नागपूर महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नाट्य संमेलनाचा पुर्वरंग म्हणून कविवर्य सुरेश भट सभागृह,रेशीमबाग येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध एकांकिका स्पर्धेतून पहिल्या तीन मध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिकेला अंतिम फेरीत थेट प्रवेश दिला जाणार आहे. विदर्भातील नवीन एकांकिकांना अंतिम फेरीत स्पर्थेत प्रवेश मिळावा म्हणून प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्राथमिक फेरी दोन दिवस घेण्यात येईल. प्राथमिक फेरीच्या प्रथम सत्राचे उदघाटन राजाराम वाचनालय, धरमपेठ येथे झाले. अखिल भारतीय नाट्य परिषद,मुंबईचे कार्यकारिणी सदस्य शेखर बेंद्रे, उपाध्यक्ष- उपक्रम नरेश गडेकर, अखिल भारतीय नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे,सरचिटणीस किशोर आयलवार(९९ वे नाट्य संमेलन) कोषाध्यक्ष संजय रहाटे, ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन पार पडले. स्पर्धेत अनेक संस्था व रंगकर्मी यांनी उपस्थिती नोंदवली. प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून विनोद राऊत,अनिल पालकर,माणिक सोवनी यांनी परीक्षण केले.
स्पर्धेची दुसरी फेरी ७ फेब्रुवारी रोजी राजाराम वाचनालय,धरमपेठ येथे संपन्न होईल. या नंतर निवड झालेल्या एकांकिकांची रितसर घोषणा होईल असे स्पर्धेचे सहसंयोजक प्रकाश पात्रिकर यांनी सांगितले. आभार साहसंयोजक रोशन नंदवंशी यांनी मानले.