

पत्रकाद्वारे मागितली माफी:मीच पैस देणे लागत असल्याचा ‘कबूलनामा!’
नागपूर,ता. ७ नोव्हेंबर: नुकतेच नेहरु नगर झोनच्या सभापती समीता चकोले यांचे पतीराज राजेंद्र चकोले यांची कंत्राटदार निळकंठ बेलखोडे यांच्यासोबत संभाषणाची ऑडियोक्लिप व्हायरल झाली होती,यात चकोले हे या कंत्राटदाराशी अरेरावीच्या भाषेत ‘पैसे’पहोचले नाहीत,असे संभाषण करताना आढळले,आज अचानक या प्रकरणात नाट्यमय’ट्वीस्ट’आले,बेलखोडे यांनी एक पत्रक जारी करुन तेच चकोले यांना पैसे देणे लागत असल्याचा ‘कबूलनामा’ दिला,यानंंतर मात्र ते प्रसार-प्रचार माध्यमांसाठी ‘नॉट रिचेबल’झालेत!
पत्रकात त्यांनी ते छोटे-मोठे काम करणारे कंत्राटदार असून त्यांना निविदेद्वारे शेषनगर,झोन क्र.५ येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचा कार्यादेश मिळाला होता,असे सांगितले मात्र त्या ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे काम करण्यास विलंब झाला,याची माहिती मनपातील संबंधित अधिका-यांना देखील होती.लहान कंत्राटदार असल्याने मनपाकडे त्यांची बरीच थकबाकी असल्याने ते आर्थिकदृष्टया अचडचणीत आले,परिणामी एका मित्राकडून तसेच राजेंद्र चकोले यांच्याकडून दोन वेळा ५०-५० हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये घेतले होते,असा खुलासा त्यांनी पत्रकात केला.
काम पूर्ण होऊन अंदाजे ३-४ महिने झाले.मात्र संबंधित सहायक अभियंता याने देयक बनवले नाही.राजेंद्र चकोले हे वारंवार त्यांनी उधार दिलेले एक लाख रुपये मागत होते.मी त्यांना बिल मिळाल्यानंतर पैसे परत देतो,असे सांगितले.३१ ऑक्टोबर २०२० रोजी मी मुलीची कागदपत्रे आणण्यासाठी गेलो असता चकोले यांचा फोन आला व त्यांनी उधार दिलेल्या रकमेची मागणी केली.त्यामुळे आमच्या दोघांमध्ये थोडासा वाद झाला.
भाजप नगरसेवक प्रदीप पाेहोणे अखेर शरण https://sattadheesh.com/?p=9440
आमचा संवाद मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला. मी मोबाईलची क्लिप कंत्राटदार मित्राला पाठवली व मदत मागितली.परंतु त्याने मला मदत न करता व कोणतीही परवानगी न घेता सदर क्लिप प्रसार माध्यमांना दिली तसेच माध्यमांना माझा मोबाईल नंबरही दिला.
या प्रकरणात कुणालाही बदनाम करण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता असा खुलासा करीत या संपूर्ण प्रकरणात राजेंद्र चकोले व त्यांच्या कुटुंबियांना जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल बेलखोडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
आमदारांची मध्यस्थी लागली सार्थकी!
बोलखोडे यांच्या या पत्रकानंतर मनपात आज यावरच बरीच खलबते रंगली होती. हे प्रकरण पदाधिकारी तसेच एका आमदाराने गांर्भीर्याने घेऊन याबाबत चकोले यांना चौकशीसाठी ‘पाचारण’केले होते,हे विशेष!त्यांच्या मध्यस्थी नंतर बेलखोडे यांचे हे पत्रक समोर आल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.ही ‘परंपराच’ झाली अाहे.पदाधिकारी अारोप लावतात मात्र कारवाई होत नाही तर दुसरीकडे मोठे मासे सोडून लहान मास्यांचा बळी घेतला जातो.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांच्या विरोधात जंग-जंग पछाडले मात्र अद्याप त्यांचे निलंबन झाले नाही उलट हजेरी पुस्तिकेमध्ये अनियमितता आढळल्याने गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील पगार काढणारा कर्मचारी बडतर्फ झाला!
मनपाच्या विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी देखील पत्र-परिषद घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त महेश धामेचा यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप लावले मात्र अद्याप प्रशासनाने त्याचे ना खंडन केले ना कारवाई केली!‘तेरी भी चूप..मेरी भी चूप’हाच कारभार गेल्या दीड दशकापासून मनपात राजरोसपणे सुरु आहे,असा संताप बेलखोडे यांच्या पत्रानंतर कर्मचारी व्यक्त करीत होते.




आमचे चॅनल subscribe करा
