फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूर जिल्हा पेटवण्याची चिथावणीखोर भाषा करणाऱ्या केदारांना अटक करा

नागपूर जिल्हा पेटवण्याची चिथावणीखोर भाषा करणाऱ्या केदारांना अटक करा

ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी
भ्रष्टाचारी सुनील केदारांचा दलित विरोधी चेहरा पुढे आला
नागपूर,७ ऑगस्ट २०२४:  हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतच्या दलित महिला उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सरपंच योगेश सातपुते याच्यावर ,पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र भर सभेत सरपंच योगेश सातपुते याच्या कृत्याचे समर्थन करून आरोपीच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू, अशी चिथावणीखोर भाषेत धमकी देणाऱ्या भ्रष्टाचारी सुनील केदारला अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम व नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आतिश उमरे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील सातगाव ग्रामपंचायतचा सरपंच योगेश सातपुते याने गावच्या दलित महिला उपसरपंचावर अभद्र टिप्पणी करून जातीवाचक शिवीगाळ केली. सरपंच योगेश सातपुते यांच्याविरोधात दलित महिला उपसरपंचाने बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपी सरपंचाविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. असे असतानाही दलित महिला उपसरपंचाशी अपशब्दात गैरवर्तवणूक करणाऱ्या या सरपंचाच्या कृत्याचे जनतेपुढे जाहीर सभेत सुनील केदार यांनी समर्थन केले आहे. एवढेच नव्हे तर ‘योगेश सातपुतेच्या केसाला जरी धक्का लागला तर नागपूर जिल्हा पेटवून टाकू’ अशी चिथावणीखोर भाषेत धमकी दिली आहे.
एकूणच हा सर्व प्रकार दलितावरील अत्याचाराच्या घटनांचे समर्थन करणारा आणि आरोपींचे संरक्षण करणारा आहे. जातीजाती मध्ये कलह निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडविण्याचा सुनील केदार यांचा कट आहे.एकीकडे काँग्रेसचे नेते दलितांच्या हिताचा पुळका दाखवतात तर दूसरीकडे त्याच काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार दलितांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वाचविण्याची भाषा करतो. सुनील केदार यांची भूमिका नेहमीच दलितविरोधी राहिली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीत दलित समाजाच्या उमेदवाराला विरोध असो की सातगावच्या महिला उपसरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या योगेश सातपुतेला वाचविण्यासाठी धमकी देणे असो, यातून सुनील केदार यांचा दलित विरोधी चेहरा पुढे आला आहे.
या संपूर्ण प्रकरणी तात्काळ दखल घेऊन दलित उपसरपंचाला अभद्र भाषेत जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या योगेश सातपुतेला अटक करण्यात यावी. तसेच अशा आरोपींचे समर्थन करून नागपूर जिल्ह्यातील वातावरण पेटविण्याची भाषा करणाऱ्या सुनील केदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम व आतिश उमरे यांनी केली आहे.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या