्याही संपत्ती रेकॉर्डचा मागोवा घेते.ज्याचं नाव होतं ‘लिटील सेंट जेम्स’पण स्थानिक या बेटाला ’पी-डोफाईल ’बेट संबांधित असत.यानंतर न्यूयार्कमधील न्यू मेक्सिको रँचचाही ती मागोवा घेते.एपस्टीनच्या अश्‍या सा-या मालमत्ता ज्या ठिकाणी सुनियोजिपणे लहान-लहान मुलींवर बलात्कार झाले होते.
याच दरम्यान तिला असा एक कागद मिळतो जे वाचून ज्युलीचा आत्मा देखील हलून जातो.तिला २००८ मधील ती प्ली- डील सापडते जी भ्रष्टाचाराचा महामेरु होती.अमेरिकेसारख्या देशात न्याय व्यवस्थेत इतका मोठा भ्रष्ट कारभार होणे असंभवच होते.एपस्टीनवर सेक्स ट्रेफिंकिंचे फेडरल चार्जेस होते. लहान-लहान मुलींवर लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे होते.असे गुन्हे ज्यात त्याला ४५ वर्षांच्या तुरुंगाची शिक्षा झाली असती.एफबीआयच्या तपास अधिका-यांकडे सगळे पुरावे होते.पिडीतांचे बयाण होते.फ्लाईट लॉग्सचा रेकॉर्ड होता,साक्षीदार होते पण एपस्टीनचे वकील एलन डर्शोविश व कॅलन स्टारने फेडलर प्रॉसिक्यूटर एलन डिकोस्टासोबत एक गुप्त समझौता केला.या डीलचं नाव होतं ‘द स्वीटहार्ट डील’.डील ही होती की एपस्टीन न्यायालयात दोन वेश्‍यावृत्तीसाठी प्रवृत्त करण्यासाठी पश्‍चाताप जाहीर करेल.फक्त १७ महिने तुंरुग भोगेल ते ही एका स्थानिक पोलिस ठाण्याच्या खासगी सेलमध्ये.त्याला आठवड्यातून ६ दिवस कामाची मुभा असेल जेणेकरुन तो त्याच्या कार्यालयात बसून त्याचे काम करु शकेल.
फेडरलचा तपास बंद झाला.पुरावे दाबून टाकण्यात आले.पिडीतांना या डीलविषयी कधी सांगितलेच गेले नाही जो ’क्राईम व्हिक्टम राईट्स एक्ट’चा स्पष्टपणे कायदा तोडणारा होता.ज्युली त्या अहवालाला तीन वेळा वाचते पण तिचा विश्‍वास बसत नाही.एक अब्जाधीश ज्याच्यावर लहान-लहान मुलींवर बलात्कार व इतरांना त्यांच्यावर बलात्कार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठीचे ठोस पुरावे हाते.मात्र,असा आरोपी तुंरुगा ऐवजी आठवड्यातून ६ दिवस हीच पापे करायला बाहेर राहू शकत होता!ज्या पिडीतांना त्याने बर्बाद केलं होतं त्यांना या अन्यायकारक डीलमधून काहीही मिळालं नाही.

ज्युलीला हे कळून चुकतं हे फक्त एपस्टीनविषयी घडत नाही तर अमेरिकेच्या संपूर्ण भ्रष्ट न्याय व प्रशासन व्यवस्थेवर एक फार मोठा प्रहार होता ज्यांनी एपस्टीचा बचाव केला होेता.ज्युली अखेर आपल्या संपादकांना दोन इंच जाड फोल्डर हातात घेऊन तिने केलेला हा संपूर्ण शोध दाखवते.संपादक तिला असं बघतो जसं की ती वेडी झाली आहे.एक अब्जाधीश आणि तो ही इतका प्रभावशाली!ज्युली तो हे संपूर्ण वृत्तपत्रच विक्रीला काढून टाकेल.आपल्याला विमा देखील मिळू शकणार नाही.ज्युली सगळा तपास,कागदपत्रे,प्ली डील्स,पिडीतांच्या मुलाखती सगळं त्याच्या समोर ठेवते.संपादक एक थंड श्‍वास घेतो व म्हणतो,ठीक आहे पण माझ्या काही अटी आहेत,प्रत्येक सत्याचे तीन पुरावे असायला हवेत,प्रत्येक आरोपांचे ठोस पुरावे असले पाहिजे आणि प्रत्येक शब्द हा आपल्या वकीलाकडून तपासला जाईल.एक चूक आणि सगळं काही संपेल.

