फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमविविध क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा जाणून घेणे हीच महिला दिनाची अमूल्य भेट:पोलिस आयुक्त

विविध क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा जाणून घेणे हीच महिला दिनाची अमूल्य भेट:पोलिस आयुक्त

जागतिक महिला दिनी डॉ.रविंद्र सिंघल यांचा महिलांसोबत मुक्त संवाद

नागपूर,ता.८ मार्च २०२४ : आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक देशांमध्ये महिलांना ‘समानता’ या मूल्यासाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागला आहे.लिंग भेदाची नीती समाप्त होण्यासाठी अनेक दशके नव्हे तर अनेक शतके जगभरातील महीलांनी समाज,धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्याविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला.त्यांच्या याच संघर्षाची दखल घेत जागतिक संस्थेने वर्षातून एक दिवस म्हणजे ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.या दिवसाचे महत्व ओळखूनच, आज नागपूरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांना पोलिस आयुक्त कार्यालयात मुक्त संवादासाठी आमंत्रित केले असून,विविध क्षेत्रातील या महिलांच्या पोलिस विभागाकडून अपेक्षा जाणून घेणे, हीच महिला दिनाची अमूल्य भेट असल्याचे नागपूर शहराचे पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी सांगितले.

पत्रकारिता,वृत्त वाहिन्या,डिजिटल मिडीया,आर.जे,व्यवसायिक,समाजकार्य इत्यादी क्षेत्रातील महिलांसोबत आज डॉ.सिंघल यांनी मुक्त संवाद साधला.आजच्या काळात महिला या अश्‍या प्रत्येक क्षेत्रामध्ये पोहोचल्या ज्या क्षेत्रात कधीकाळी फक्त पुरुषांचीच मक्तेदारी होती,सैन्या पासून हवाई उड्डाणापर्यंत,इस्त्रोपासून व्यवसायिक यशापर्यंत असे एक ही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी स्वत:ला सिद्ध केलं नाही.पोलिस विभागात देखील डीसीपीस्तरवर दोन महिला अधिकारी तसेच चार महिला एसीपी असल्याचे त्यांनी सांगितले.माझी पत्नी ही देखील एक आयएएस अधिकारी असल्याची माहिती त्यांनी दिली.ज्या घरातील स्त्री शिक्ष्त हाेते ते संपूर्ण कुटूंब साक्षर होत असतं,असं त्यांनी सांगितलं.

पोलिस विभाग हा कुठे कमी पडत असेल तर महिलांनी पुढे येऊन आम्हाला आज सांगावे,आम्ही त्यात सुधारणा करु.शिकण्याची प्रक्रिया बंद केल्यास प्रगती थांबत असते.तुम्ही सर्व महिला या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे,समाजात जे चाललंय,घडतंय ते आम्हालाही कळायला हवे.माझे हे १४-१५ वे बदलीचे ठिकाण आहे.माझा हा सिद्धांतच आहे की मी ज्या ज्या शहरात गेलो त्या त्या शहरातील चांगल्या आठवणी सोबत घेऊन जात असतो.नोकरीच्या ठिकाणी काही तरी वेगळं करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.असे आयुक्त म्हणाले.

आज मला खास करुन महिलांकडून माहिती करुन घ्यायची आहे,आपण मिळून काम करु.तुमची अपेक्षा पोलिस विभागाकडून काय आहे?हे समजून घेणे आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

एका महिला आमंत्रिताने

… पथक आहे मात्र त्या पथकाचा टोल क्रमांक शहरातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचला नसल्याचे सांगितले.यावर १०९१ हा चार डिजिटचा दामिनी पथकाचा टोल क्रमांक असून उत्तमरित्या या क्रमांकावर महिलांचा,मुलींचा प्रतिसाद (रिस्पाँस) मिळतो,असे उत्तर आयुक्तांनी दिले.प्रवासा दरम्यान रात्री-अपरात्री शहरात दाखल झाल्यास पोलिस हे एकट्या महिलांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी सुरक्ष्त पोहोचून देत असतात.पोलिसांनी उपलब्ध करुन दिलेल्या इतक्या महत्वाच्या सुविधेबाबत आणखी जास्त जनजागृतिची गरज उपस्थित महिलांनी विशद केली.महिला आर.जे यांनी पोलिसांच्या या स्तुत्य उपक्रमाची माहिती रेडीयोद्वारे देणार असल्याचे आयुक्तांना सांगितले.

