फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजसुरेश वाडकरांच्या राममय सुरांनी रामटेक न्हाले भक्तीभावात

सुरेश वाडकरांच्या राममय सुरांनी रामटेक न्हाले भक्तीभावात

सुरेश वाडकर यांच्या गीतगायनाने रामटेक येथील राज्यस्तरीय महासंस्कृती महोत्सवाचा दूसरा दिवस गाजला

 नेहरू मैदानात रसिकांची उत्स्फूर्त दाद

नागपूर,दि. २० जानेवरी २०२४: : ‘सिया वर रामचंद्र की जय’ आणि अजरामर राम चौपाई ‘मंगल भवन अमंगल हारी’ गाऊन सुरेश वाडकर यांनी रामटेक ‘राममय’ स्वरांनी भरून टाकले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुरेश वाडकर यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला. गुरु वंदन करणाऱ्या ‘गुरु ब्रह्मा गुरु विष्णु’ ने कार्यक्रमाची सुरवात झाली. पत्नी गायिका पद्मा वाडकर आणि वाद्य वृंदची संगत यामुळे राम चौपाई अमृतवाणी ठरली.

कार्यक्रमाच्या सुरवतीला सुरेश वाडकर यांचा सत्कार आमदार आशीष जैसवाल यांनी केला तर सुरेश वाडकर यांच्या पत्नी गायिका पद्मा वाडकर यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी वंदना विराणी यांनी केला. आशीष जैसवाल यांनी सुरेश वाडकर यांचा गौरव करताना त्यांच्या संगीत प्रवासाचे कौतुक केले. त्यांच्या काही लोकप्रिय गीतांचा उल्लेख जैसवाल यांनी केला.

सुरेश वाडकर यांनी संगीतकार रवींद्र जैन यांची आठवण काढून ‘सुनो तो गंगा, राम तेरी गंगा मैली’ हे गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ’लगी आज सावन की झडी’ आणि और इस दिल मे क्या रखा है ही एका पेक्षा एक बहारदार गाणी वाडकर यांनी गायली.

‘सियावर रामचंद्र की जय’चा निनाद : ‘

हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की’ या प्रसिद्ध गीतात असेलेले रामायणातील प्रसंग स्थानिक रामधाम नटराज कलावंत गृप रामटेकच्या कलाकारांनी स्टेज वर जीवंत केले. या गीत-नृत्य नाटीकेच्या माध्यमाने सर्व परिसर राम-मे झाल्याचे चित्र होते. ६० लहान मोठ्या कलाकारांचा सहभाग असलेल्या नाटीकेने उपस्थितांचे मन जिंकून टाळ्या मिळविल्या.

या गीत नाटीकेत ‘ठुमक चलत राम चंद्र, सीता स्वयंवर, राम आयए अवध की ओर अशी प्रसिद्ध गाणी यात अंतर्भूत करण्यात आली. या दरम्यान सर्व परिसर ‘सियावर रामचंद्र की जय’, राम सिया राम जय जय राम’ च्या जयघोषाने परिसर निनादुन गेला. या कलाकारांचा आ. आशीष जैसावाल यांनी सत्कार केला. डायरेक्टर माेहन तुळशीराम काेठेकर यांचा नेवृत्वात या नाटीकेत राेहित दुधबर्वे यांनी रामाची भुमिका तर दामिनि जाेशी यांनी सितेची भुमिका साकारली. मंदा कुल्लरकर, अतुल पाेटभरे, शिवम दुधबर्वे, अतुल पाेटभरे इत्यादी कलावंत यात सहभागी झाले.

शुभम चोपकर चे बासरी वादन –

स्थानिक रामटेक चे बासरी वादक शुभम चोपकर यांच्या बासरी वादानाच्या कार्यक्रमाला श्रोत्यांची उत्तम दाद मिळाली. रामवारील नृत्य नाटिकाबघून कृष्णाची बासरी ऐकायला मिळाली अशी प्रतिक्रिया बघायला मिळाली. श्वेता शेलगावकर यांनी कार्यकामचे सूत्र संचालन केले.

निःशुल्क प्रवेश :

१९ ते २३  जानेवारी दरम्यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होत असलेल्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या सहभाग या महोत्सवात आहे. पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आजचा कार्यक्रम : २१  जानेवारी – विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम

………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या