फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजहिंगणा वन विभागाचा अजब कारभार!

हिंगणा वन विभागाचा अजब कारभार!

रान डूक्करची धडक शवविच्छेदनमध्ये कसे सिद्ध करणार?
रान डुक्कर रस्त्यात आडवा आल्याने दुचाकी वाहन चालकाचा दूर्देवी मृत्यू                               
हिंगणा रोड  ते  मोहगाव रोड वरील बायपास पुलाजवळ घडली दुर्घटना
नागपूर,ता.२४ ऑगस्ट २०२४: हिंगणा रोड  ते  मोहगाव रोड वरील बायपास पुलाजवळ              अचानक  रस्त्यात आडवा आलेला रानडुक्कर एका दुचाकी स्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. मृतक व्यक्तीचं नाव धर्मपाल मुकुंदराव वाघमारे वय ४९ वर्ष राहणार सुकळी ( कलार ) असून  ते गावात छोटंसं  किराणा दुकान चालवायचे . दिनाक २० ऑगस्ट २०२४ रोजी मोटरसायकल क्रमांक MH40_S 8306  ने हिंगण्यापासून कलार सुकळीला जात  असतांना दुपारी साढे ४.३० वा.दरम्यान हिंगणा मोहगाव रोडवर हिंगणा बायपास टी पाईंट जवळून १ किलोमीटर अंतरावर  शेतातून अचानक रान डुक्कर दुचाकी समोर आडवा आल्याने दुचाकीची धडक झाल्यामुळे ते रस्त्यात कोसळले .
अशी माहिती विरुद्ध दिशेने आपल्या आई सोबत  मोपेड  वर बसून येत असलेल्या पवन नावाच्या मुलाने पोलिसांना सांगितली.  या घटनेत धर्मपाल वाघमारे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ  ग्रामीण रुगणालय हिंगणा येथे उपचारास दाखल करण्यात आले मात्र, त्यांची  बिघडत असलेली गंभीर परिस्थिती बघून डॉक्टरांनी त्यांना वानाडोंगरी स्थित शालिनीलाई मेघे रुग्णालयात दाखल केले जिथे त्यांचा रात्री १०.३० वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

(छायाचित्र : मृतक धर्मपाल मुकुंदराव वाघमारे)

काही वर्षांपूर्वीच त्यांची पत्नी मनीषा वाघमारे यांचा देखील आजारामुळे मृत्यू झाला होता.  त्यांच्या पाठीमागे मुलगा हिमांशू वाघमारे असून या घटनेमुळे त्याच्या डोक्यावरचा वडिलांचा आधार देखील तो आता गमावून बसला आहे. हिमांशू नागपूरात इतर काही मुलांसोबत रुम शेअर करुन राहत असून भाड्याने ओला चालवून आपला चरितार्थ चालवतो.ज्या पित्याच्या ओढीने तो गावी जात असे ते गांव एका रान डूकरामुळे कायमचे त्याला आता पारखे झाले आहे.
हिमांशूने सांगितल्याप्रमाणे त्याला हिंगणा वनविभाग कडून फोन आला होता मात्र ,तिथे गेल्यावर तेथील वनकर्मींनी दूर्घटनेची माहिती घेऊन सांगितले की,४८ तासांच्या आत वन विभागाला  दुर्घटनेची माहिती मिळाली नाही म्हणून आम्ही काहीही करू शकत  नाही! पोलिसांनी वन विभागाला दूर्घटनेचे कारण व प्रत्यक्षदर्शीचे बयाण कळवले असून देखील,  वन विभागाने वाघमारे यांच्या मृत्यूची गांर्भीयाने दखल घेतली नाही.पोलिसांच्या सूचनेनुसार हिमांशू याचा अर्ज घेतला मात्र,हा अर्ज पुढे पाठवतो पण,४८ तासांच्या आत दुर्घटनेविषयी कळवले नसल्याने तो शंभर टक्के रद्द होणार असल्याचा दावा हिंगणा वन विभागाच्या कर्मचा-यांनी हिमांशूकडे केला.
महत्वाचे म्हणजे  दुर्घटनेच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने आपण मदत करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. मूळात बायपासवर व संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही नसल्याचा दोष हा हिमांशूचा आहे का?त्याने पुरावा कूठून आणावा?प्रत्यक्षदर्शी पवन याने पोलिसांना दिलेल्या जबानीला वन विभागाच्या लेखी कोणतेही शासकीय महत्व नाही का?ऐरवी वन विभागातर्फे व राज्य शासनातर्फे प्राण्यांमुळे होणा-या मृत्यूलाही शासकीय मदत जाहीर करण्यात आली असून अशी मदत मात्र,नेमकी मग कोणाला देण्यात येते?कोण असतात त्याचे लाथार्थी?घरातील कर्ता पुरुष याचे अपघाती निधन कोणत्याही तरुणासाठी मानसिक धक्क्याचे कारण ठरले असतानाही ,वन विभागानुसार अंत्यसंस्काराच्या तिन्ही दिवसांचे विधी सोडून वन विभागात येऊन आधी अर्ज दाखल करायला हवे होते का?
यावर कहर म्हणजे शवविच्छेदन अहवालात वाघमारे यांचा मृत्यू रान डूक्कर याच्या धडकेने झाल्याचे सिद्ध झाल्यास हिमांशूचा अर्ज स्वीकारला जाईल,असे अजब उत्तर हिंगणा वन विभागाच्या कर्मचा-यांनी शांतनूला दिले!मूळात शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण हे रस्त्यावरचा मार किवा इतर कारण नमूद असेल,त्यात नेमके रान डूक्करने दिलेली धडक कसे नमूद असणार?
वनमंत्री व उपमुख्यमंत्री नागपूरचे असताना पिडीत तरुणाला न्याय देण्याची मागणी स्थानिक गावक-यांनी केली आहे.हिंगणा पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.
……………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या