ज्युली संपादकाच्या या सर्व अटी मान्य करते.पण आता ती आणखी खोलात जाऊन काम करते.तिच्या तपासाचा प्रत्येक शब्द वकील तपासत असतो.तिला वाटलं होतं ती सावधतेने काम करतेय पण तिला हे माहिती नसतं की एपस्टीनची माणसे तिच्या प्रत्येक गतिविधीवर लक्ष ठेवून आहेत आणि तिच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.आधी तिच्या इमेलवर एक धमकीचा मेल येतो ‘ड्रॉप द एपस्टीन स्टोरी,फायनल वार्निंग!’ज्युलीला वाटतं ही एक पोकळ धमकी आहे.पण यानंतर तिच्या घरासमोर एक काळी कार प्रत्येक क्षणी तिच्यावर नजर ठेऊन असलेली ती बघते.
एक दिवस ज्युलीची मुलगी घाबरुन घरी पळत येते.ती सांगते एक माणूस पुर्ण रस्त्यात तिचा पिच्छा करीत होता,तो काही बोलला नाही पण मला बघून कुत्सितसारखा हसत होता.ज्युली तुरंत पोलिसांना फोन करते.रिर्पोट तर बनून जाते पण कोणतीही कारवाई होत नाही.यानंतर खूप काहीतरी वाईट होतं.ज्युलीला तिच्या मुलीच्या शाळेतून एक आपातकालीन कॉल येतो.ज्युली वेड्यासारखी धावत तिच्या शाळेत जाते.प्राचार्याच्या कक्षात जाताच एक ब्लेझर घातलेली महिला तिला दिसते.ती महिला ज्युलीला सांगते की माझ्याकडे एक गुप्त तक्रार आली आहे की तू तुझ्या मुलीकडे व्यवस्थित लक्ष देत नाही आहेस,तू खूप रात्रीला घरी येतेस,तुझ्या कामांमुळेच तुझी मुलगी ही दूर्लक्षीली जात आहे.रिर्पोटनुसार तुझी मुलगी खूप संवेदनशील भावनिक ट्रॉमामधून जात आहे.ज्युलीला याचा मानसिक धक्का बसतो.ती विचारते,कोणी केली ही गुप्त तक्रार?पण ती महिला सांगते,गुप्त तक्रारीचे सूत्र सांगितल्या जात नाही.ज्युलीचे दोन तास आपली बाजू सांगण्यात खर्ची पडतात की ती गुप्त तक्रार ही खोटी होती,सुनियोजित होती आणि फक्त घाबरवण्यासाठी होती.साेशल वर्कर तिथून निघून जाते.प्राचार्य दिलगिरी व्यक्त करते मात्र,ज्युलीची मुलगी रडू लागते.ज्युली तिला समजवते,होतं असं कधी-कधी.गैरसमज होतात असे.मात्र,आता तिला खात्री झाली की एपस्टीन हे सर्व घडवून आणतोय.तो तिच्यापर्यंत हा निरोप पोहोचविण्यात यशस्वी होतो की,तू जर थांबली नाहीस तर…मी तुझ्या मुलीपर्यंतही पोहोचू शकतो.
त्याच रात्री ज्युलीच्या संपादकाला मेनहॉटनच्या एका खूप मोठ्या वकीली संघटनेकडून एक रेकॉर्डेड कॉल येतो. त्यात ते सांगतात की ते जेफ्री एपस्टीनच्या बाजूने बोलत आहे.तुम्ही जर त्यांच्या विरोधात एकही चुकीचा शब्द प्रसिद्ध केला,तर आम्ही तुमच्या संपादक,तुमच्या वृत्तपत्रांवर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची पत्रकार ज्युली ब्राऊनवर गंभीर खटले दाखल करु.रात्रीच्या ११ वा.संपादक ज्युलीला फोन करतो,त्यांना सगळं काही माहिती झालं आहे आपण काय करतोय?त्यांना कसं माहिती झालं?ज्युलीला खात्री पटते,ही माहिती तिच्या वृत्तपत्रीय कार्यालयातून फूटली आहे.आता ती ऑफिसला जाणे सोडून देते आणि घरुनच काम सुरु ठेवते.ती कोणावरही विश्‍वास ठेवीत नाही.
