फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशसरसंघचालकांची ‘उशिराची’ कानटोचणी

सरसंघचालकांची ‘उशिराची’ कानटोचणी

अंहकार,मर्यादा,सेवक,असत्य,मणिपूर,समरसता,सद्भभावना,चित्त शब्दांची भाषणात भरमार:कोणाला इशारा?
नागपूर,ता.११ जून २०२४: देशातील लोकसभा निवडणूकीचे निकाल आणि नागपूर महानगर कार्यकर्ता विकास वर्गाचा दुसरा समारोप साेहळा हा योगायोग जुळून आला. त्यात सरसंघचालक मोहन भागवतांनी ज्याप्रकारे देशाच्या शीर्षस्थ नेत्याची कानउघाडणी केली ते ऐकता,हीच कानउघाडणी गेल्या पाच वर्षात सरसंघचालकांना का करावीशी वाटली नाही?असा प्रश्‍न आता विचारला जात आहे.लोकसभेचे निकाल लागणे आणि भागवतांनी कानटोचणी करने,या योगायोगावर समाज माध्यमात चांगलीच चर्चा रंगली आहे.
लोकसभेत २०१९ मध्ये ३०० च्या वर बहूमत असणा-या भारतीय जनता पक्षाला यंदा साधा बहूमताचाआकडा ही गाठता आला नाही,इतकंच नव्हे तर बहूमतासाठी आंध्र प्रदेशच्या तेलगुदेशमचे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे  नितीश कुमार यांच्या कुबड्यांचा आधार घ्यावा लागला,हे बघता सरसंघचालकांच्या मनातील उद्वीग्नता त्यांच्या भाषणात उमटली नसती तर नवलच.
२०१९ मध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला देशातील जनतेने ३०० चा आकडा सहज पार करुन दिला.निश्‍चितच त्या निवडणूकीत मोदी यांच्याच ‘चेह-यावरच’ मत पडले मात्र,२०२४ ची निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी होती,या निवडणूकीत जनते समोर जाण्यासाठी कोणताही भावनिक मुद्दा नव्हता तर मोदी यांना त्यांनी दहा वर्षात केलेले कार्य, यावरच जनतेच्या सहमतीची मोहर उमटवायची होती.दूर्देवाने मोदी यांचे गत काही वर्षातील कार्य हे अहंकाराने भारलेले होते.विरोधकांना तुच्छ लेखणे,नामशेष करणे,केंद्रीय संस्थांच्या भीतीतून राजकीय पक्षात फूट पाडणे,आधी भ्रष्टाचाराचा आरोप करने मग त्यांनाच पक्षात घेणे, काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची तातडीने  रद्द केलेली खासदारकी,फक्त समज देऊन प्रकरण न मिटवता बंगालच्या मोईत्रा यांची खासदारकी रद्द करणे,लोकनिर्वाचित १४३ विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करुन विधेयके मंजूर करुन घेणे,राम मंदिर उद् घाटनाचे संपूर्ण श्रेय एकट्याने लाटणे,देशात भाजपच्या सत्तेचा पायवा ज्यांनी रचला त्या लालकृष्ण अडवाणी,मुरली मनाेहर जोशींनाही राम मंदिर उद् घाटनाचे निमंत्रण मिळून सुद्धा प्रकृतीचे कारण देत येऊ नका असा निरोप राम मंदिर न्यासाकडून मिळणे,स्वत:ला जीवशास्त्रीय उत्पत्ती न मानता परमेश्‍वराचा अवतार मानणे,या सर्व गोष्टी मतदानामध्ये उमटल्या नसत्या तर नवलच.
