फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचाराची अत्याधुनिक पद्धत विकसित:डॉ.सुशील बेरीवाल

सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचाराची अत्याधुनिक पद्धत विकसित:डॉ.सुशील बेरीवाल

अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट (एओआय ), नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल नागपुरच्या संयुक्त उपक्रमातून सीएमईचे आयोजन
नागपूर,ता.२५ ऑगस्ट २०२४: कर्करोग म्हणजे कैंसर हा शब्दच मूळाच भीतीदायक वाटतो.मात्र,अनेक प्रकारच्या कर्करोगावर अत्याधुनिक उपचाराच्या पद्धतीतून सहज मात करता येते,असे उद् गार अमेरिकन सोसायटी ऑफ रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि अमेरिकन ब्रॅकीथेरपी सोसायटीचे सहकारी डॉ .सुशील बेरीवाल यांनी काढले.ते काल रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी रामदासपेठेतील हॉटल सेंटर पॉईंट येथे, अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट (एओआय) व नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरतर्फे ‘कर्करोग रुग्णांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर (क्वालिटी ऑफ लाईफ) लक्ष केंद्रित करणे’ या विषयावर एक ग्रँड कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) कॉन्फरन्स यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली,त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
डॉ. सुशील बेरीवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. रेडिएशन ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि पल्मोनोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, पुनर्वसन आणि पोषण या क्षेत्रातील विशेषज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.या चर्चासत्रात कर्करोग रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या महत्त्वावर सखोल चर्चा करण्यासाठी, पॅनेल आणि व्याख्यानांसाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात आले होते.
कॉन्फरन्स दरम्यान चर्चा झालेल्या विषयांमध्ये तोंडाचे कर्करोग, डोक्याचे कर्करोग आणि मानेच्या कर्करोगात पुनर्वसन शस्त्रक्रियांद्वारे जीवनाचा दर्जा सुधारणे, स्त्रीरोगविषयक कर्करोगाच्या व्यवस्थापनात जीवनाच्या गुणवत्तेच्या (क्वालिटी ऑफ लाईफ) समस्यांचे निराकरण करणे, ऑलिगोमेटास्टॅटिक रोग: पॅलिएशनपासून बरा होण्यासाठी पॅराडाइम शिफ्ट, सिस्टीमिक कॅन्सर थेरपी घेणाऱ्या रूग्णांमध्ये जीवनाचा दर्जा राखणे, कर्करोगाच्या उपचारांमध्ये जगण्यावर लक्ष केंद्रित करणे, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेडिकल ऑन्कोलॉजीमधील प्रगतीचे एकत्रीकरण – इम्युनोथेरपी आणि लक्ष्यित उपचारांवर लक्ष केंद्रित करणे, बालरोगविषयक घातक रोगांमधील जीवनाच्या गुणवत्तेच्या समस्या आदी अनेक महत्वाचे विषय समाविष्ट होते.
आजच्या चर्चासत्रात डॉ.सुशील बेरीवाल यांच्यासोबत आमच्या नांगिया हॉस्पीटलचे तसेच शहरातील अनेक तज्ज्ञ जुळले.कर्करोगावरील उपचारासाठी विकसित झालेल्या नवीन यंत्रे,उपकरणे,औषधे, रुग्ण बरे तर होतात मात्र,उपचार पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीरावर औषधे,रेडीएकशन,किमोथेरपीचे विपरित परिणाम इत्यादी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.रु‘ग्णांचे गुणवत्तापूर्ण जीवन’ यावर चर्चा गरजचे होती असे डॉ.फाटे म्हणाले.या चर्चेतून मोलाचे निष्कर्ष निघाले,याचा फायदा कर्करोगाच्या रुग्णांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी होईल.डॉ.बेरीवाल यांचे मार्गदर्शन आम्हाला व शहरातील सर्वच कैंसरचे निदान करणा-या डॉक्टर्सना उपयोगी पडेल,असे ते म्हणाले.