तिला खूप जरुरी कामामुळे ऑफिस जाण्याचे काम पडले तर तिचे सहकारी तिच्याशी बोलण्यापासून कचरत हाेते.त्यांना कोणालाही अश्‍या महिलेसाेबत दिसायचं नव्हतं जिने एपस्टीन नावाच्या राक्षसासोबत लढण्याचे ठाणले होते.ज्युलीचा एक वरिष्ठ पत्रकार सहकारी तिला बाजूला घेऊन जातो आणि तिला समजावतो,ज्युली तुझा हा शोध तुझ्यासाठी योग्य नाही.एकदा स्वत:च्या मुलीविषयी,स्वत:च्या कुटूंबासाठी तर विचार कर.ज्युलीवर आता खूप दबाव वाढला होता.तिला वाटू लागलं आता थांबण्यातच हित आहे,पण ती आता थांबू शकत नव्हती कारण व्हर्जिनियाचे शब्द तिच्या कानात आदळत असतात,‘जर तू थांबलीस तर ते लोकं पुन्हा जिंकून जातील!’
ज्युली एका स्टारबकमध्ये आणखी एका पिडीतेची मुलाखत घ्यायला जाते.अशी महिला जिच्यावर ती पंधरा वर्षांची असताना एपस्टीने बलात्कार केला होता.आता ती दोन मुलींची आई झाली असते व दशकांनंतर ती या विषयावर बोलण्यासाठी तयार झालेली असते.मुलाखतीच्या मध्येच त्या महिलेचा फोन व्हायब्रंट होतो.ती पाहते मोबाईल स्क्रीनवर तिच्या दोन मुलींचा फोटो आहे ज्या बगिच्यात खेळत होत्या.तिचा चेहरा पांढरा पडतो.ती फोन ज्युली समोर ठेवते.अनोळखी क्रमांकावरुन तो फोटो आलेला असतो.त्या महिलेचा श्‍वास अडकतो.ती आपली पर्स घेते व वेड्यासारखी आपल्या मुलींकडे स्टारबकमधून बाहेर धावत सूटते.ज्युली स्तब्ध बसून रहाते.एक ही शब्द न बोलता.तिला कळून चुकतं की एपस्टीन फक्त तिच्यावर पाळत ठेऊन नाही आहे, तर तो प्रत्येक त्या पिडीतांवर पाळत ठेऊन आहे ज्यांच्याशी ती बोलत असते.तिला हे कळून चुकतं की ती एका खूप मोठ्या जोखिमेत अडकली आहे.तिला काहीही करुन आता लवकरात लवकर तिचा शोध प्रसिद्ध करावा लागेल,तिला थांबवण्यापूर्वीच !
परंतू,तिचा संपादक हा समाधानी नसतो.वकीलांना आणखी वेळ आणखी पुरावे हवे असतात.वेळचअशी गोष्ट अशी असते जी… ज्युलीकडे मुळीच नसते.परंतु  २००५ च्या पाम बीच हाऊसच कांडचा तपास करणारा एक गुप्तहेर ज्युलीशी अनोळखी नावाने संपर्क करतो.ज्युली त्याला एका पार्किंगच्या तळघरात भेटते.तो तिला एक फ्लॅश ड्राईव्ह देतो.या ड्राईव्हमध्ये एपस्टीन व सर्व प्रभावशाली बलात्का-यांच्या विरोधात पिडीतांचे ऑन रेकॉर्ड बयाण असतात.पोलिसांचा अहवाल होता ज्यात आरोपी हे मुलींना त्यांच्या खासगी बेटांवर,खासगी जेटमध्ये व बंगल्यांमध्ये बोलावून अत्याचार करीत होते.शेकडो मुलींची साखळी त्यांनी डॉलर्सचे आमिष दाखवून निर्माण केली होती जे खूप गंभीर होतं.गिलेन मेक्सवॅल जे हे सगळं एपस्टीनसाठी घडवून आणत होती.२००८ चा तो अहवाल ज्यात इतके ठोस पुरावे असताना,एपस्टीनच्या विरोधात तपास बंद झाला व एक गुप्त डील झाली व हे सगळे पुरावे कधीही न्यायालयात न्यायाधीशांसमोर आणलेच गेले नाहीत!