ही संपूर्ण पिडा सरसंघचालकांच्या भाषणात तंतोतंत उतरली.अजून खूप काही करायचे बाकी आहे मात्र,ती गोष्ट अहंकारातून साध्य होत नसल्याचा सारगर्भित संदेश भागवतांनी दिला.निवडणूका संपल्या,निकाल देखील आले आणि सरकार देखील बनली.चर्चा मात्र सुरु आहे जे झाले,का झाले,कसे झाले.देशाच्या लोकशाहीत दर पाच वर्षांनंतर घडणारी ही स्वाभाविक बाब असल्याचे ते म्हणाले.समाजाने मत दिलं आणि घडलं.संघ यात मध्ये पडत नाही,आम्ही आपले कर्तव्य करीत असतो.देशाच्या धोरणांसाठी सत्ता महत्वाची आहे हे देखील तितकेच खरे.असे सांगत सत्यप्रकाश महाराजांनी संत कबीरांचे कालच मला एक वचन सांगितले असे भागवत म्हणाले.‘र्निबंधा बंधा रे बंधा निर्बंधा होय.कर्म करे…’जो सेवा करतो त्याला काही ‘मर्यादा’ असते.कोणतीही गोष्ट ही अर्निबंध नसते. ‘सेवक‘ हा मर्यादाने चालतो.काम सगळेच करतात मात्र, काम करीत असताना ‘मर्यादा‘चे पालन देखील तितकेच महत्वाचे असल्याचे सरसंघचालक म्हणाले.हा जणू सरसंघचालकांचा सत्तेचा ’अमर्याद’वापर करणारे मोदी यांना दिलेली शालजोडीतील चपराक होती,अशीच चर्चा रंगली आहे.
मोदी यांना देशाचे शीर्षस्थ स्थान मिळून व देशासाठी ते काम करीत असतानाही काही ‘मर्यादा’चे पालन होने अत्यावश्‍यक होते,असा याचा अर्थ ध्वनित होतो.तथागत सांगतात ‘कुसलस्य उपसंपदा’याचा अर्थ स्वत:चे पोट भरण्यासाठी काम केलेच पाहिजे,देहाला उपाशी नका ठेऊ मात्र ते करताना कौशल्याने करा,याचाच अर्थ ते काम करताना दूस-यांना ही धक्का लागता कामा नये,ही मर्यादा तथागतांना अपेक्षीत होती.मर्यादा हाच आपला धर्म आणि संस्कृती आहे.जो मर्यादा पाळून काम करतो,कर्म करतो,त्याच्यात अहंकार येत नाही की ‘मी केले!‘भागवतांचा हा संदेश नेमका कोणासाठी होता?तोच व्यक्ती ‘सेवक’म्हणून घेण्याचा अधिकारी होतो.प्रधानसेवकांसाठी जणू हा संदेशच होता.
आता याच गोष्टीत गुंतून राहून तर काम होणार नाही.देशाच्या लोकतांत्रिक व्यवस्थेत दोन पक्ष असतातच,त्यांच्यात सत्तेसाठी स्पर्धा असतेच,स्पर्धेमुळे दुस-याला मागे करुन स्वत:ला पुढे करण्याचे काम होत असते,झाले देखील पाहिजे.मात्र,त्यात ही एक मर्यादा आहे,‘असत्याचा’ उपयोग करता कामा नये,देशातील जनता लोकप्रतिनिधींना निवडून संसदेत पाठवत असते,संसदेत ते ‘सहमती’बनवून देश चालवतील,ही जनतेला अपेक्षा असते.आपली पंरपराच सहमती बनवून चालण्याची आहे.सहचित्तावर आचार्य विनोबा भावेंची टिपण्णी आहे,ते म्हणतात ऋग्वेद ज्ञानतज्ज्ञांना मानवी मनाचे अगाध ज्ञान होते,सगळ्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे चित्तमानस हे वेगवेगळे असते,त्यामुळे शंभर टक्के मतांमध्ये सारखेपणा शक्यच नाही.मात्र,जेव्हा समाजातील लोक त्यांचे चित्त वेगवेगळे असतानाही ’आपल्याला सोबतच चालायचं आहे’असा निर्धार करतात तेव्हा सहचित्त बनत असतं.संसद कशासाठी आहे?संसदेत विविध राजकीय पक्ष का आहेत?संसद यासाठी आहे कारण दोन्ही पैलू जनतेसमोर मांडले जावे.ज्याप्रमाणे शिक्क्याला दोन पैलू असतात.तसेच कोणत्याही प्रश्‍नांनाही दोन पैलू असतात.एक पक्ष एका पैलूचा विचार करतात, दूसरा पक्ष दूसरा पैलू उजागर करणे अपेक्षीत आहे जेणेकरुन जे काही घडले ते सर्व योग्य असेल.’सहमती’गरजेची आहे.ही स्पर्धा आहे,एकमेकांशी युद्ध नाही.मात्र,ज्याप्रकारे राजकारणात जे घडले,एकमेकांवर ज्या स्तराला जाऊन चिखलफेक झाली,प्रचारा दरम्यान दोन समाजामध्ये भेद निर्माण होईल,समाज वाटल्या जाईल,दोन समाजात एकमेकांविषयी संशय निर्माण होईल,याचा देखील विचार केला गेला नाही,असा स्पष्ट आरोप सरसंघचालकांनी केला.

