फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमवय वर्ष चोवीस दुचाकी चोरल्या १११!

वय वर्ष चोवीस दुचाकी चोरल्या १११!


पोलिसांनी आवळल्या आरोपी ललीत गजेंद्र भोंगेच्या मुसक्या

एकट्या वाडी परिसरातून चोरल्या १७९ दुचाक्या

ग्रामीण भागातील आठ जिल्ह्यातून पोलसांनी केली वाहने जप्त

विदर्भातच आरोपी विरोधात ८५ गुन्हे दाखल

पत्रकारांनाही कायद्याविरोधी कृत्यातून सूट नाही:पोलिस आयुक्तांचा खुलासा

नागपूर,ता.७ फेब्रुवरी २०२४: प्रेम विवाह करुन संसाराचा प्रपंच चालविण्यासाठी ऑटो डिलर असणा-या एका २४ वर्षीय चोराने एक-दोन नव्हे तर चक्क १११ दुचाकी चोरण्याचा विक्रम केला मात्र,‘कानून के हात लंबे होते है’याची पुन्हा एकदा प्रचिती देत, नागपूर पोलिसांनी या महाबहाद्दर शतकवीर दुचाकी चोराला शिफातीने अटक करुन, त्याने आठ जिल्ह्यात विक्री केलेल्या १११ दुचाकी हस्तगत केल्या.अाज गिट्टी खदान येथील पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल यांनी या गुन्ह्याची सविस्तर माहीती दिली.

गुन्हेशाखा,वाहन चाेरी विरोधी पथक यांनी ही स्तुत्य कामगिरी बजावली. वाहन चोरीचे एकूण ८५ गुन्हे उघडकीस आणून तब्बल १११ वाहने त्यांनी जप्त केली.दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी ६.३० ते ११.३० वाजता दरम्यान पोलिस ठाणे वाडी हद्दीत,रघुपती नगर सतगुरुशरण सोसायटी,प्लॉट क्र.२४ नागपूर येथील रहीवाशी अनिल बाबाराव पखाले(वय वर्ष ४८)यांनी त्यांची पॅशन प्रो दुचाकी(दुचाकी क्रमांक एम.एच.४०,ए.एफ ६२६५) ही ५० हजार किमतीची गाडी पोलीस ठाणे वाडी हद्दीतून राहुल हॉटेल समोर पार्क करुन ठेवली असता,अज्ञात वाहन चोरट्याने चोरुन नेली असल्याची फिर्याद नोंदवली.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा वाहन चोरी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करुन तसेच नागपूर शहरातील खाजगी व सरकारी कॅमरेची पाहणी केली तसेच वाहन चोरीचे ‘हॉटस्पॉट’ काढून सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा मागोवा घेतला.याशिवाय मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहितीवरुन कोंढाली येथे वर्णनावरुन शोध घेऊन सापळा रचून आरोपी ललीत गजेंद्र भोंगे(वय वर्ष २४)राहणार विकास नगर,कोंढाली जि.नागपूर याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीला ताब्यात घेऊन त्याची सखोल विचारपूस केली असता,त्याने वर नमुद केलेल्या गुन्हाची कबुली दिली.आरोपीच्या ताब्यातून त्याच्या घराच्या परिसरातून वेगवेगळ्या गुन्ह्यातून चोरी केलेली २० दुचाक्या जप्त करण्यात आली.गुन्हे शाखा पोलिसांनी सखोल तपास करुन आरोपीने विविध जिल्ह्यांमध्ये विक्री केलेल्या १११ चोरीच्या वाहनांना जप्त केले.या संपूर्ण वाहनांची किंमत ७७ लाख ७० हजार रुपये एवढी आहे.

आरोपीकडून नागपूर शहरातीत वाडी येथून ११,धंतोली येथून ८,सीताबर्डी ३,एम.आय.डी.सी.,नंदनवन प्रत्येकी २,कोराडी,इमामवाडा प्रत्येकी १ असे एकूण २८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. नागपूर ग्रामीण येथील पोलिस ठाणे कळमेश्‍वर ६,उमरेड ५,सावनेर ३,बोरी ३,काटोल,पारशिवनी,खापरखेडा,भिवापूर येथील प्रत्येकी १ असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आणण्यात आले.याशिवाय अमरावती शहर येथील ५ गुन्हे,चंद्रपूर ४,यवतमाळ ८ गुन्हे,वर्धा ९ गुन्हे,भंडारा ३ गुन्हे तर अकोला,गडचिरोली येथील प्रत्येकी १ असे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले.