आता ज्युलीकडे ते सगळं होतं जे तिला हवं होतं.आता ती स्वत: सगळं काही प्रसिद्ध करु शकत होती.मात्र,ज्यावेळी ती तिच्या वृत्तपत्राच्या सर्व्हरला उघडते तिची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी,तिचे लॉगिंग कामच करत नाही.ती वृत्तपत्राच्या आयटी सेलला कॉल करते.ते सांगतात त्यांनाही हे माहिती नाही की असं का घडतंय.ती आपल्या संपादकाला फोन करते की कोणीतरी तिला ‘लॉग आऊट’केलं आहे.संपादक तिला सांगतात,तातडीने ऑफीसमध्ये ये.ज्युली पहाटे ६ वा.ऑफिसला आपल्या न्यूज रुममध्ये येते.तिचे सपांदक,कार्यकारी संपादक आणि त्यांचे वकील तिघेही तिथे असतात.ज्युली आम्ही या शोधाला सस्पेंड करीत आहोत.असं तिचे संपादक सांगतात.ज्युलीला धक्का बसतो.आम्हाला अनेक बेकायदेशीर धमक्या दिल्या जात आहेत आणि आमच्या विमा कंपनीने देखील अश्‍या स्थितीत होणा-या आर्थिक नुकसानीला कव्हर करणार नसल्याचे कळवले आहे.आपल्याला इथंच आता सगळं काही थांबवावं लागेल….!
सर,थांबवण्याचा अर्थ आहे या शोधाला कायमचं संपवणे.माझ्याकडे सगळे पुरावे आहेत,आपण ही केस जिंकू शकतो.यावर संपादक सांगतात की एपस्टीनकडे अमर्यादित ताकद आहे,तो आम्हाला कंगाल करुन टाकेल जरी आपण त्यांनी टाकलेल्या खटल्यात जिंकलो तरी आपण हरुन जाऊ.ज्युली आपल्या संपादकाकडे पाहते…तो माणूस ज्याने तिच्या या शोध बातमीला स्वत: मंजुरी दिली होती.तो ज्युलीसोबत डोळे मिळवू शकत नव्हता.ज्युली बाहेर पडते.आपला लॅपटॉप,आपल्या फाईल्स सोबत घेते आणि रागात कार चालवित घरी येते.आपल्या किचनमध्ये बसते आणि विचार करते,सर्वांनी मिळून तिला मोडून टाकले आहे.एपस्टीन पुन्हा एकदा जिंकला.तिची मुलगी तिला रडताना पाहते.ज्युली आपल्या मुलीकडे पाहते आणि पंधरा वर्षांची तिची मुलगी…एपस्टीनच्या सगळ्या पिडीतांसाखी तिची स्वत:ची मुलगी…तिला विचार येतो एपस्टीनने हेच सगळं तिच्या मुलीसोबतही केलं असतं तर…ती गप्प बसली असती का?पण तरीही ती हे सगळं सोडून देण्याचा निर्णय घेते आणि आपल्या उरलेल्या आयुष्याचा व आपल्या कुटूंबाचा विचार करते.त्या रात्री पहील्यांदा ती आपल्या मुलीला जवळ घेऊन झोपते.
दुस-या दिवशी सकाळी ती आपल्या कार्यालयात जाते.सगळ्यांना वाटतं तिने एपस्टीन विरोधातील बातमी सोडून दिली आहे.पण,प्रत्यक्षात तिने त्या बातमीचा पिच्छा सोडला नव्हता.ती गुप्तरितीने यावर काम सुरु ठेवते.तिच्या संपादकाला वाटतं तिचा शोध बंद झाला आहे पण,ती निर्धार करते की जर तिचे वृत्तपत्र तिचा शोध प्रसिद्ध करणार नाही तर ती स्वत: इतर वृत्तपत्रांकडे यासाठी जाईल.ती ब्रॅडली एडवर्स आणि पॉल कॅसिलपर्यंत पोहोचते.हे ते वकील होते ज्यांनी एपस्टीनच्या अत्यंत प्रभावी वकीलां विरोधात पिडीतांसाठी एक दशकांपासून लढा देत होते.ते पण याच्याच शोधात होते की एक पत्रकार मिळून जावी जी त्यांची कहाणी छापण्यासाठी तयार झाली पाहिजे.ते तिला संपूर्ण एपस्टीन व ट्रम्पचा अधिकारी डोकोस्टाच्या गुप्त डीलचे दस्तावेज देतात.तिला एपस्टीनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या सर्व पिडीतांचे संपर्क क्रमांक व गुप्त पुरावे देतात.
