फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमभाजप नगरसेवक प्रदीप पाेहोणे अखेर शरण

भाजप नगरसेवक प्रदीप पाेहोणे अखेर शरण

Advertisements

नागपूर,ता. ७ नोव्हेंबर:पारडी उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याचा कारणावरून सरकारी कार्यालयात तोडफोड करण्याचा आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप असलेले महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती, भाजपचे नगरसेवक प्रदीप पाेहोणे यांनी शुक्रवारी उपायुक्त विनिता शाहू यांच्यापुढे शरणगती पत्करली.

हे आंदोलन पोहाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलेच भोवले आहे. तोडफोड केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी पोहाणे, प्रभाग क्रमांक २५च्या भाजपच्या नगरसेविका वैशाली रोहनकर, श्रुती मेंढे यांच्यासह ३० जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, साथरोगाच्या नियमांचे उल्लंघन करण्यासह विविध कमलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी सुरुवातीलाच रोहनकर व मेंढे यांना अटक केली होती.
पोहाणेंचा शोध घेणे सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलेच तापत होते. अखेर पोहाणे यांनी शरणागतीचा मार्ग स्वीकारला. गेल्या सहा वर्षांपासून पारडी पुलाचे काम रखडले आहे. या पुलामुळे येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. परिसरातील नागरिकांनी याबाबत पोहाणे व रोहनकर यांच्याकडे तक्रार केली. १ नोव्हेंबर रोजी दुपारी पोहाणे, रोहनकर व मेंढे यांच्यासह ३० जण सिव्हिल लाइन्समधील एनएचएच्या कार्यालयात धडकले.
विभागीय अधिकारी राजीव गुलाबंचद अग्रवाल (वय ५८, रा. मेडिकल चौक) यांच्या कक्षात पोहाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोहाणे व कार्यकर्त्यांनी साहित्याची तोडफोड केली, धमक्या दिल्या व अग्रवाल यांच्या तोंडाला काळे फासले. अग्रवाल यांचे सहायक एम. श्रीनिवास राव यांनी मोबाइलद्वारे या घटनेचे चित्रीकरण केले. पोहाणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास राव यांचा मोबाइल हिसकावून चित्रीकरण डिलीट केले. या घटनेने तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. तोपर्यंत पोहाणे व कार्यकर्ते तेथून पसार झाले होते.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या