फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशिवरायांच्या गर्जनेने ‘शिवशाही’ मिरवणुकीचा जल्लोष

शिवरायांच्या गर्जनेने ‘शिवशाही’ मिरवणुकीचा जल्लोष

नागपूर,ता. १४ फेब्रुवारी २०२४: बहुजन विचार मंचचे मुख्य संयोजक नरेंद्र जिचकार आयोजित १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान ‘शिवशाही’ महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्याचे योजण्यात आले.  या आयोजना निमित्त ‘शिवशाही‘ मिरवणूक फरस ते शिवशाही गड पर्यंत मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. मिरवणुकीची सुरवात करण्यासाठी नरेंद्र जिचकारांनी शिव गर्जना देताच हजारो शिव भक्तांनी एका सुरात शिव गर्जनेने झिंगाबाई टाकळी परिसर दणाणून सोडला.लेझीमच्या रिदममध्ये पाय थिरकत असतानाच ,ढोल ताशांच्या गजरात शिवभक्तांनी ठेका धरला.

झांज आणि तुतारीच्या जुगलबंदीने माहौल बनवला असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील कलावंतानी घोड्यावर बसून प्रवेश करताच, शिवकालीन काळ उभा झाला.शेकडो शिव भजन स्त्री मंडळाने शिवरायांचा गजर केला. पालखी मध्ये बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेशी संवाद साधला असता स्थानिक जनतेने त्यांच्यावर पुष्प वर्षाव करीत शिव भक्ती प्रकट केली.रथात राजमाता जिजाऊ आणि छत्रपतींना बघून आपसूकच श्रद्धेने लोकांनी हात जोडले.

वाजत गाजत शिव मिरवणूक शिवशाही गड पुरषोत्तम बाजार जवळ पोहचली.नरेंद्र जिचकार यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करीत माल्यापर्ण केले.छत्रपतीॅना माल्यापर्ण करताच शिवशाही गडावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.या प्रसंगी माजी नगरसेवक किशोर जिचकार यांनी सुध्दा सपत्नीक महाराजांना अभिवादन केले.

दिपक पटेल माजी नगरसेवक, राजेश जरगर माजी नगरसेवक, कमलेश चौधरी माजी नगरसेवक,यशवंत कुभंलकर माजी सत्तापक्ष नेता, महानगर पालिका,.विजय भांबरे माजी अध्यक्ष स्थायी समिती, महानगर पालिका नागपूर ,सुभाष भोयर माजी नगरसेवक,घनश्याम मांगे सामाजिक कार्यकर्ते ,चंदू लाडे मनसे शहर अध्यक्ष,महादेवराव वानखेडे (सरपंच धुरखेडा ) पिंटू कोट्टलवार,राजेद्र चौधरी,रवी जांगडे,किशोर मदने, ‌डाॅ.मधुसूदन मैंद,योगेश निंबाळकर,राजेद्र बढीये,मा.श्री.बाबा वकील,संजय कडू,जाॅन ऑगस्टीन,हेमंत कातुरे,संतोष गोड्डमवार,अनिल आवळे,विनय मुद्दलियवार,सुब्बू बनॅजी,आसिफ अन्सारी,अरप्रीत बागडे अनिल मचले माजी नगरसेवक,गंगाधर गोडमाटे,सुखदेव मनोहरे,वासुदेव ईटनकर,बाबाराव पाटील,श्रावण ईटनकर,डाॅ.आशिफ बराडे,विनायक पाटील,ईद्रसेन ठाकूर,प्रमोद नायडू,ऋषी कोचर,सुरेश बाबूळकर,भुपेद्रसिंग चंदेल ( गिज्जू ठाकूर) सय्यद मुमताजस्वप्निल पातोडेजितू तिरपुडे,माजी नगरसेवक,विलास भालेकर, अध्यक्ष ऑटो युनियन विदर्भ, संजय भिलकर,नागेश राऊत,पंकज शुक्ला,कृष्णा गावंडे ,दिपेन दारत,अभय काळे,राजेश जयस्वाल,राजेश चिवंडे,दुर्गादास जिचकार,साक्षीताई राऊत,शिलाताई मोहोड,आशाताई राऊत,रजनीताई राऊत,आशाताई शेंद्रे,.ममताताई डुकरे,किरण मोहिते,सुरेखाताई जिचकार,वैष्णवीताई भारद्वाज,खुशबूताई मिश्रा,.हेलन अब्रु,.नफिसाताई अहमद,अनिरुद्ध पांडे,अध्यक्ष,एन.एस.यू.आय.नागपूर,शामसिंग ठाकूर,सुरेंद्र शुक्ला माजी नगरसेवक, रमेश सातपुते यांच्या सह हजारो शिव भक्तांनी मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग नाेंदवला.

……………………………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या