ज्युली संपूर्ण अमेरिकेत एपस्टीनच्या अत्याचारा बळी पडलेल्यांशी संपर्क साधते.त्या सगळ्यांसोबत संवाद साधते.त्यांना एकमेकांसोबत जोडते.एक नेटवर्क तयार करते अश्‍या पिडीतांचा जे कधीही एकमेकींशी भेटल्या नव्हत्या पण अगदी कोवळ्या वयात सारखाच पाशवी अत्याचार सहन केला हाेता.ज्युली त्यांना ऑन रेकॉर्ड जाण्यासाठी प्रोत्साहित करते.पैशांसाठी नव्हे,प्रसिद्धीसाठी नव्हे तर…न्यायासाठी!ज्युलीची संपूर्ण बातमी तयार असते.सगळ्या छायाचित्रांसह व पुराव्यांसह.आता ती नाजूक पत्रकार नव्हती जी एकेकाळी प्रभावशालींच्या बातम्या देण्यापासून वाचत होती.आता ती एक बलाढ्य मनाची पत्रकार बनली होती.
ती शेवट्यांदा आपल्या संपादकाकडे जाते व सांगते ,मी या बातम्या प्रसिद्ध करत आहे.तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय….!जर तुम्हाला त्या प्रसिद्ध करायच्या नसतील तर मी त्या न्यूयार्क टाईम्स,वाशिंगटन पोस्ट्स,गार्डीयनकडे देईल पण या बातम्या…प्रसिद्ध होत आहेत….!संपादक तिच्या डोळ्यात एक आग बघतो.ही ती ज्युली नसते जिला तो १५ वर्षांपासून ओळखत असतो.
संपादक हा कार्यकारी संपादकाला कॉल करतो,मग कंपनी मालकाला फोन लावतो.सहा तासांची बैठक होते व अखेर संपादक ज्युलीच्या कक्षात जातात आणि सांगतो’आपण या बातमीला प्रसिद्ध करीत आहोत,पण गोष्ट बिघडली तर ही तुझी जबाबदारी असेल’.ज्युली त्याच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते’ I Know’.

२८ नोव्हेंबर २०१८.मयामी हेरल्डस या वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध होते ज्याला ‘Perversion of Justice’ नाव दिले जाते.ज्यात खुलासा केला जातो की कसा जेफ्री एपस्टीनने वर्षानुवर्ष लहान-लहान कोवळ्या वयातील मुलींवर बलात्कार केला आणि कश्‍याप्रकारे सरकार व प्रशासनाने त्याला मोकळे सोडले.या बातमीचा प्रभाव इतका झाला की त्या दिवशी हीच बातमी संपूर्ण अमेरिकत पहील्या क्रमांकावर होती.अवघ्या दोनच तासाच ट्टीटवर शोध घेतली जाणारी ही क्रमांक-१ ची बातमी होती.६ तासांच्या आत अमेरिकेतील सगळे सुप्रसिद्ध वृत्त वाहिन्या या बातमीला प्रसिद्धी देत होते.२४ तासांच्या आत फेडरल प्रोसिक्यूटरला बयाण द्यावं लागतं की ते या गुन्ह्याचा तपास पुन्हा उघडतात आहेत…!

आता तर एपस्टीकडून पिडीत सगळे माध्यमांसमोर येऊन बोलू लागतात.वीस वर्षात पहील्यांदा ज्या पिडीतांना वाटत होतं त्या एकट्या आहेत,त्यांना हे बघून धक्का बसतो की त्यांच्याच सारख्या खूप पिडीत आहेत.यातून एफबीआय एक नवा तपासाची घोषणा  करतो.२००८ च्या बोगस,गुप्त व खोट्या प्ली डीलवर अमेरिकन काँग्रेस म्हणजेच संसदेमध्ये विरोधक चर्चेची मागणी करतात.अलेक्झांडर ॲकोस्टा,असा प्रोसिक्यूटर ज्याने एपस्टीनला ‘स्वीट हार्ट’डील करुन दिली होती,जो आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचा लेबर सचिव बनला होता,त्याच्यावर राजीनामा देण्याचा जनतेचा दबाव वाढतो कारण त्याने एका गुन्हेगार अब्जाशाला मोकळे सोडले होते.ग्रेट ब्रिटेनच्या प्रिंस ॲण्ड्र्यूची एपस्टीनसोबतची मैत्री एक आंतरराष्ट्रीय स्कॅम बनून जाते आणि आता एपस्टीनची वकीली चमू पुन्हा एकदा कायदेशीर पेंच निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

त्याची वकीली चमू एक आपातकालीन मोशन फाईल करतात व पुरावे समोर येऊ नये व कोर्टच्या कागदपत्रांना सील करण्यासाठी.एपस्टीनचे खासगी जासूस ज्युलीचा भूतकाळ शोधू लागतात.तिचे आर्थिक व्यवहार,तिचे कुटूंब,तिचे व्यक्तिगत जीवन.असं काही जे तिला बदनाम करण्यासाठी पुरेसे ठरेल.काही लोकं ही पिडीतांना विविध समाज माध्यमांवर खोटारड्या,वेश्‍या,पैशांसाठी वाट्टेल ते करणा-या सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते की इतक्या वर्षांनंतर या सगळ्या एपस्टीनकडून पैसे मिळवण्यासाठी हे सगळं करत आहेत…!
