Homeनागपूर न्यूजआणि...मुलाने साधला शेवटी आईसोबत प्रेमळ संवाद

आणि…मुलाने साधला शेवटी आईसोबत प्रेमळ संवाद


पुनम कनोजिया म्हणतात येते लवकर घरी

नागपूर,ता. १८ सप्टेंबर: बुधवार दि.१६ सप्टेंबर हा दिवस कनोजिया कुटुंबियांसाठी घोर निराशा आणि दू:खाचा होता. दिपक कनोजिया यांची ६८ वर्षीय बहीण पुनम कनोजिया यांना अचानक मेयो प्रशासनाने एम्ब्यूलेंसमध्ये इतर रुग्णालयात शिफ्ट केले परिणामी कुटुंबियांची चांगलीच धावपळ झाली होती.

मध्य रात्रीपर्यंतच्या धावपळीनंतर मेयो प्रशासनाने एम्ब्यूलेंस चालकाला फोन करुन विचारले असता त्याने पुनम यांना वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे यांच्या रुग्णालयात सोडून आल्याची माहिती दिली,तेव्हा कुटुंबियांच्या जीवात जीव आला. दुस-या दिवशी कुटुंबिय हे त्यांना भेटायला गेले असता,रुग्णालय प्रशासनातर्फे त्या कोविड रुग्ण असल्याकारणाने कोणालाही त्यांना भेटता येणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी १० ते १०.३० दरम्यान घरचा डबा व मोबाईल रुग्णालयाच्या कर्मचा-यांच्या माध्यमातून त्यांना पोहोचवता येईल,असे सांगितले.

अशी आहे बातमी : धक्कादायक ! मेयो रुग्णालयातून बहीणच गायब! शोधून शोधून भाऊ झाला बेजार

आज शुक्रवारी कनोजिया कुटुंबिय यांनी सकाळी ९ वा.रुग्णालय गाठले.कधी एकदा आपल्या बहीणीचा आवाज ऐकतो,असे या कुटुंबियांना झाले होते.शेवटी तेथील एका प्रेमळ परिचारिकेने आई आणि त्यांच्या मुलाचा हा संवाद मोबाईलद्वारे घडवून आणला.एवढेच नव्हे तर फोन आला तर तो कसा उचलायचा,कसा कापायचा,हे देखील पुनम यांना सांगत होत्या.

सकाळचा डबा मिळाला का?पोटभर जेवलीस का? औषधे व्यवस्थित घेतली का?श्‍वास घ्यायला त्रास होतो का,असे काळजीचे सर्व प्रश्‍न पुनम यांच्या मुलाने आपल्या जन्मदात्रीला विचारले. तोंडाला ऑक्सीजन मास्क असल्याने त्यांना मुलासोबत संवाद साधणे जमत नसले तरी त्या सुखरुप असल्याचे त्यांनी कळविले एवढेच नव्हे तर लवकरच मला मेयोमध्ये घेऊन जा,असेही त्या बोलल्या.औषधांचा परिणाम म्हणून त्या अश्‍या बोलल्या असल्यातरी मुलाने त्यांना मेयोमध्ये नव्हे तर तुला घरी यायचे आहे चार दिवसात बरी होऊन,आम्ही तुला सुखरुप घरी घेऊन जाऊ,असे सांत्वन केले.

जरूर वाचा : अखेर बहीण सापडली शालिनीताई मेघे रुग्णालयात मात्र कुटुंबियांना भेटूच दिले नाही !

‘सत्ताधीश’ने आई आणि मुलाचा हा प्रेमळ संवाद खास आपल्या वाचकांसाठी बातमीसोबत अपलोड केला आहे. कोव्हिडमुळे शहरात सध्या अनेक कुटुंबिय वेदनेत होरपळत आहे,अश्‍यावेळी आपल्या आप्त-स्वकीयांचा धीराचा आवाज ही रुग्णाला मानसिक उभारी देऊन जातो,हेच खरे.

Latest बातम्या