स्व-प्रतिमेवर अत्यधिक प्रेम असणा-णा-या मोदींनी विरोधकांना ‘तुच्छ’लेखले.‘सहमती’चे राजकारण तर मोदींच्या आचार-विचार आणि कृतीत गेल्या पाच वर्षात कुठेही दिसून पडले नाही. त्यामुळेच भागवतांचे हे बोल,कानटोचणी ही वेळ निघून गेल्यावरचे आक्रंदन या पलीकडे काही ठरत नाही.
यंदा मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतरही मतदानाची टक्केवारी ही कमी होती,मोदींच्या नावावर यंदा भरभरुन मत देण्यासाठी मतदार हा बाहेर पडलाच नाही,ते बघता मोदींनी निवडणूकीच्या तिस-या टप्प्यात प्रचाराची सगळी दिशाच बदलली.प्रचारात हिंदू-मुस्लिम पासून तर ‘व्होट जिहाद’चा मुद्दा रेटला.यामुळे देशात सरळ-सरळ दोन समुदायांमध्ये मतविभागणी झाली,याचा फायदा उत्तरप्रदेशात समजावादी पक्षाला तर महाराष्ट्रात काँग्रेस व उबाठाला झाला.उत्तरप्रदेशात २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला ८० पैकी ६२ जागा तर २ जागा मित्रपक्षाला मिळाल्या होत्या.मोदींच्या प्रचाराची दशा व दिशा बघता यंदा भाजपला उत्तरप्रदेशात फक्त ३४ जागा मिळाल्या, तर महाराष्ट्रात मागील निवडणूकीत २५ जागा असताना यंदा ९ जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.या दोन राज्यांनी मोदींचा बहूमताचा आकडाच रोखला,परिणामी भागवतांचे हे बोल फार-फार आशयगर्भित ठरतात,यात वाद नाही.
विनाकारण संघसारख्या संघटनेला देखील हिंदू-मुस्लिम वादात ओढण्यात आले,यावर देखील भागवतांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.तंत्रज्ञानाचा आधार घेऊन असत्य गोष्टींचा प्रचार करण्यात आला.सगळ्यांना देशच चालवायचा आहे तरी देखील ‘असत्याचा’ आधार का?असा सवाल त्यांनी केला.मी विरोधी पक्षांना विरोधी मानत नसून ‘प्रतिपक्ष’ समजतो,असे भागवत म्हणाले.ते त्यांची भूमिका मांडतात आहेत,त्याचा देखील विचार झाला पाहिजे.याच विचारातून निवडणूका लढताना मर्यादेचे पालन फार गरजेचे होते,अशी खंत व्यक्त करीत, असे पालन न झाल्यानेच असे निकाल पुढे आले.या मर्यादेचे पालन इतके गरजेचे होते कारण अद्याप आपल्या देशासमोरचे आव्हान यांचे निराकरण व्हायचे आहे असे ते म्हणाले.ही चांगली बाब आहे की तीच एनडीए सरकार पुन्हा देशात सत्तेवर आली,असे समाधान ही त्यांनी व्यक्त केले.
