फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'संविधान जागर' चा विचार सर्वदूर रुजेल आणि जिंकेल : ॲड. धर्मपाल मेश्राम

‘संविधान जागर’ चा विचार सर्वदूर रुजेल आणि जिंकेल : ॲड. धर्मपाल मेश्राम

संविधान जागर यात्रेचे नागपुरात जंगी स्वागत
नागपूर. संपूर्ण देशाला एकसंघ ठेवण्याची क्षमता केवळ भारतीय संविधानात आहे. पण स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी वेळोवेळी संविधान धोक्यात असल्याची बतावणी करून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचे पाप काँग्रेसी करतात. त्यांच्या या दांभिकपणावर संविधान जागर यात्रा जोरदार प्रहार ठरेल.  संविधान जागर यात्रेचा विचार सर्वदूर पोहोचेल आणि जिंकेलही, असा विश्वास संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केला. कमाल चौक येथील जाहीर सभेतून ते बोलत होते.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्रद्वारे संविधान जागर यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केलेल्या महाडच्या भूमीतून शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी संविधान जागर यात्रेचा शुभारंभ झाला. शुक्रवारी (ता. ३०) यात्रेचे नागपूर शहरात आगमन झाले. उत्तर नागपूर मधील भीम चौक येथे या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर बाबू हरदासजी  आवळे चौक येथे भव्य जाहीर पार पडली. यावेळी ॲड. मेश्राम बोलत होते.
मंचावर संविधान जागर समितीचे समन्वयक वाल्मिक निकाळजे, विजयराव गव्हाळे, योजनाताई ठोकळे, राजेन्द्र गायकवाड, स्नेहाताई भालेराव, नागसेन पुंडके, संतोष गवळी, अशोकराव गायकवाड, माजी आमदार डॉ. मिलींद माने, संदीप गवई, संदीप जाधव, डॉ. सुधाकर इंगळे, सुभाष पारधी, उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी संविधानाचा चुकीचा प्रचार करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसला केवळ आपल्या पिढीच्या राजकीय भवितव्याची काळजी आहे. त्यातूनच इंदिरा गांधी ४२वी घटना दुरुस्ती करून संविधानाची प्रस्ताविका बदलली .त्यापूर्वी पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना लोकसभेत पोहोचण्यापासून त्यांची कोंडी केली. हा सर्व इतिहास साक्षी असताना आता त्यांचेच वारस खिश्यात संविधान ठेवून ‘संविधान खतरे में हैं‘ ची बतावणी करतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवून खऱ्या अर्थाने संविधानाचा सन्मान केल्याचे धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
लॅटरल एन्ट्री च्या नावावर देशावर अनेक बोगस लादण्याचे पापही काँग्रेसनेच केले. त्याच काँग्रेसचे फितूर होऊन नागपुरातही माजी सनदी अधिकाऱ्याने दिशाभूल करणारे आंदोलन केल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली. पण आता आंबेडकरी जनता समजदार झाली आहे. काँग्रेसच्या भ्रामक बतावणीला ते बळी पडणार नाही. त्यात आता संविधाबद्दलचे सर्व भ्रम खोडून काढण्याचे मौलिक कार्य संविधान जागर यात्रा करीत आहे, असेही संविधान जागर समितीचे समन्वयक ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.
नागपूरातील सामाजिक नेतृत्वाचा देखील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. व्हाईट लोटसचे विनोद वासनिक, संघमित्रा बौध्दीष्ठ संस्थाचे राजेश नंदेश्वर, स्वाभिमान बहुउद्देशिय संस्थाचे राजु साळवे, सहायुध्द संस्थाचे रोशन ठोसर, मनस्वी फाऊंडेशनच्या राखी मानवटकर, प्रवेश सोशल इकॉनॉमी फाऊंडेशनचे अमिताभ मेश्राम, लिंगायत चर्मकार समाजचे विनोद अर्जापुरे, लहु शक्ती सेनाचे रमेश पाडान, संविधानाची बिल्डींगचे किशोर बिहाडे, चर्मकार सेवा संघचे भैयासाहेब बिघाणे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जयसिंग कछवा, लहू सेनाचे संजय कठाडे, एस.बी.एम. विकास सेवा संस्थाचे सतिश सिरसवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केन्द्रचे सुनील तुर्केल, बाबूजी फाऊंडेशनचे डॉ. संदीप शिंदे, बौध्द महासभेचे आनंद सायरे, बौध्द महासभेचे भिमराव खुसे, अरविंद बोरघाटे, सनमकुमार गोंडाणे यासर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात नागसेन पुंडके, स्नेहाताई भालेराव, राजेन्द्र गायकवाड, विजय गव्हाळे, विजय गव्हाळे, वाल्मिकी निकाळजे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश सिरसवान व योजना ठोकडे यांनी तर आभार मोहिनी रामटेके यांनी मानले.
……………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या