आम्ही भरोसा सेलला आणखी जास्त प्रभावी करीत असून,समुपदेशकांना आणखी जास्त ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान दोन महिला पोलिस कर्मचारी असल्याचे त्यांनी सांगितले.

जरीपटका पोलिस ठाण्याअंतर्गत तीन वर्षांपूर्वी एका अवघ्या १३ संपून १४ व्या वर्षात पदापर्ण करणा-या मुलीवर चार मुलांनी बलात्कार केला.सर्वोच्च न्यायालयाचे सख्त निर्देश आहेत की अल्पवयीन मुलींवर बलात्कार सारख्या अपराधामध्ये संबंधित पोलिस ठाण्यातील अधिका-यानी महिला पोलिस कर्मचारीसोबत पिडीतेच्या घरी जाऊन बयाण नोंदवावे,तक्रारीसाठी तिला पोलिस ठाण्यात बोलावू नये.तिच्या समुपदेशनाची जवाबदारी देखील पोलिसांची असून तिला शासनापुरस्कृत आर्थिक मदत मिळवून देणे हे देखील पोलिसांचेच कार्य असल्याचे न्यायालयाचे निर्देश आहे मात्र,त्या घटनेत किंबहूना इतर अनेक घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन होत नसल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले.यावर अधिक पारदर्शकतेने काम करण्याची गरज पोलिस आयुक्तांनी प्रतिपादीत केली.कोणत्याही पोलिस ठाण्यात सुर्यास्त ते सूर्योदयापर्यंत महिलेला चौकशीसाठी किवा इतर कोणत्याही कारणासाठी बोलाविता येणार नसल्याचा कायदा असून या ही कायदाचे आमचा विभाग सर्वतोपरी पालन करणार असल्याचे आश्‍वासन याप्रसंगी आयुक्तांनी दिले.

वाहतूक पोलिसांकरवी ऐन सिग्नलवर महिलांसोबतचा व्यव्हार हा योग्य रहात नसून अपमानकारक असतो,महिलांसोबत फार उद्धटपणे बोलले जाते, अशी तक्रारवजा माहिती सांगितली असता,यावर योग्य ते पाऊल उचलले जाईल,असे त्यांनी सांगितले.

भरोसा सेलमध्ये सहसा समाजातील निम्न,अति निम्न,मध्यम वर्गीय येत असतात.मात्र,त्यांच्यासोबत बोलताना देखील समुपदेशकांचा तोरा पोलिसीच असतो,असे सांगितले असता,एक व्यक्ती चूकीचं वर्तन करतो मात्र त्यामुळे संपूर्ण पोलिस विभाग बदनाम होत असतो,असे आयुक्त म्हणाले.सध्या ते समुपदेशक हे खासगी संस्थेचे कर्मचारी असून पोलिस विभागाचे नसतात.याशिवाय ते पोलिस वर्दी मध्ये देखील राहत नाही.हा विभाग डीसीपीच्या अधिपत्याखाली काम करीत असतो.लवकरच यात बदल करण्याचा प्रयत्न केला जाईल.कोणत्याही शहराच्या ठिकाणी बदल करने हे फारे सोपे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस हा एकमेव विभाग असा आहे ज्यावर सगळेच आक्षेपच घेतात.आरोपी हा समाधानी राहू शकत नाही,पिडीत खूष होत नाही,सगळे शिव्या देतात,कोणीही आमच्याकडून समाधानी राहत नाही,असा वास्तववादी ‘सूर‘ पोलिस आयुक्तांनी देखील यावेळी लावला.