देशात मागील दहा वर्षात असे नाही की काहीच चांगले झाले नाही,खूप काही चांगले ही  झाले.आर्थिक स्थिती सुधारली.सामरिक स्थिती चांगली आहे.जगात प्रतिष्ठा वाढली.क्रीडा,कला,ज्ञान-विज्ञान,संस्कृतीच्या क्षेत्रात जगात आपण पुढे येत आहोत.याचा अर्थ हा नाही की आपण सगळ्या आव्हानातून मुक्त झालो.
आता निवडणूकीच्या आवेशात जो ‘अतिरेक‘झाला,त्यातून मुक्त होऊन आता आपल्याला येणा-या गोष्टींचा विचार करायचा आहे.समस्यांचे निराकरण करायचे आहे.यंदा हिल स्टेशन्सवर ही अत्यधिक गर्मी पडली.बंगलुरुत तर भू-गर्भातील पाणीच संपले.पर्यावरणावर अभूतपूर्व संकट कोसळले आहे.भारत तर पर्यावरण पुजनीय असून,आपल्या भारतीय जीवनशैलीतच पर्यावरणपूरक आचरण आहे.आमच्यापाशी ही दृष्टि आधीपासून असल्यामुळे तो भारत जगाला या समस्येतून कशी मुक्ती देणार,हे जगाला सांगायचे असून स्वच्या आधारावर विकास गाठायचा आहे.सृष्टि आपली माता आहे,आपण सृष्टिचे विजेता नाही,सृष्टि ही आपले अंग आहे.त्याचे पोषण झाले पाहिजे.या दृष्टिकोणातून ‘विकासाचे‘धोरण बनले पाहिजे,यासाठी देशात शांतीची गरज असल्याचे भागवतांनी सांगितले.
ठिकठिकाणी आणि समाजामध्ये कलह हे योग्य नसल्याची टोचणी आपल्या भाषणातून त्यांनी दिली.एक वर्षापासून ‘मणिपूर’शांतीची वाट पाहतोय.दहा वर्षांपर्यंत मणिपूर शांत होता.जुनी बंदूक संस्कृती समाप्त झाली,असे वाटू लागले असतानाच पुन्हा मागील वर्षापासून मणिपूर पेटले किवा पेटविण्यात आले,त्या आगीत आतापर्यंत मणिपूर जळतोय,त्याकडे कोण लक्ष देणार?असा सरळ सवाल भागवतांनी केला.सर्वात आधी त्याचा विचार करने हे कर्तव्य आहे.भागवतांचे हे बोल मोदींच्या कोणत्या कृतीकडे अंगुलीनिर्देश करतात?मणिपूर जळत असताना,निरपराध महिलांची नग्न धिंड निघत असताना,त्यांच्यावर बलात्कार होत असतानाही ‘सर्व शक्तीमान मोदी’ यांनी मणिपूरचा साधा दौरा ही केला नाही! मोदींचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचे संपूर्ण जगाने अनुभवले.भारत सारख्या देशात तर पंतप्रधानांच्या या कृतीला माफीच नव्हती.जनमानस पेटलेलं होतं.उलट लैंगिक शोषणाचे आरोप असणा-या मंत्र्यांवर आणि पदाधिका-यांवर कारवाई करण्या ऐवजी मूक समर्थन करण्याचे काम मोदींनी केले.कुश्‍ती महासंघाचे अध्यक्ष बृजशरण सिंह हे मोदींच्या या कृतीचे उत्तम उदाहरण आहे.
त्यामुळेच लोकतंत्रात समाजच ‘राजा’ बनवतो आणि स्वत:ची स्थिती घडवतो,असे सारगर्भित बोल भागवतांनी सुनावले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,समाजामध्ये कोणतेही मोठे परिवर्तन होण्यापूर्वी अध्यात्मिक जागरुकता घडते,आपल्या भारतात हे सिद्ध झाले आहे.आपल्या समाजात विविधता असून ही एकता आहे.ती विविधता स्वीकार करणे गरजेचे आहे.सगळेच बरोबर आहेत.त्यांचेही मत सत्य आणि हे स्वीकारता आले पाहिजे.सगळ्या पूजा सत्य आहेत.धर्माशी जुळलेल्या त्यांच्या पूजा देखील सत्य आहे.,असे सांगून मुस्लिम,ईसाई धर्माच्या तत्वज्ञानावर देखील भागवतांनी भाष्य केले.अस्पृश्‍यतेवर भागवतांनी कठोर टिका केली.काही स्वार्थी लोकांनी त्या काळात ही अस्पृश्‍यता पेरली.देशाचे विभाजन देखील धर्माच्या आधारावर झाले.ही पिडा खूप खाेलवरची आहे.मार्ग एकच, ते सर्व जुने तत्वज्ञान भूतकाळात जमा करा,भीती आहे तर शक्तीसंपन्न व्हा,शक्तीसंपन्नेसोबतच शीलसंपन्न होण्याचे आवाहन त्यांनी केले.शील, धर्म आणि संस्कृतीतून येत असतं.यापासून अहिंसा व सर्वांप्रति सद्भभावना राखण्याचा संदेश मिळतो.
