सीताबर्डी येथील घटना: अनाथ मुलीवर केला रात्रभर अत्याचार
नागपूर,ता.११ जुलै २०२४: शासकीय मुलींच्या वसतिगृहातून पळून आलेल्या १६ वर्षीय अनाथ अल्पवयीन मुलीवर रात्रभर अत्याचार करणा-या ७ नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (पोक्सो विशेष)कायद्याप्रमाणे मरेपर्यंत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.तसेच,प्रत्येकी १८ हजार रुपये दंड,दंड न भरल्यास एक वर्षांच्या अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.तर,त्यांना मदत करणा-या ४ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.२१ एप्रिल २०१७ रोजी घडलेल्या या घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती.
न्या.पी.पांडे यांनी निर्णय दिला.बाबा उर्फ अतुल उर्फ नरेश जनबंधू(वय २९,रा.कुशीनगर,जरीपटका),फिरोज अहमद जमिल अहमद(वय ४७,रा.तहसील),चिंट्या उर्फ स्वप्नील देवानंद जवादे(वय ३४,रा.राहूलनगर,सोमलवाडा)मयूर रमेश बारसागडे(वय ३०,रा.इंदोरा,लघुवेतन कॉलनी)कृष्णा हरिदास डोंगरे(वय ३१ रा.गौतमनगर,खामला),जीतू उर्फ चन्नी रमेश मंगलानी (वय २९,रा.व्यंकटेशनगर,खामला)आणि सचिन गोविंदराव बावणे(वय २९,रा.दर्ग्याजवळ,कुंभारटोली)असे या आरोपी नराधमांची नावे आहेत.
याच प्रकरणात आरोपींना साहित्य पुरविणारे प्रलय चंदू मेश्राम व सोमिल अशोक नरखेडकर तसेच चौकीदार सुरेश दामोदर बारसागडे आणि मनोहर अडूक सारखे यांना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले.
पीडित मुलगी घटनेच्या वेळी १६ वर्षांची होती.काटोल राेडवरील वसतिगृहाततून पीडितेसह चार अल्पवयीन मुली २० एप्रिल २०१७ रोजी सकाळी पळाल्या होत्या.रात्री त्या सीताबर्डीतील एका दूकानाच्या आडोशाला थांबल्या आणि २१ एिप्रल रोजी त्या पैकी तिघी निघून गेल्या.ही मुलगी याच भागात थांबली.रात्री १० वाजता ती सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या बाजूला असलेल्या मॉल जवळील फटपाथवर बसून होती.भूकेने व्याकूल झाल्यामुळे रडत होती.आरोपी फिरोज,त्याच्या दूकानातील नोकर मयूर,बाबा आणि चिंट्या तिच्यावर नजर ठेऊन होते.या चौघांनी तिला का रडते,अशी विचारणा केली.तिने खूप भूक लागली असल्याचे त्यांना सांगितले.आरोपींनी तिला जेवणाचे आमिष दाखूव चिंट्याच्या ऑटोमध्ये बसवले.
त्यानंतर तिला जरीपटकातील सुगतनगर मधल्या बांधकाम सुरु असलेल्या प्रतीक्षा अपार्टमेंटमध्ये नेले.तेथे तिच्यावर चारही जणांनी रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला.पहाटे चारच्या सुमारास आरोपींनी तिला ऑटोमध्ये बसवून पुन्हा सीताबर्डीत आणून सोडले.
सीताबर्डी येथून दुस-या दिवशी अन्य तिघांनी तिला बळजबरीने आपल्यासोबत खामला येथे नेले.खामला परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला व परत सीताबर्डी परिसरात आणून सोडले.सकाळी या भागात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक शाखेच्या पोलिसाला तिची अवस्था बघून संशय आला.अल्पवयीन निराधार मुलीवर सलग दोन दिवस सामूहिक बलात्कार झाल्याच्या या घटनेने संपूर्ण पोलिस यंत्रणा हादरली होती.
पीडिता ही नवव्या वर्षापासून अनाथलयात राहत होती.पीडितेच्या व्यसनाधीन वडिलांचे निधन झाल्यानंतर आईचे देखील निधन झाले. ९ वर्षांची असताना नातेवाईकांनी तिला श्रद्धानंद अनाथलयात आणून सोडले.२०१६ मध्ये ती तिथून काटोल रोडवरील शासकीय वसतिगृहात पोहचली.
न्यायालयाने एकणू २४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.शासनासर्फे ॲड.माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.