ज्युलीला दररोज जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या.यात ते तिच्यासह तिच्या मुलीसोबत काय-काय करतील याला उल्लेख असायचा.व्हर्जिनियाच्या खरेपणावर प्रश्‍न उपस्थित केले जातात.तिचे जुने छायाचित्रे व्हायरल केली जातात हे सिद्ध करण्यासाठी ती वेश्‍याच(अवघ्या १४ व्या वर्षीच) होती.एका पिडीतेला तर इतक्या धमक्या मिळतात की ती आत्महत्या करते.सिस्टम त्यांना पुन्हा एकदा क्रश करण्याचा प्रयत्न करतो.
पण,या वेळी त्या एकट्या नसतात.मात्र,यावेळी खूप काही अनपेक्षीतही घडू लागतं.दुस-या मोठमोठ्या वृत्तपत्रातील पत्रकार आणि अमेरिकेच्या सर्वच वृत्त वाहिन्या कॉल करु लागतात आणि सांगतात की आम्ही फोलो अप तपास रन करत आहोत.आम्ही या केसला दाबू देणार नाही.मग काही वकील ज्युलीसोबत अगदी नि:शुल्क जुळतात.पिडीत हे ऑन लाईन जुळतात आणि बघता-बघता ही शोध बातमी एक चळवळ बनून जाते.‘# जस्टीज फॉर एपस्टीन व्हिकटम’.एपस्टीने ज्युलीला तोडण्याचा प्रयत्न केला पण ज्युलीकडे आता तिची स्वत:ची एक फौज होती,जी तिच्यासाठी लढण्यास तयार होती.
२०१९ मध्ये सगळं काही बदलून जातं.
जेफ्री एपस्टीनला या दिवशी पॅरिसवरुन आपल्या खासगी विमानाने परत आल्यावर न्यू जर्सीच्या टेटरपिरो विमानतळावर अटक केली जाते.तो विमानाच्या बाहेर निघण्याआधीच त्याच्या विमानाच्या आत घूसून त्याच्यावर लैंगिक शोषणाच्या उद्देशाने केलेली अल्पवयीन मुलींची मानवी तस्करी(ट्रेफिंकिंग ऑफ मायनर्स आणि कॉन्सीपरसी’या फेडलर गुन्ह्यात त्याला अटक होते,जे त्याला आता ४५ वर्षे तुरुंगात डांबणार होते.
ज्युली आपल्या मुलीला शाळेत सोडत होती तेव्हा या बातमीचं अलर्ट तिच्या मोबाईलवर मिळाले.तिने आपली कार बाजूला थांबवली.तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू निघत होते.तिची मुलगी तिच्या चेह-याकडे बघत होती.ती आपल्या आईला विचारते,आई तूला काय झालं?ती काहीच बोलत नाही.फक्त आपल्या फोनवरील मॅसेज तिला वाचायला देते.१४ वर्षे तुरुंगापासून वाचलेला एपस्टीन आता पोलिसांच्या अटकेत होता.
हे सगळं घडलं,फक्त त्या पिडीतांमुळे,त्यांच्या हिंमतीमुळे,त्यांचा तो आवाज जो संपूर्ण अमेरिकेत घूमला,हे घडलं त्यांनी गप्प राहणे पसंन न केल्याने.जेफ्री एपस्टीनला जामीन देखील मिळू शकला नाही.राष्ट्राच्या इतक्या प्रभावशाली लोकांचा पाठींबा असताना त्याचा जामीन फेटाळला जातो.त्याला मॅनहाटनच्या तुरुंगात राहावं लागतं.पहील्यांदा जेफ्री एपस्टीनला न्यायालयाच्या दणक्या समोर आपल्या प्रभावाचा वापर करता आला नाही.
