नागपुरात भाजपतर्फे जल्लोष मोर्चा
नागपूर: शहर संघटन महामंत्री भोजराज डुंबरे यांच्या नेतृत्वातील जल्लोष मोर्चा धंतोलीतील विभागीय कार्यालयातून दुपारी १ वाजता ढोल-ताशयांच्या गजरात काढण्यात आला. विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी,उत्तर भारतीय नागपूर शहर अध्यक्ष अजय पाठक, महामंत्री नागपूर शहर किशोर पलांदुकर,भाजपचे नगरसेवक व नगरसेविका यांच्या सहभाग होता. पंचशील चौका पर्यंत जल्लोष मोर्चात फटाके फोडण्यात आले,भारताचा ध्वज फडकविण्यात आले,पाकिस्थान मुर्दाबादचे नारे तर ‘भारत माता की जय ‘चा उदघोष आसमंतात दुमदुमला.’जहाँ हुये बलिदान मुखर्जी..वो काश्मीर हमारा है…’असे नारे आसमंतात निनादले. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या हवाई दलाच्या कारवाई निमित्त हा जल्लोष मोर्चा काढण्यात आला.