यासाठी स्वत:पासून स्वत:च्या घरापासून बदल घडवा,सरसंघचालकांचे हेच बोल कदाचित मोदींना ‘टोचले’ असावे यासाठीच त्यांनी आज एक्सवर पोस्ट करीत ‘ मै मोदी का परिवार’ची टॅगिंग काढण्याची सूचना नेते आणि समर्थकांना केली.मोदींना साधं बहूमत ही मिळू नये.ही टोचणी मोदींना पचवणे तसेही अवघडच आहे.
सामाजिक समरसतेचा व्यवहार,सगळ्यांना मित्र समजा,मंदिर,पाणी श्‍मशान एक असावे.पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न करा.पाणी बचाव,प्लास्टिक हटाव,उपभोग के लिये जीवन नही,समृद्धी चाहिये अय्याशी नही चाहीये,संयमित उपभोग,सादगी से रहना,समाजानुरुप राहा मात्र अनावश्‍यक खर्च नको,स्व-आधारित स्वदेशी जीवन स्वीकारा.देशाचे संविधान,कायदा,अनुशासनाचे पालन करा.हेच शिकण्यासाठी स्वयंसेवक संघ शाखेत येतो व संपूर्ण समाज संघात यावे यासाठी प्रयत्न करतो.एक लाख २२ हजारच्या वर संघाचे सेवाकार्य सुरु आहेत.जगण्याचे कोणतेही क्षेत्र असे नाही ज्यात संघ नाही,असे भागवत म्हणाले.
थोडक्यात,त्यांच्या पाऊण तासांच्या भाषणात सर्वाधिक वेळ ते देशाच्या लोकसभेच्या निकालावर अप्रत्यक्षरित्या बालेले.
मोदी हे एकेकाळी संघाचे स्वयंसेवक होते मात्र देशाच्या पंतप्रधान पदी बसल्यावर संघाची संपूर्ण शिकवण विसरलेत,हे वास्तव आहे.ज्या संघाच्या मुशीतून ते घडले त्याच संघापासून त्यांनी हेतुपुरस्सर अंतर राखले.त्यांच्या बोलघेवड्या एका नेत्याने तर ‘मोदींना जिंकण्यासाठी संघाची गरज नाही’असे उघडपणे सांगितले,ज्याचे परिणाम ही यंदाच्या निकालात उमटले.संघाला मोदींशिवाय पर्याय नाही,संघ मोदींच्या मागे फरफटत जाईल,हा अहंकार मोदींना नडला.ज्या साधी राहणीविषयी सरसंघचालक बोलले त्याचा तर लवलेष ही मोदींच्या वस्त्रातून झळकत नाही.चांगलं राहणं आणि लग्झूरीयस राहणं यात महत् अंतर आहे.ज्या देशातील ऐंशी कोटी जनता मोदींच्या योजनेवर अन्नासाठी निर्भर आहे त्या देशातील पंतप्रधानांना इतकं जास्त लग्झूरियस राहणे शोभत नाही.
परिणामी,सरसंघचालकांची ही कानटोचणी ही काही वर्षां आधी झाली असती तर कदाचित अधिक परिणामकारक ठरली असती आणि लोकसभेच्या निकालात देखील त्याचा प्रभाव उमटला असता,असे अनेकांचे म्हणने आहे.
………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या