डॉ.बेरीवाल यांच्याकडून कर्करोग,शस्त्रक्रिया,रेडीएशन,किमोथेरपी याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले.कोणत्याही कर्क रोग झालेल्या रुग्णावर औषधोपचार झाल्यानंतरही तो रुग्ण सामान्य व्यक्तीसारखाच जगला पाहिजे,यावर आज चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला असल्याचे डॉ.फाटे यांनी सांगितले.
आमच्या रुग्णालयातील ‘हेलिसियोन’या अत्याधूनिक मशीनमुळे रुग्णांवरील रेडीएशनची मात्रा कमी झाली.टॉक्सिसिटी कमी झाले,विदर्भातील ही पहीली अत्याधूनिक मशीन असल्याची माहीती डॉ.मंगेश पाटील यांनी दिली.
याप्रश्‍नी बोलताना,शासकीय जितक्या पण आरोग्य योजना आहे,महात्मा फूले योजना,पंतप्रधान जनअरोग्य योजना त्या योजनांच्या लाथार्थ्यांनाही आमचे रुग्णालय लाभ देत असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय सीजीएचएस,डब्ल्यूसीएल,रेल्वे इत्यादी शासकीय कर्मचा-यांना आम्ही २० टक्के कमी दराने उपचार देत असल्याची माहिती त्यांनी दिली.कर्क रोगावर उपचार करणारी विदर्भात पहिली अत्याधूनिक उपचार यंत्र जरी आमच्या रुग्णालयात असली तरी आम्ही त्यासाठी कोणतेही नवे दर आकारत नाही,असे ते म्हणाले.महत्वाचे म्हणजे कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत,रक्ताचा कर्करोग,इंटरनल ट्यूमर कँसर,डोक्याचा,मानेचा,महिलांमध्ये गर्भाशय,स्तनांचा कर्करोग,यावरील उपचार पद्धत ही फार लांब असते.या उपचारादरम्यान प्रोटोकॉलचे पालन करने गरजेचे असते कारण कर्करोग हा परत संधी देत नसतो.
रक्ताचा कर्करोग,मूत्रपिंडाचा कर्करोग,गुदा मार्गाचा कर्करोग हे फक्त रेडीएशनने बरे होणारे असतात,यासाठी शस्त्रक्रियेची गरज नसते.आमच्याकडील ‘हेलिसियोन’मशीन सर्व प्रकारच्या कर्करोगावर यशस्वी उपचार करण्यास सक्षम असल्याचे डॉ.मंगेश पाटील यांनी सांगितले.लहान मुलांमधील कर्करोग ८० टक्के बरे होतात तेच वयस्कर लोकांमध्ये थोडे कमी असल्याचे त्यांनी सांगितले.हा एक असा रोग आहे ज्याचे निदान झाल्यावर रुग्ण आणि रुग्णाचे कुटूंबिय यांच्यासोबत डॉक्टर्सला प्रदीर्घ चर्चा करावी लागते.उपचार पद्धत तसेच औषधोपचार,रेडीएशन,किमो याचे विपरीत परिणामांची माहिती रुग्णाच्या कुटूंबियांना दिली जाते.कर्क रोग हा बरा करता येतो,फक्त भारतात जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले.
एका प्रश्‍नाच्या उत्तरात डॉ.मंगेश म्हणाले की,कर्करोगाच्या पेशी या मानवाच्या शरीराच्या आतच असतात.आपली अनारोग्यदायी जीवनशैली, चुकीचे खानपान,शरीरावरील तनावाचे परिणाम,तंबाकू,मद्यप्राशन,अम्ली पदार्थांचे सेवन इत्यादी विविध कारणांमुळे मानवी शरीरातील या पेशी सक्रीय होतात.

