फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजज्ञानवापीत’पूजा रामराज्याचा संयोग: संजय भेंडे

ज्ञानवापीत’पूजा रामराज्याचा संयोग: संजय भेंडे

’रामेश्‍वरम ते अयोध्या’रामभक्त यात्रेकरुंचे उद्या नागपूरात जंगी स्वागत

गडकरी,बावणकुळे यांची उपस्थिती

नागपूर,ता.२ फेब्रुवरी २०२४: एकतीस वर्षांनंतर ज्ञानवापीच्या परिसरातील पूजास्थळी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी न्यायालयाने दिली, जे पूजास्थळ उत्तरप्रदेशातील तत्कालीन मुलायमसिंगच्या राज्यसरकाने १९९३ पासून बंद केले होते,हिंदू जनजागरण समितीचे वरिष्ठ सदस्य या नात्याने या घटनेकडे कसे बघता?असा प्रश्‍न संजय भेंडे यांना प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत विचारले असता,न्यायालयाच्या आदेशातून तेथील बंद दरवाजे उघडल्या गेले,समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग हे मुख्यमंत्री होते त्या काळात,त्यांच्या आदेशानुसार हिंदू पूर्वापार पूजा करीत असलेल्या मंदिर परिसराला कूलूपं लावण्यात आले होते,आता न्यायालयाच्या आदेशाने ती उघडण्यात आली,आता हा रामराज्याचा संयोग म्हणायचा का?,असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या आवारातील तळघरात पूजा करण्यास हिंदूना परवानगी देणारा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला.जिल्हाधिका-यांनी सात दिवसांच्या आत सगळी व्यवस्था करावी,असा आदेश असताना सात तासांतच सर्व व्यवस्था पूर्ण केली गेली व बुधवारी रात्री उशिरा तेथे पूजा ही पार पडली.यावर दिवंगत मुलायमसिंग यांचे चिरंजीव व उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक्सवर ‘ व्यवस्था करण्यास सात दिवस असतानाही आदेश अंमलबजावणीबाबत झालेली घाई,हा विरुद्ध पक्षाला न्यायालयात आव्हान देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न वाटतो’अशी पोस्ट केली आहे.यावर प्रश्‍न केला असता वरील उत्तर संजय भेंडे यांनी दिले.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,२२ जानेवरी रोजी अयोध्येत भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशात हर्षोल्लास साजरा झाला.फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील हिदूंनी तो क्षण जल्लोषात साजरा केला.संपूर्ण देशात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.त्यातीलच एक उपक्रम म्हणजे प्रभू श्रीरामांची मर्यादित वनगमन यात्रा जी रामेश्‍वरम ते अयोध्या पर्यंत,रामोत्सव यात्रा संघटना दिल्लीतर्फे आयोजित करण्यात आली आहे.ही रामोत्सव यात्रा नाशिक ते संभाजी नगर येथून उद्या शनिवार, दिनांक ३ फेब्रुवरी रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूरात प्रवेश करणार असून अजनी येथील हनुमान मंदिरात पोहोचेल.हनुमान मंदिरात या रामभक्त यात्रेकरुंचे भव्य स्वागत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत हिंदू जनजागरण समिती तसेच विविध हिंदू संघटनांतर्फे करण्यात येणार आहे.स्वागता नंतर ही यात्रा कोराडी येथील महादूला येथे प्रस्थान करेल व रविवार रोजी रामटेक गडमंदिराच्या दर्शनानंतर जबलपूर मार्गे गंतव्याकडे प्रस्थान करेल.

या यात्रेत ३० तरुणी व १५० तरुण यात्रेकरु असून यात अनेक खेळाडू,अभिनेते आहेत.प्रत्येकाचे सोशल मिडीयावर दोन लाखांच्या जवळपास फोलोअर्स आहेत.त्यांची यात्रा साढे चार हजार किलोमीटरची असून देशातील पाच राज्यातून जात आहे.यात तमिलनाडू,कर्नाटक,महाराष्ट्र,मध्यप्रदेशातून मार्गक्रमण करीत उत्तरप्रदेशातील अयोध्येला पोहोचणार आहे.या यात्रेदरम्यान रामेश्‍वरम,त्र्यंबकेश्‍वर,घृष्णेश्‍वर आणि काशी विश्‍वनाथ ज्योतिर्लिंगचे दर्शन यात्रेकरु घेणार आहेत.

या यात्रेचा उद्देश्‍य भारतात रामराज्याची स्थापना असून,भारतातील प्रत्येक रामभक्तामध्ये अयोध्येच्या भगवान श्रीराम मंदिरातर्फे दाखविलेल्या पदचिन्हाला देशातील प्रत्येक युवाशक्तीपर्यंत पाेहोचवणे ही असून, भगवान श्रीराम मंदिराची भव्यता व दिव्यतेच्या दर्शनाला साकार होताना बघणे ही आहे.

नागपूरात या यात्रेच्या भव्य स्वागतासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केले.पत्रकार परिषदेला भाजपचे माजी नगरसेवक संदीप गवई,श्रीकांत आगलावे,अमोल ठाकरे,अश्‍विनी जिचकार तसेच चंदन गोस्वामी तसेच हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

………………………………….

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या