लहान मुलांच्या संदर्भात गुन्हेगारी वाढली असून दामिनी पथकासारखाच एखादा टोल फ्रि क्रमांक लहान मुलांना व त्यांच्या पालकांना देण्यात यावा,असा विचार व्यक्त केला असता,जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्यात येत असून ती पोलिसच लावतात व पोलिसच हाताळतात,अशी माहिती त्यांनी दिली.

पोलिसांची जनतेसोबत विश्‍वासाची नाळ जुळली पाहिजे,पोलिसांनी तरुणाईचे मित्र व्हावे कारण तरुणांमध्येच सळसळतं रक्त असतं.भावनेच्या भरात चुका होत असतात.कोणतीही विपत्ती आल्यास त्यांना पोलिसांजवळ मोकळेपणाने बोलता आले पाहिजे,यासाठी काय करणार?असे विचारले असता,यासाठीच मी लेखी आदेश प्रत्येक पोलिस ठाण्याला दिले आहेत की या पुढे पब्लिक मिटिंग ही पब्लिकमध्येच जाऊन पोलिसांनी घ्यावी,पोलिस ठाण्यात ठराविक लोकांमध्ये अशी मिटिंग घेऊ उपयोग नाही,असे आयुक्त म्हणाले.यामुळे जनता आणि पोलिस यांच्यामध्ये सहकार्य वाढेल.अधिकाधिक नागरिक हे पोलिसांसोबत जुळतील.

बुटीबोरी येथे हॉटेल व्यवसायिक असणा-या महिला आमंत्रिताने,बुटीबोरी पोलिस ठाण्यातील मी सर्वांना नावानिशी ओळखत असल्याचे सांगितले.मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यात महीला म्हणून मला सर्वात जास्त आधार हा पोलिसांचा वाटत असल्याचे तिने सांगितले.प्रगाढ ओळखीमुळे बुटीबोरी पोलिस ठाण्यातील पोलिसांचेही लक्ष माझ्या सुरक्ष्ततेकडे असतं,अशी सकारात्मक माहिती तिने सांगितली.

माजी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्देशाप्रमाणे कोणीही सामान्य नागरिक हा पोलिस ठाण्यात मोबाईल रेकॉर्डींग करु शकतो,असे आदेश दिले होते,तुम्ही देखील असा आदेश द्याल का?असे विचारले असता,पोलिस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार असतात,त्यांच्यासोबत पोलिसांना कठाेर व्हावं लागतं,कोणताही नागरिक पोलिस ठाण्यात मोबाईलने रेकॉर्डींग सुरु करेल तर पोलिसांना कायदा व सुरक्षा राखणे कठीण होऊन जाईल,असे डॉ.सिंघल म्हाणले.या अधिकाराचा गैरवापरच अधिक झाल्याने व पोलिसांना काम करनेच कठीण झाल्याने अमितेश कुमार यांनीच हा आदेश परत घेतला होता,हे विशेष!

या प्रसंगी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल यांनी उपस्थित महिलावृंदांसोबत छायाचित्र काढले व चहापान घेतला.उपस्थित महिलांना देखील त्यांचा ‘जागतिक महिला दिवस’ अश्‍याप्रकारे पोलिस विभागाच्या सर्वोच्च पदावरील एका मनमिळावू पाेलिस आधिक-यांच्या सहवासात काही क्षण घालविता अाल्याने, सार्थकी गेल्याचे वाटले.या पूर्वी पोलिस विभागात अश्‍या स्वरुपाचा उपक्रम कधीही राबविला गेला नसल्याने आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्या कल्पकतेला महिलावृंदांनी देखील दिलखुलास दाद दिली.

……………………………………………………….

 

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या