फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमप्रेमाचा आ‘वेग’कारमध्येही आवरेना !

प्रेमाचा आ‘वेग’कारमध्येही आवरेना !

धावत्या कारमध्ये उच्चविद्याभूषित तरुणाईचे अश्‍लील चाळे
पोलिसांनी धरले,पालकांना बोलावले
नागपूर,१६ जुलै २०२४ : प्रेमाचा आवेग हा भल्याभल्यांना थोपवता येत नाही,त्यात तरुणाईला जर प्रेमाची ही भरती आली असेल तर नीती-मूल्यांना आहोटी लागल्याशिवाय राहत नाही.असाच एक लाजिरवाणा अनुभव लॉ कॉलेज ते धरमपेठ परिसरादरम्यान धावत्या कारमध्ये प्रेमी युगुलाच्या अश्लील चाळ्यांमुळे नागपूरकरांनी अनुभवला.या चाळ्याची चित्रफित मंगळवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या चित्रफितीमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रेमी युगुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी कारच्या क्रमांकाच्या आधारे चालक व तरुणीचा शोध घेतला. दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात मोटार वाहन कायद्यासह विविध कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल केला. सूरज राजकुमार सोनी व त्याची प्रेयसी, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सूरज राजकुमार सोनी (वय २८ वर्ष, रा. मानकापूर) असे तरुणाचे नाव आहे. त्याने चार्टर्ड अकाउंटंट म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे. आणि त्याची मैत्रीण मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज हा सोमवारी सायंकाळी कारने लॉ कॉलेज चौकात आला. काही वेळात त्याची प्रेयसीही मोपेडने तेथे आली. तिने लॉ कॉलेज परिसरात मोपेड पार्क केली. ती कारमध्ये बसली. दोघेही कारने काही अंतरावर असलेल्या नाश्त्याच्या स्टॉलवर गेले.
तेथे नाश्ता केल्यानंतर दोघेही कारने निघाले. गिरीपेठ परिसरात तरुणी चक्क कार चालक सूरजच्या मांडीवर जाऊन बसली. त्यानंतर दोघेही धावत्या कारमध्ये अश्लील चाळे करायला लागले. एका मोटारसायकल चालकाने हे चाळे मोबाइलमध्ये कैद केले.

त्यानंतर ते समाजमाध्यमांवर व्हायरल केले. ही चित्रफीत व्हायरल झाल्याने मंगळवारी सीसीटीव्हीच्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी एमएच-३१-एफए-६५०६ या क्रमांकाच्या कार चालकाचा शोध सुरू केला. पोलिसांनी कार चालक व त्याच्या प्रेयसीची ओळख पटवली.
दोघांना पालकांसह चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलाविले. चौकशीनंतर पोलिसांनी सूरज व त्याच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल केला. जामिनावर त्यांची सुटका केली. ही कार सूरजच्या वडिलाच्या नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जामीनपात्र प्रकरण असल्याने दोघांनाही नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
मात्र,उच्चविद्याभूषित असूनही सार्वजनिक ठिकाणावर भरधाव वेगाने कार चालवित असताना अश्‍याप्रकारचे अश्‍लील चाळे करुन स्वत:सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालणा-या या प्रेमवीरांच्या विरोधात जनमानस चांगलेच संतापले असून ‘जना ची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगायला हवी होती’अशी टिका साेशल मिडीयावर उमटली आहे.आपल्या पालकांना आपल्या उफाळून येणा-या तारुण्याच्या कृत्यातून, पोलिस ठाणे दाखविणा-या त्या तरुणीला नेटीझन्सनी चांगलेच झोडपून काढल्याचे दिसून पडत आहे.
………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या