नागपूर: भारतीय जनता पक्ष् व शिवसेना यांना कार्यकर्ते ‘एकत्रित’ बघायला आलेत भाषणे ऐकायला नाहीत. दोन कडवट हिंदूत्ववादी पक्ष् पुन्हा एकदा एकत्रित आले ते यासाठी कारण त्यांना देश हिंदूविरोधी पक्षांच्या हातात पुन्हा द्यायचा नाही .या निवडणूकीत हिंदूत्वाचा आवाज आणखी बुलंद झाला पाहिजे. विदर्भाच्या फक्त दहा जागांवरच नव्हे तर महाराष्ट्रातील ४८ जागांवर आपल्याला जिंकायचे आहे. उमेदवार कोण आहे हे न बघता फक्त धनुष्य आणि कमळ बघा,तिसरी कोणतीही निशाणी आपल्याला माहितीच नाही. आपल्याला डोळा मारणारे नको, नजरेला नजर भिडवून काम करणारे हवे आहेत. जे चांगलं आहे त्याबाबत आम्ही चांगलं बोलतो पण जे पटत नाही ते ही उघडपणे बोलतो,बाळासाहेबांचीही हीच परंपरा राहीली आहे. नागपूर हे देशाचे ह्दय मानले जाते,शिवसेना-भाजपाच्या मनोमिलनाची सुरवात म्हणूनच नागपूरपासूनच केल्याचे विधान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
ते भाजप व शिवसेनेतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यकर्ता संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहिर,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, उर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,खा. अजय संचेती, मा.खा.दत्ता मेघे, आमदार, खासदार तसेच भाजप व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थि्थत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहताना पुन्हा जुने दिवस आठवले, तेव्हा आम्ही काय होतो, आज काय आहोत! मंचावर आज अनेक मंत्री बसले , आमदार,खासदार आहेत त्यांना या उंचीवर बसवणारे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आहेत. युती करायला मी काही मूर्ख नाही, पाच वर्षात महराष्ट्रसाठी गडकरी अाणि मुख्यमंत्री यांनी जी काही कामे केली ती त्यांच्या भाषणात मी लक्ष्ापूर्वक ऐकत होतो, एखादे काम ते सांगायला विसरत तर नाही ना याकडे माझे लक्ष् होते, जे चांगले आहे त्याबाबत उघडपणे बाेलण्याची शिवसेनेची परंपरा आहे, हो अनेक मुद्दांवर आम्ही भांडलो कारण ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांनी दूखवलं तर रागापेक्ष्ा दू:ख होत असतं मात्र दुश्मनी कोणाशी करायची हे शिवसेनेला कळतं. आज आम्ही विदर्भाची लोकसभेची मॅच १०/० नी जिंकू असे बोलतोय पण एक वेळ अशी होती नागपूरची देखील सीट काढू शकत नव्हतो. आता मतदानच नव्हे तर माणसेही आम्ही जिंकतो असे ठाकरे म्हणाले.त्यागाची प्रतारणा होता कामा नये,गद्दारी होता कामा नये असे सांगून दोन्ही पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करण्याचे आव्हान केले तसेच खर् या अर्थाने मनोमिलन झाल्याचे दाखवून देण्याचे सांगितले.
टिका करायची कोणावर!
गेल्या महिन्यात भाजपचे अध्यक्ष् अमित शहा,मुख्यमंत्री,मुनगंटीवार घरी आले आणि युती झाली,तेव्हा वाटलं राधाकृष्ण विखे पाटील आता काही बोललेत तर त्यांना सोडायचे नाही मात्र डॉ.सुजय हे भाजपात आले आता टिका करायची कोणावर! अशी मिश्कीली उद्धव यांनी भाषणात केली. कृपा करुन मोदींना सांगा शरद पवार यांना घेऊ नका,दानपट्टा आम्ही मोकळ्या मैदाना एेवजी घरात चालवायचा का? समोर मैदान साफ आहे असे ही समजू नका, ते मुरलेले राजकारणी आहेत, जातीपातीचे राजकारण ते करु शकतात, जाणिवपूर्वक खबरदारी घ्या, आरोप केलेत तरी उत्तर देऊ नका, आम्ही सोलून काढू, ही देशाची निवडणूक आहे हे विसरु नका,‘करुन दाखवले’ हे पुन्हा एकदा ठासून सांगा, शेतकर् यांचा जीवावर उठलेले यंत्रणेतील शुक्राचार्य शोधून काढा,पैसे अडवणारे बंधारे मोडून काढा, विकासाचं पाणी खळखळून वाहीलच त्यासोबतच ‘पाकिस्तानचं’कंबरडं ही मोडून निघणार असल्याचे उद्धव ठाकरे हे म्हणाले.समोर सैनिक बर्फात सुरक्ष्ेसाठी गाढले जात असताना नरसिंहराव सरकार हे मजिदीमध्ये उग्रवाद्यांसाठी शिरखूरमां पाठवित होती,आम्हाला असे सरकार पुन्हा निवडूण आणायचे नाही,देशभक्ती काँग्रेस-राष्ट्रवादीने अाम्हाला शिकवू नये, देशभक्ती त्यांच्या रक्तात भिनली जाऊही शकत नाही,आजही सैनिक शहीद होतात मात्र अाज त्याचे त्याचा बदलाही घेतला जातो,खूर्ची हे आमचे स्वप्न नाही देश हे अ आमचे स्वप्न आहे असे उद्धव ठाकरे हे म्हणाले.
पाकिस्तानात खेळाडू पंतप्रधान येथे क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष््!
खूर्चीसाठी विरोधक कसे हपापले आहेत याचे उदाहरण सांगताना उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानात क्रिकेटचा एक खेळाडू पंतप्रधान होतो तर या देशात पंतप्रधान पदाची स्वपने बघणारा नेता हा क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष् होतो अशी नाव न घेता पवार यांना कोपरखळी मारली आणि सभागृहात एकच हशा पिकला. त्यांना फक्त सत्ता दिसते,‘अंधेरे मे एक प्रकाश..’खरोखर उजेड पाडेल असा दाखवा ना प्रकाश,आहे तो प्रकाशही कशाला काळवंडता?अशी कोटी त्यांनी केली.सत्तेत राहूनही आम्ही भांडलो पण एक ही भांडण हे वैयक्ति कारणासाठी होती का?असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच विचारला.समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी ही उपराजधानीशी जोडल्या गेली याचा आम्हाला आनंदच झाला.शेतकर् यांसाठी मदत केंद्र सुरु झाले मग संघर्ष राहीलाच कुठे?
…आणि मुख्यमंत्री यांनी मंचावरच हात जोडले्!
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शब्दांचे चाैकार-षट्कार ठोकत असताना अचानक उद्धव यांनी मुख्यमंत्री यांनाच विचारले, विरोधक आम्हाला उकसवत होते ‘पटत नाही तर सत्ते बाहेर पडा ना! कारण मागच्या दारानं त्यांना आत यायचं होतं, आम्ही बाहेर पडलो असतो तर त्यांना तुम्ही घेतले असते का?असा अचानक उद्धव ठाकरे यांनी सवाल दागताच,मुख्यमंत्री यांनी बसल्या ठिकाणीच दोन्ही हात जोडून नमस्कारच केला,यावेळी मुख्यमंत्री यांच्या चेहर् यावरचे हास्य बघण्यासारखे होते.
…..