अवघ्या २४ वर्षीय तरुणाची या गुन्ह्या मागील मोडस ओपरेंडी काय असावी?असा प्रश्‍न केला असता आरोपी वॉच ठेऊन चोरी करीत असे,असे उत्तर पोलिस उपनिरीक्षक अनिल हिंगोले यांनी दिले.दुचाकी चोरी करण्यासाठी पार्किंग स्लॉट,बँकच्या बाहेरील पार्किंग,चौकीदार नसलले वाहनतळ,सीसीटीव्ही नसलेले वाहनतळ अश्‍या विविध ठिकाणाहून आरोपीने दुचाकी चोरल्या असल्याची माहिती हिंगोले यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.यासाठी डूप्लीकेट किल्लीचा वापर तर कधी कधी हँडल लॉक तोडून त्याने दुचाक्या चोरी केल्या असल्याचे ते म्हणाले.वाडी येथील आठवडी बाजार हा आरोपीसाठी दुचाकी चोरण्यासाठी हॉटस्पॉट होता,अशी माहिती हिंगोले यांनी दिली.
विशेषत:ग्रामीण भागात तो या चोरीच्या दुचाक्या विक्री करीत असे.खरेदीदार कागदपत्रांची मागणी करीत असे तेव्हा एका महिन्यात कागदपत्रे देतो असे सांगून पैशांचा व्यवहार झाल्यानंतर आरोपी कोणतीही कागदपत्रे खरेदीदारास देत नसे.तो मूळ वरुडचा असल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागात त्याची चांगली ओळख होती.ऑटो डिलर असल्याने गाडी विक्रीच्या माध्यमातून दोन-चार हजार रुपये एकसाथ नफा मिळत असल्याने आरोपीने गाडी विक्रीतूनच झटपट पैसा कमविण्याचा मार्ग पत्करला,अशी माहिती हिंगोले यांनी दिली.

वरील कामगिरी पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त(गुन्हे)पोलिस उपायुक्त(गुन्हे)यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल इंगोले,दिपक रीठे,विलास कोकाटे,अजय शुक्ला,पंकज हेडाऊ,कपिल तांडेकर,राहूल कुसरामे,अभय ढोणे तसेच बलराम झाडोकर व सायबर सेलचे अंमलदार यांनी केली.

देवांची नावे लिहलेल्या सर्वाधिक दुचाकी-

भारतीय समाजातील कोणत्याही धर्माचा माणूस असो त्याची प्रगाढ श्रद्धा ही आपापल्या देवावर असते.त्यामुळेच घर असो किवा वाहने त्यावर प्रामुख्याने देवी-देवतांची नावे कोरल्या जात असतात.गुन्हे शाखा,वाहन चोरी विरोधी पथकाने जप्त केलेल्या दुचाकींवर देखील विविध देवी देवतांची नावे कोरल्या गेलेली आढळली. होती.यात ‘श्री राम’,‘जय बजरंगबली’,‘जय माता दी’ ‘ओम साई’,‘विठल्लाची प्रतिकृती,हिंदू,‘जय हनुमान’ ‘साई राम’इत्यादी विविध आराध्य दैवतांची नावे बघता,भारतीयांमध्ये रुजलेल्या पारंपारिक श्रद्धेनुसार देवतांची नावे असलेली वाहने एक दिवस नक्की परत मिळेल, पिडीतांचा विश्‍वासच जणू सार्थकी लागला,असेच आता म्हणावे लागेल.

