फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवडीलांना आवाज देताना गॅलरीतून पडली चिमुकली

वडीलांना आवाज देताना गॅलरीतून पडली चिमुकली

नागपूर,ता.१९ सप्टेंबर २०२४: कामावर जात असलेल्या वडीलांना तिस-या मजल्याच्या गॅलरीतून आवाज देताना तोल गेल्याने दोन वर्षीय चिमुकली खाली पडून गंभीर जखमी झाली.

ह्दयाचा थरकाप उडवणारी ही घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील योगी अरविंदनगर,गल्ली क्र.६ येथे घडली.नमस्वी प्रकाश मौंदेकर(वय २)असे मृताचे नाव आहे.प्रकाश यांना दोन अपत्ये असून नमस्वी ही लहान होती.प्रकाश हे चालक आहेत.

मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास प्रकाश कामावर जायला निघाले.तिस-या मजल्यावरील गॅलरीत नमस्वी आली.गॅलरीतील स्टीलच्या ग्रीलवर चढून तिने प्रकाश यांना आवाज दिला.याच दरम्यान तोल गेल्याने ती खाली पडली.गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाली.प्रकाश यांनी तिला मेयो रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी यशोधरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.नमस्वीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

……………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या