सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम

नागपूर,ता.२६ मे २०२६: देशाचे विकासपुरुष, जनतेचे लाडके नेते आणि विकासकामांच्या माध्यमातून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे केंद्रीय मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी यांचा बुधवार, २७ मे २०२६ रोजी वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने त्यानिमित्त एन्रिको हाइट्स, हॉटेल रेडिसन ब्ल्यू जवळ, वर्धा रोड येथे सकाळी ११.३० वाजता भव्य “वस्त्र तुला” कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Advertisements

सामाजिक जाणिवा आणि सेवाभाव जपत वाढदिवस साजरा करण्याचा, या उपक्रमामागे उद्देश आहे. ‘वस्त्र तुला’ झाल्यानंतर ही सर्व वस्त्रे तळपत्या उन्हात काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या समाजातील कष्टकरी, हॉकर्स, हातावर पोट भरणारे श्रमिक आणि गरजू बांधवांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात येतील.
गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह देशभरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकास प्रकल्पांची उभारणी झाली आहे. विकासाभिमुख नेतृत्वासोबतच सामाजिक संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगजगताशी संबंधित व्यक्ती, नागरिक तसेच गडकरी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आली आहे.
……………………………………
Advertisements

Advertisements