पत्रकारांनाही कायदा विरोधी कृत्यातून सूट नाही-पोलिस आयुक्तांचा इशारा

पत्रकारितेचं जग हे अलीकडे काळाच्या महिम्यानुसार फार बदलले असून, पत्रकारितेच्या आड अनेक तथाकथित पत्रकारांनी खंडणी,पैसा उकळणे,सेटलमेंट इत्यादीसारख्या कृत्यातून पत्रकारितेला बदनाम केले आहे.अनेक पत्रकारांवर खंडणी उकळणे यासारखे गुन्हे देखील नोंदविले गेले असूनख नुकतेच एका क्राईम रिपोर्टरला तर हनी ट्रॅपमध्ये गडचिरोली पोलिसांनी नागपूरातून अटक करुन ९ दिवसांचा पोलिस रिमांड मिळवला.मात्र,अनेक पत्रकारांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांनी थंड बसत्यात त्यांची कृत्ये ठेवली असून, कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेतला नसल्याचे आढळते.यावर आज नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंघल यांना प्रश्‍न विचारला असता,जे कायदा विरोधी कृत्य करतात त्यांच्यावर कारवाई ही केली पाहिजे मग ते कोणीही असो,असे उत्तर सिंघल यांनी दिले.कायदा हा सर्वांसाठी समान आहे.गाडी चालवित असताना पत्रकारांनीही कागदपत्रे ठेवणे,नियमांचे पालन करने अपेक्षीतच असते.पत्रकार आहेत म्हणून त्यांना कोणतीही सूट मिळू शकत नाही,असे ते म्हणाले.

सदर पोलिस ठाण्यात डिसेंबर महिन्यापासून दोन पत्रकारांवर गुन्हे दाखल आहे मात्र त्यावर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोणतीही कारवाई करीत नाही.मुंबईतील एका आमदाराचा दबाव असल्याची चर्चा आहे,असे सांगितले असता,कुठले गुन्हे आहेत त्याची माहिती मी घेतो,असे पोलिस आयुक्त यांनी सांगितले.

काल मंगळवार दिनांक ६ फेब्रुवरी रोजी शंकर नगर चौकात साढे चार वाजता कर्तव्यावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या एका चारचाकीला सिग्नलवर अडवले.काच खाली करुन चार चाकी मालकाने तो अमूक एका मॅग्नीजचा संपादक असल्याचे सांगताच,वाहतूक पोलिसांनी कर्तव्यात कसूर करुन कोणतेही चालान न करता चारचाकीला जाऊ दिले,पोलिस आयुक्त म्हणून स्वत:च्या विभागाला काय सूचना करणार?असा प्रश्‍न केला असता,यावर उत्तर देण्या पूर्वीच एका हिंदी वृत्त वाहीनीच्या पत्रकाराने आयुक्तांचे लक्ष गणेश बसस्थानक आगारातील बॉम्ब सदृष्य वस्तूच्या संदर्भात प्रश्‍न विचारला,त्यामुळे या प्रश्‍नावर कोणतेही उत्तर मिळू शकले नाही.

पत्रकाराची अशीही शिरजोरी-
आज गणेशपेठ बसस्थानक आगार डेपोमध्ये गडचिरोली आगार येथील एका बसमधील बसचालकाच्या डाव्या बाजूच्या सीट खाली दुपारी १ वाजून २० मिनिटा दरम्यान एक गावठी सदृष्य स्फोटक आढळले.याची माहिती आगारतील डेपो मॅनेजरने गणेशपेठ पोलिस ठाण्याला कळवली.एवढ्या संवेदनशील माहितीमुळे पोलिस आयुक्तांना निर्धारित ४ वाजताची पत्रकार परिषदेची वेळ पाळता आली नाही.ही पत्रकार परिषद पावणे पाच वाजता दरम्यान सुरु होऊ शकली मात्र,शहरातील एका ख्यातनाम हिंदी दैनिकाच्या क्राईम बिट सांभाळणा-या एका ज्येष्ठ पत्रकाराने पोलिस आयुक्तांचे पद,जवाबदा-या,तान-तनाव यांची कोणतीही जाणीव न ठेवता शाब्दिक मुजोरी कायम ठेवली.पत्रकारांचा वेळ किती अमूल्य असतो,असे वारंवार हे ज्येष्ठ पत्रकार गिट्टी खदान पोलिस ठाण्यातील इतर पोलिस कर्मचा-यांवर ठसवित होते.इतकंच नव्हे तर इतर सर्व पत्रकारांना तात्काळ या कर्मचा-यांकडूनच माहिती घेऊन निघून जाण्यास प्रेरित करीत होते,जणू पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्तांचे उशिरा येणे हा त्यांचा अपमान झाला होता.

