नागपूर. वाडी राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस शिपायाला कार चालकाने दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवारी दुपारला घडली.
वाडी राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. आंबेडकरनगरात मंगळवारी दुपारी एकच्या दरम्यान एमएच-40/ए-3799 क्रमांकाच्या ओमनी कार चालकाचा अपघात झाले. यानंतर कार चालक हा वाहन सोडून जमलेल्या गर्दी उभा राहिला. घटनेची माहिती मिळताच वाडी ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई बाबासाहे सुभाष खाडे (30) हे पोहचले. ते गर्दीला नियंत्रित करून सदर वाहन बाहेर काढण्यास लागले. त्यांनी सदर गाडी चालकाला विचारणा केली असता अज्ञात आरोपी एक युवक बाहेर आला त्याने सदर गाडी ठाण्यात लावू असे खाडे यांना सांगितले. यानंतर खाडे व अज्ञात आरोपीहा ठाण्याच्या दिशेने गाडी न नेता वेगवेगळ्या रस्त्याने घेऊन गेला. तसेच सदर वाहन धम्मकिर्ती नगराच्या परिसरात घेऊन गेला आणि त्याने रस्त्यात गाडी थांबविली. यांनतर आरोपीने खाडेंना शिविगाळ केल्यानंतर त्यांना दगडाने जबर मारहाण केली. दरम्यान परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात येताच नागरिक घटनास्थळी गोळा झाले. यानंतर संधीचा फायदा घेत चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. शिपायाला मारहाण झाल्याचे समजताच वाडी पोलिसाचे पथकाने खाडेच्या मदतीसाठी धाव घेतली. याप्रकरणी खाडे यांच्या तक्रारीवरून वाडी ठाण्यात शासकीय कामात अडथळ्यासह मारहाणीचा गुन्हा नोंदविला.