नागपूर: प्रसिध्द नाटककार, लेखक व कवी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांचे सन 2018-19 हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष महाराष्ट्रासह देश-विदेशात साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दुर्मिळ छायाचित्रप्रदर्शनाचे उदघाटन आज दि.६ मार्च,२०१९ रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालिका, स्वाती काळे, ज्येष्ठ रंगकर्मी, मधू जोशी, दिलीप देवरणकर, कुणाल गडेकर, अलका तेलंग व विराग सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी स्वाती काळे यांनी पु.ल. देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडला. यावेळी मकरंद भालेराव, अबोली कोलणकर, वसंत खडसे, दिपक कुळकर्णी, गणेश थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अभिजीत मुळे यांनी केले. हे चित्रप्रदर्शन नामवंत चित्रकाराने तयार केलेले आहेत. हे चित्रप्रदर्शन दि.६ ते ८ मार्च २०१९ या कालावधीत भरविण्यात आले आहे. बाबुजी, पुलं आणि गदिमा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने दि.८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता ”त्रैगुण्य एक संस्मरणीय प्रवास” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. या कार्यक्रमाची संकल्पना कुणाल गडेकर यांची असून, मंजिरी वैद्य आणि गुणवंत घटवाई या गायक कलावंतांना गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र हे साथसंगत करणार आहेत.
.