फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरकरांकडून झालेला सत्कार म्हणजे कुटूंबाने केलेला सत्कार: विजय गोखले

नागपूरकरांकडून झालेला सत्कार म्हणजे कुटूंबाने केलेला सत्कार: विजय गोखले

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांचा नाट्य परिषद,नागपूर शाखेतर्फे सत्कार

नागपूर,ता.८ फेब्रुवरी २०२४: विदर्भाचं आणि माझं फार पूर्वीपासून अतिशय घट्ट नातं आहे. हा सत्कार म्हणजे माझ्या कुटुंबाने केलेला सत्कार आहे. जो माझ्यासाठी अतिशय विशेष आहे. आणि आनंदाचा आहे. अशा सन्मानाने काम करण्यासाठी नवी ऊर्जा प्राप्त होते. त्यासाठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे मी मनापासून कौतुक करतो,असे मनोगत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेतर्फे विजय गोखले यांचा सत्कार वनराई. भरत नगर चौक, नागपूर, येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि ती जबाबदारी अतिशय सक्षमपणे ते पूर्ण करत आहे, त्याचा नागपूरकरांना सार्थ अभिमान आहे. नवीन लेखक मंडळी गोखले सरांच्या कार्याने खूप समाधानी आहे. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर गोखले हे पहिल्यांदाच नागपूरलां आले होते.

याप्रसंगी गिरीश गांधी म्हणाले, सुप्रसिद्ध अभिनेता असलेले गोखले हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नियामक मंडळ सदस्य आहेत. शिस्तप्रिय आणि वेळेचं काटेकोरपणे पालन करणारे विजय गोखले सारखे कार्यकुशल व्यक्तिमत्त्व रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाला अध्यक्ष म्हणून लाभले, हा मी नाटककारांचा आणि रंगकर्मींचा बहुमान समजतो. गोखले यांच्या सक्षम नेतृत्वात रंगभूमी प्रयोग परिक्षण मंडळ अतिशय उत्तोमत्तम कार्य करेल याचा मला विश्वास आहे. त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मनःपूर्वक अभिनंदन आणि या सोहळ्याला ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो,असे गिरीश गांधी म्हणाले.

या सोहळ्याला नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, कार्यकारीणी सदस्य मुंबई संजय रहाटे नाट्य परिषद नागपूर शाखेचे उपाध्यक्ष ( प्रशासन ) विष्णू मनोहर, उपाध्यक्ष ( उपक्रम ) दीपक मते, कोषाध्यक्ष अविनाश सोनुले सहकार्यवाह वैदेही चवरे – सोईतकर, प्रमोद भुसारी, बाळ कुलकर्णी, प्रशांत मंगदे, सलीम शेख ,डॉ. रविंद्र भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या