कर्करोग होण्यामध्ये अनुवांशिकतेचा भाग,यावर प्रश्‍न केला असता,डोके व मानाचा कर्करोग गुणसूत्रांतून होत नाही मात्र,महिलांमधील स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होण्यात काही अंशी गुणसूत्राचे योगदान असते,अशी माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी सीटीएसआय-दक्षिण आशिया कार्यक्रमाच्या यशाबद्दल उत्साह व्यक्त करताना कार्यकारी व्यवस्थापक महेश नांगिया(प्रमोटर,एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल )म्हणाले, की कर्करोग रूग्णांना त्यांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करीत, सहानुभूतीपूर्ण काळजी प्रदान करून त्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही एक वैयक्तिक अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत जो त्यांना सन्मानाने आणि आशेने त्यांचा प्रवास करण्यास मदत करतो.ऑन्कोलॉजीमधील आमच्या उत्कृष्टतेबरोबरच, आम्ही आमच्या मल्टी-स्पेशालिटी एजद्वारे सर्वांगीण काळजी देण्यावर लक्ष केंद्रित करतो सीएमई कॅन्सर केअरमध्ये सतत प्रगती करण्याच्या एओआयच्या समर्पणाचे उदाहरण आहे.  रूग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून,आम्ही त्यांच्या उपचार प्रवासातील मेडिकल उपचारांपासून ते संपूर्ण कल्याणापर्यंत प्रत्येक पैलूच्या विचाराची खात्री देत असतो.
या कार्यक्रमात तज्ञांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा देखील समावेश होता ज्यांनी कर्करोगाच्या उपचारातील नवीनतम प्रगती आणि नवकल्पनांवर चर्चा केली. यामध्ये केवळ उपचारात्मक हस्तक्षेपच नव्हे तर रूग्णांच्या भावनिक, पौष्टिक आणि पुनर्वसनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी बहु-अनुशासनात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
डॉ.सुशील बेरीवाल म्हणाले की,कर्करोगाच्या काळजीने केवळ रोगावरच नव्हे तर संपूर्ण रुग्णावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी डॉ. मंगेश पाटील, डॉ. आशिष भांगे आणि डॉ. अभिनव पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली एओआय नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केल्याबद्दल आणि कर्करोगाच्या रूग्णांच्या हितासाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल कौतुक केले.आम्ही आमच्या रूग्णांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक समर्थन प्रदान करण्यासाठी समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. हृषिकेश फाटे, सुविधा संचालक, एओआय  नागपूर, या कार्यक्रमावर भाष्य करताना म्हणाले, या सीएमईने रुग्णाची काळजी घेण्यासाठी आमची वचनबद्धता मजबूत केली आहे. विविध मेडिकल विषयांवर चर्चा करून, आम्ही सर्वसमावेशक उपाय शोधून काढले आहेत, जी आम्हाला आमच्या रुग्णांना त्यांच्या कर्करोगाच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या प्रकारे मदत करतील.कॅन्सर केअरच्या सीमा पार करण्यासाठी सर्व सहभागींच्या नव्या समर्पणाने कॉन्फरन्सचा समारोप झाला, ज्याने रुग्णांना केवळ जीवन वाचवणारे उपचारच दिले नाहीत तर जीवनाचा दर्जा सुधारला जाईल याची खात्री दिली,असे ते म्हणाले.
महेश नांगिया म्हणाले, की कर्करोग रूग्णांना त्यांच्या शारीरिक आणि भावनिक गरजा पूर्ण करणारी सहानुभूतीपूर्ण काळजी प्रदान करून त्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.आम्ही एक वैयक्तिक अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत जो त्यांना सन्मानाने आणि आशेने त्यांचा प्रवास करण्यास मदत करतो.ऑन्कोलॉजीमधील आमच्या उत्कृष्टतेबरोबरच, आम्ही आमच्या मल्टी-स्पेशालिटी एजद्वारे सर्वांगीण काळजी देण्यावर लक्ष  केंद्रित  करतो.
…………………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या