व्हर्जिनिया ज्युलीला कॉल करते आणि रडत रडत सांगते,’हमने कर दिखाया,हमने सच में कर दिखाया’.ज्युली तिचा आवाज ऐकून जमीनीवर बसून जाते.१८ महिन्यांचा तिचा तनाव,भीती,तिचं परिश्रम क्षणार्धात समाधानामध्ये परिवर्तित झाले होते.पण…हे समाधान तात्पुरतेच होते….!१० ऑगस्ट २०१९. सकाळी ६.३० वाजता ज्युली सकाळी झोपून उठते तेव्हा तिला तिच्या मोबाईलवर ४७ मिसकॉल्स दिसतात.यानंतर ती लगेच वृत्तवाहीनी सुरु करते तर तिच्या पायाखालची वाळू सरकते!बेक्रिंग न्यूज सगळ्या वृत्त वाहीन्यांवर सुरु असते,जेफ्री एपस्टीने तुरुंगात आत्महत्या केली….!
या बातमीत कोणतेही बातमी मूल्य नव्हते,बातमी होती ती एपस्टीन स्वत:च्या सेलमध्ये चादरीने गळफांस घेतलेला आढळला.त्याच्यावर नजर ठेवली जात होती,सुरक्षा रक्षकांना दर तीस मिनिटांनी त्याची पाहणी करायची होती,पण या वेळी त्यांच्याकडून चूक झाली होती.सीसीटीव्ही कॅम-यांमध्ये नेमकी त्याच रात्री खराबी आली होती.एपस्टीनच्या सेलमधील कैदी एक दिवस आधीच दुस-या सेलमध्ये स्थानांतरित झाला होता.ज्युलीच्या फोनवर जगभरातील पिडीत,वकील,तज्ज्ञ सगळे एकच प्रश्‍न विचारत होते,कसे अमेरिकेचा सर्वात मोठा हाय प्रोफाईल कैदी,जो इतक्या गंभीर गुन्ह्यात कैदेत होता,जो जगभरातील सर्वाधिक प्रभावशाली लोकांना उघडे पाडू शकत होता,एका फेडरल तुरुंगात कसा काय मेला?
एपस्टीनच्या आत्महत्येच्या थ्योरीवर कोणालाही विश्‍वास बसला नाही.ज्युली आपल्या किचनमध्ये निराश बसली होती.तिचे १८ महिन्यांचे परिश्रम वाया गेले होते.तो राक्षस निसटून गेला होता.कोणतेही ट्रायल नाही,कोणतीही सुनावणी नाही,कोणताही न्याय नाही….!अचानक तिचा फोन वाजतो.हा कॉल एका वकीलाचा होता जो पिडीतांच्या बाजूने न्यायालयात लढत होता.तो ज्युलीला सांगतो,सगळं काही संपलं नाही.एपस्टीनच्या मृत्यूमुळे काहीच संपलं नाही.या भयंकर पापात त्याचा साथ देणारी मॅक्सवेल आणि इतर सहकारी यांच्या विरोधात आम्ही न्यायालयात जात आहोत.ज्युलीचा जाणीव होते,ही कहाणी एपस्टीनसोबत संपली नाही,ही कहाणी तर आता सुरु झाली आहे.
मग ज्युली ती त्या नेटवर्कला उघडं पाडते ज्या नेटवर्कने एपस्टीनला दोन दशके पिडीतांचे शोषण करु देण्यासाठी मोकळे सोडले होते.गिलेन मॅक्सवेल ब्रिटीश सोशलाईस्ट, जिने एपस्टीनसाठी लहान-लहान मुलींना रिक्रूट,ब्रूम आणि एब्यूस केले.ती यूरोप किंवा न्यू इंग्लैण्डमध्ये कोणत्यातरी खूप प्रभावशाली माणसाच्या घरी लपून बसली होती.ते वकील ज्यांनी २००८ मध्ये पिडीतांची फसवणूक करुन डील तयार केली होती,अगदी अमेरिकेचा लेबर सचिव ऑगस्टासह,मोठमोठे वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ ज्यांनी एपस्टीनकडून पैसे घेतले होते त्याला समाजात मोठा बनवण्यासाठी.बँक्स ज्यांनी नियमांबाहेर त्याला अर्थ प्रदान केले होते.अकाऊंटंट ज्यांनी एपस्टीनची हिशेब चोरी लपवली होती.पायलट्स ज्यांनी त्याचे खासगी विमान उडवले होते आणि स्टाफ ज्यांनी सगळं काही बघितलं पण मानवतेसाठी काहीच केलं नाही….!
