फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशुक्रवारी भाजपचा आदिवासी पदाधिकार्‍यांचा मेळावा

शुक्रवारी भाजपचा आदिवासी पदाधिकार्‍यांचा मेळावा

केंद्रियमंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन

नागपूर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या वतीने शुक्रवारला दुपारी १२वाजता वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हील लाईन येथे आदिवासी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत यांनी दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रियमंत्री भुपेंद्र यादव यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,शिवप्रकाश हे मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून एससी .एसटी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.फग्गनसिह कुलस्ते,डॉ. विजयकुमार गावीत, राष्ट्रीय महामंत्री भाजपा मोर्चा एसटीचे खा.अशोक नेते, डॉ.निशांत खरे, एसटी भाजपा अध्यक्ष आ.उत्तमराव इंगळे, अशोक उईके यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यासाठी विदर्भातील १७ जिल्ह्यातील आदिवासी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी महापौर माया इवनाते यांनी केले. पत्रपरिषदेला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम,महामंत्री प्रकाश गेडाम,प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र उईके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या