फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअविनाश पाठक यांना 'राजरत्न ' पुरस्कार

अविनाश पाठक यांना ‘राजरत्न ‘ पुरस्कार

श्रीमंत राजे रघुजीराव महाराज भोसले(प्रथम) बहुउद्देशिय स्मृती प्रतिष्ठान एवं महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टतर्फे विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांना ‘राजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या शिवाय साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विद्यावाचसपती स्वानंद पुंड,क्रीडा क्षेत्रासाठी स्मिता काटवे, सांस्कृतिक क्षेत्रासाठी शिवशाहीर संतोष साळुंखे,छायाचित्र व दूरचित्रवाणीकरिता जयंत हरकरे तसेच श्रीमंत राजे बहादूर अजितसिंग महाराज भोसले स्मृती पुरस्काराने सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना सन्मानित केले जाईल.

१८ वर्ष खालील मुलांमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी कुमार सार्थक,सुखदेव धुर्वे यांना तसेच विशेष कार्य म्हणून कुमार अर्जुन,कृष्णन नायर यांना सन्मानित करण्यात येईल.
दि.१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता सिनियर भोसला पॅलेस,म्हल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत तसेच अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पिठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार सोहळा पार पडेल.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या