यासोबतच प्रभावशाली लोकं ज्यांची नावे एपस्टीनच्या खासगी विमान रेकॉर्डवर होते ज्या विमानात पिडीतांवर अत्याचार झाला.चौकशी एक बिंदूपासून सुरु होऊन अमेरिकेच्या सडलेल्या व्यवस्थेपर्यंत पोहोचते.पिडीत महिला या चौकशीला थांबू देत नाही.ते काँगेससमोर टेस्टीफाईड करतात,त्या मुलाखती देतात,मेमोरीज लिहतात,दूस-या पिडीतांच्या मदतीसाठी फाऊंडेशन स्थापन करतात.‘ते विक्टीम पासून वॉरियर्स’ मध्ये ट्रांसफॉर्म होऊन जातात.
२ जुलै २०२० रोजी मॅक्सवलला ब्रिटेनच्या ब्राडफोर्ड येथील हॅम्पशीयरमधून अटक होते,जिथे ती एका वर्षांपासून लपली होती.तिच्यावर सेक्स ट्रेफिकिंग मायनर्स,फर्ज्यूरी व कॉन्सपीरसीचे गंभीर गुन्हे दाखल होतात.ट्रायल नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरु होते.पिडीत मुली तिच्या विरोधात साक्ष देतात.ते न्यायालयात सांगतात कसे इतक्या लहान वयात मॅक्सवेलने त्यांना मॉडलिंग,मसाज इत्यादीच्या बहाण्याखाली एपस्टीनच्या नरकात पोहोचवले.तिने त्यांना तिच्यावर विश्‍वास ठेवण्यास मजबूर केले.त्यांनी तिच्यात आपली आई,आपली सहानुभूतीकार बघितली होती.त्यांनी तिच्यात आपली मैत्रीण बघितली होती जी त्यांचे हित साधणार होती.तिने इतक्या लहान मुलींना असं शिकवलं की एपस्टीन जे त्यांच्यासोबत करतोय ते सगळं खूप ‘सामान्य’ आहे.त्या मुलींनी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा मॅक्सवेलने त्यांना धमक्या दिल्या,भीती दाखवली.

न्यायाधीश पिडीतांची बयाण ऐकतात आणि २९ डिसेंबर २०२१ रोजी गिलेन मॅक्सवेला सेक्स ट्रेफिकिंग ऑफ मायनर्सच्या गुन्ह्यात दोषी मानून तिला २० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.कोर्टरुममध्ये स्तबधता पसरते.कोर्टरुमध्ये पिडीत मुली,महिला एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात.परंतू,हा लढा आज ही संपला नाही.या प्रकरणात जगभरातील सर्वात प्रभावशाली आरोपी आज देखील खुलेआम वावरत आहेत.ते आजही प्रतिष्ठित वकील व नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंटच्या मागे लपून बसले आहेत.व्यवस्था ,ज्याने एपस्टीनला संरक्षण दिले आज ही एक्सीट करते मात्र,पिडीता आज ही लढत आहेत आणि ज्युली…लिहीत राहत आहे.

ज्युली न्यूयार्कमध्ये पुलीत्झर पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केली जाते.कार्यक्रम स्थळ जगभरातील संपादक,पत्रकारांनी भरुन गेले होते.ते लोक देखील होते ज्यांनी ज्युलीच्या शोध पत्रकारितेतील या बातमीला जवळपास संपवून टाकले होते.पण,ज्युली या सन्मान सोहळ्यात स्वत:विषयी काहीच बोलत नाही.ती पिडीतांविषयी बोलत राहते.कोटनी वाईड्स,मिशल निकाटा,व्हर्जिनिया आणि अश्‍या अनेक…..!ज्यांच्या विषयी आपल्याला कधीही काहीही कळणार देखील नाही.ज्युली म्हणते.मी जेफ्री एपस्टीनला हरवले नाही तर त्या पिडीतांनी त्याला हरवले ज्यांनी गप्प बसण्यास नकार दिला,ज्यांनी भीतीला जिंकले,यावर विश्‍वास करुन की न्याय भले ही उशिरा मिळतो पण मिळतो जरुर आणि स्त्री जेव्हा घाबरणे बंद करते तेव्हा मोठ्यातील मोठ्या राक्षसालाही हरवू शकते….!
(वाचा भाग-४ मध्ये एपस्टीन आणि भारत(समाप्त)
…………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या