नागपूर, दि. ४ नोव्हेंबर २०२४: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज दि. ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ७२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या सर्व विधानसभेसाठी २१७ एवढी झाली असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.विधानसभानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
काटोल मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २२ एवढी होती. पाच उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
सावनेर मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २१ एवढी होती. ३ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
हिंगणा विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २६ एवढी होती. ८ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
उमरेड विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २२ एवढी होती. ११ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या १३ एवढी होती. १ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २४ एवढी होती. २ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २३ एवढी होती. ६ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या ३२ एवढी होती. १२ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता २० उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २३ एवढी होती. ३ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता २० उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या ३० एवढी होती. ४ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता २६ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
कामठी विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २९ एवढी होती. १० उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
रामटेक विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या २४ एवढी होती. ७ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असून आता १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
या उमेदवारांनी घेतली माघार-
नागपूर दक्षिण पश्चिम – मारोती सीताराम वानखेडे (बहुजन रिपब्लीकन सोशॅलीस्ट पार्टी).
नागपूर उत्तर- महेंद्र तुळशीराम भांगे (अपक्ष), अनिल पांडुरंग वासनिक (अपक्ष), प्रविण पाटील (अपक्ष), रमेश श्यामरावजी वानखेडे (अपक्ष).
नागपूर पूर्व – कमलेश हरिचंद नागपाल (अपक्ष), तानाजी सुकलाजी वनवे (अपक्ष), सहदेव भिमराव गोसावी (अपक्ष), सागर दामोधर लोखंडे (अपक्ष), सुफियान खान (अपक्ष), संगीता महेश तलमले (अपक्ष).
नागपूर दक्षिण – माधुरी मोहन मते (बळीराजा पार्टी), अरुण रामभाऊ गाडे ( अपक्ष).
नागपूर मध्य- अशोक आनंदराव धापोडकर, इरफान अहमद गुलामुस्सिबतैन, किशोर समुंद्रे, गंगाधर नागोराव पाठराबे, दीपक उमरेडकर, दीपक देवघरे, प्रफुल बोकडे, राजेश धकाते, विनायक माधवराव पराते (पट्टीवाले). शकील अहमद, संजय रामराव हेडाऊ, हरीशचंद्र वेळेकर.
नागपूर पश्चिम – नरेश वामनराव बरडे (अपक्ष), राजेश जानराव गोपाळे (अपक्ष), राजेंद्र बाबुलाल तिवारी (अपक्ष),
………..
उमरेड- रुपाली प्रमोद घरडे (अपक्ष), शशिकांत बारसु मेश्राम ( आझार समाज पार्टी), घनशाम सोमा राहाटे (अपक्ष), दर्शनी स्वानंद धवड ( अपक्ष), दिलीप सुखदेव बन्सोड ( अपक्ष), पद्माकर डोमाजी बावणे ( अपक्ष), प्रमोद रामचंद्र बावणगडे (अपक्ष), प्रशांत वासुदेवराव कांबळे ( अपक्ष), मिलिन्द इस्तारी सुटे (अपक्ष), राजू देवनाथ पारवे (अपक्ष), शशिकांत हिरामण मेश्राम (अपक्ष).
कामठी – मनोज बाबुराव रंगारी, गणेश आनंद मुदलियार, गणेश बाबुराव पाटील, राजू रघुनाथ वैद्य, सचिन भानुदास पाटील, शौकत अली बागवान, राजेश बापुजी काकडे, दीपक सुधाकर मुळे, संविधान लोखंडे, किशोर मारोतरावर गेडाम.
काटोल – सुबोध बाबुराव मोहिते (अपक्ष), राजश्री श्रीकांत जिचकार (अपक्ष), नरेश जनकराव अरसडे (अपक्ष), वृषभ गजाननराव वानखेडे (अपक्ष), संदीप यशवंतराव सरोदे (अपक्ष)
रामटेक – कारामोरे रमेश प्रभाकर, शांताराम विठोबाजी जळते, हरीषभाऊ गुलाब उइके, किशोर मनोहर बेलसरे, नरेश करन धोपटे, डॅा. राजू उर्फ राजेश ठाकरे, विक्की रतीराम जिभकाटे.
हिंगणा – कॅाम्रेड श्याम गुलाबराव काळे, दिनेश ताराचंद बन्सोड, शिवकुमार गोवर्धन मेश्राम, प्रजय दिनकर रामटेके, सौ उज्वला पुरुषोत्तम बोढारे, राहुल धनराज सोनटक्के, महेंद्र धनजीभाई मेश्राम, नागपुरे वृंदा प्रकाश.
सावनेर – मुकेश सुभाष मित्तल, मेहमुद युसूफ सिद्दीकी, राजू पुंजाराम कांबे.
……………………………..