एवढ्या ज्येष्ठ व अनुभवी पत्रकाराला एखाद्या आपीएस पोलिस अधिका-याच्या जबावदारीची जाणीव नसावी ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.पत्रकार असण्याचा पोकळ अहंकार कुरवाळण्यापेक्षा कोणत्याही ख-या पत्रकाराला आपल्या वाचकांपर्यंत बातमी पोहोचवण्याचे कार्य हे जास्त मोलाचे वाटले असते.त्यातल्या त्यात नवनियुक्त पोलिस आयुक्तांची ही नागपूरातील पत्रकारांसोबत ही पहीलीच तोंडओळख होती.त्यांनी आज पोलिस आयुक्तालय नागपूर शहर अंतर्गत अभिलेखावरील गुन्हेगारांची पडताळणी देखील पार पाडली होती.

पत्रकार परिषदेत उशिरा पोहोचण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांनी सर्वात आधी माफी देखील मागितली.त्यामुळे पत्रकारांनाच आता आत्मचिंतन करण्याची खरी गरज वाटत आहे.क्राईम बिट सांभाळणारी मोठमोठी धुरंधर पत्रकारांची गच्छंती अश्‍या या अतिरेकी अहंकार व चुकीच्या कृतीमुळेच वृत्तपत्रातून झाली असल्याची अनेक उदाहरणे डोळ्यासमोर असताना,या हिंदी दैनिकाच्या पत्रकाराच्या अश्‍या दांभिक कृतीमुळे व शाब्दिक अंहकारातून उपस्थित पत्रकारांवर ‘ओम जय जगदीश हरे’म्हणायची वेळ आली होती.

पोलिस आयुक्तांनी घेतली अभिलेखावरील गुन्हेगारची पडताळणी-

आज पोलिस आयुक्तांनी दूपारी २ ते ४ वाजता दरम्यान पोलिस आयुक्त कार्यालय पोलिस भवनाचे प्रांगणात नागपूर शहरातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत अभिलेखावरील सराईत गुन्हेगार,संघटित टोळीचे सदस्य,घरफोडी,चाेरी करणारे तसेच शरीरा विरुद्ध गुन्हे करणारे, वांरवार गुन्हे करणारे आरोपींना पडताळणी करीता पाचारण केले.सिंघल यांनी गुन्हेगारांची सविस्तर माहीती घेतली.गुन्हेगारांना त्यांची सध्याची परिस्थिती,कामधंदा याबाबत विचारपूस केली.पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना मार्गदर्शन केले तसेच कायदा हातात न घेण्याची समज व सूचना देऊन कोणतेही बेकायदेशीर कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली.मोठ्या संख्येने गुन्हेगार हजर होते.यामध्ये अश्‍विन लक्ष्मण रामासे राहणारा जरीपटका,रविंद्र मणिराव उइके रा.जरीपटका,राहूल अनिल खोब्रागडे,राहणारा जरीपटका,अंकिश संजय फूके रा.बर्डी,अब्दूल करीम शेख रा.मानकापूर,राकेश गणेश हेडाऊ रा.तहसील,सीताराम फूलचंद शाहू,रा.शांतीनगर,सनी धीरज समुद्रे रा.लकजगंज,सनी सुरेंद्र चव्हाण रा.इमामवाडा,मयुर सुरेश फूले रा.इमामवाडा,रोहीत नंदवार रा.पारडी,सौरभ गजानन कडू.रा.प्रतापनगर,ऋषि सुरेश कट्टूटेवार रा.सोमवारी क्वार्टर सक्करदरा,जागरीखान नजीरखान रा.सक्करदरा,अनिकेत दिलीपराव काळे रा.सक्करदरा,मुकेश रोहन काटोले,दानिश वसीम खान,हर्षल उर्फ पीडा सदानंद आनंद पवार,मुकेश उर्फ कैची महादेव हेडाऊ,सौरभ सुधीर वासनिक,पाचपावली व इतर आरोपी हजर होते.
………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या