फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअदानींच्या फायद्यासाठी नागपूरकरांचे आरोग्य ‘काळोखात!'

अदानींच्या फायद्यासाठी नागपूरकरांचे आरोग्य ‘काळोखात!’

विशाल मुत्तेमवार यांचा संतप्त सवाल

आचारसंहिते पूर्वी दोन ६६० मेगावॅट युनिट्सना पर्यावरणीय मंजुरी

नागपूर, २६ सप्टेंबर २०२४: केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) अलीकडेच कोराडी येथील दोन ६६० मेगावॅट युनिट्सना पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. मात्र, या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पण, तरीही भाजपचे आवडते उद्योगपती गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी हे सर्व केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मोदींच्या मित्राला फायदा मिळवून देण्यासाठी नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ का?असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव विशाल मुत्तेमवार यांनी उपस्थित केला.

जनसुनावणीला आव्हान देणारी याचिका न्यायप्रविष्ट-महाजेनको कंपनीकडून नागपुरात २ हजार ४०० मेगावॅट क्षमतेच्या कोराडी औष्णिक वीज प्रस्तावित प्रकल्पाचा विस्तार केला जाणार असल्याने प्रशासनाकडून याकरिता जनसुनावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या जनसुनावणीमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले.त्यामुळे जनसुनावणीला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने कोराडी येथील दोन ६६० मेगावॅट युनिट्सना पर्यावरणीय मंजुरी कशी दिली? असा सवाल विशाल मुत्तेमवार यांनी उपस्थित केला.

या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिक जनतेचे आरोग्य लक्षात घेता न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली.हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही शासनाने टेंडर जाहीर केले.राज्य सरकारची कृती म्हणजे न्यायालयाचा अपमानच म्हणावा लागेल, असेही मुत्तेमवार म्हणाले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून येथे ६६० मेगावॅटचे दोन युनिट सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा विस्तार झाल्यास मानवी आरोग्य, पर्यावरण व शेती धोक्यात येईल. फ्लायअँश विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होईल. यापूर्वी फ्लाय अँशमुळे परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोळशावर चालणारे सर्वाधिक वीज प्रकल्प विदर्भात आहेत. त्याद्वारे 16 हजार 296 मेगावॅट वीज उत्पादन होते. विदर्भाची गरज केवळ दोन हजार मेगावॅटची आहे. उर्वरित वीज राज्याच्या अन्य भागाला वितरित केली जाते. त्यामुळे प्रकल्प विस्ताराचा निर्णय रद्द करण्यात यावा, याकरिता न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र हे प्रकल्प न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र शासनाने अवैध पद्धतीने या प्रकल्पाचा टेंडर काढून Financial Bid ओपन करने चुकीचे आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची खेळी –
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागून होण्याच्या अगोदर कोराडी औष्णिक वीज प्रकल्पासाठी सरकारने अवैधरित्या टेंडर काढले आहे. यावरून ही महायुती सरकारची खेळी असल्याचे स्पष्ट दिसते,असा घणाघात विशाल मुत्तेमवार यांनी केला.

कोराडी यूनिटची स्थापना अदानींच्या लाभासाठी-
महाजेनकोला छत्तीसगडमध्ये एक बंदिस्त कोळसा खाण मिळाली होती.अदानी या खाणीतून कोळसा तयार करणार आहे. कोराडीच्या नवीन युनिटसाठी कोळसा वापरला जाणार आहे.अदानी यांना गोंडखैरी येथील कोळसा खाणही देण्यात आली आहे. त्याच्या पर्यावरणीय मंजुरीलाही आव्हान देण्यात आले आहे परंतु अदानी आणि महायुती सरकार कोराडी युनिट्ससाठी गोंडखैरी कोळसा वापरण्याची आशा आहे.त्यामुळे अदानींच्या खाणींमधून कोळसा खरेदी करण्यासाठीच कोराडी युनिटची स्थापना केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्वरित निविदा रद्द करा –
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नागपूरकरांच्या आरोग्याची चिंता सरकला नाही. या प्रकल्पाचा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी विरोधही केला. मात्र पैसा आणि सत्तेसाठी राज्य सरकारची कृती निंदनीय आहे. सरकारचा हा उद्देश असंवेदनशील टेंडर त्वरित रद्द करण्याची मागणी विशाल मुत्तेमवार यांनी केली.

…………………………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या