फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशभाषण ठिक आहे पोटातील राशनचं काय?

भाषण ठिक आहे पोटातील राशनचं काय?


है तयार हम’मगर कशासाठी!लुढकण्यासाठी?

काँग्रेसच्या सभेत हजारो कार्यकर्त्यांची भाषण न ऐकताच खाण्याच्या शोधात भटकंती

नागपूर,ता.२८ डिसेंबर २०२३: काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरात दिघोरी येथील मैदानात ‘है तयार हम’’भारत जोडाे’ही अतिविराट सभा पार पडली मात्र,या सभेचे अतिशय ढिसाळ नियोजन काँग्रेसच्या काही आमदारांकडून झाल्याने राज्यभरातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांना सभास्थळी उपाशी पोटी भटकंती करावी लागल्याचे वास्तव समोर आले.

सकाळी ९ वाजतापासून राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना दूपारचे चार वाजले तरी पोटाची आग शमविण्यासाठी कोणतीही व्यवस्था सभा स्थळी करण्यात आली नव्हती.यामुळे सभा स्थळी जाण्याच्याच मार्गावर ‘परतीचे’ शेकडो कार्यकर्ते दिसून पडले.सभा न संपताच,काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहूल गांधी यांचे भाषण न ऐकताच,विरुद्ध दिशेने त्याच रस्त्यावरुन हजारो कार्यकर्त्यांनी परतीचा मार्ग धरला होता.

विशेष म्हणजे सभा स्थळापासून तब्बल चार चौक आधीच पोलिसांनी वाहतूक पूर्णपणे बंद केली होती तसेच या संपूर्ण मार्गावर एकही वाहनाला किवा फूटकळ खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी नव्हती.परिणामी,सभा स्थळापासून हजारो कार्यकर्त्यांनी परतीचा मार्ग अवलंबला असला तरी दूर दूरपर्यंत पोटात ढकलण्यासाठी त्यांना कोणतेही साधन दिसून पडत नव्हते. परिणामी,पोटाची आग दूपारच्या चार वाजेपर्यंत चांगलीच भडकल्याने त्यांचा पारा ही चांगलाच चढला होता.

‘सत्ताधीश’ने त्यांना बोलते केले असता,भाषण तर ठिक आहे पण पोटातल्या राशनचं काय?असा मार्मिक व तितकाच वास्तवादी प्रश्‍न त्यांनी केला.अनेक महिला कार्यकर्त्यांनी देखील हीच वेदना बोलून दाखवली. चंद्रपूरातील एका जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार व विद्यमान विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण एक ट्रॅवल्हस भरुन आलेल्या या कार्यकर्त्यांनी ऑन कॅमरा चांगलेच तोंडसुख घेतले.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातून आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सभास्थळी पोहचविण्यात आलेल्या काँग्रेसी भूकेल्या कार्यकर्त्यांची देखील हीच अवस्था होती.

भारतीय जनता पक्षांची अश्‍या सभांची तुलना केली तर,भाजपमध्ये अतिशय नियोजनबद्ध अशा सभा पार पाडल्या जातात,हे मान्य करावंच लागेल.लहानतल्या लहान कार्यकर्त्याची देखील योग्य ती बडदास्त भाजपमध्ये दिसून पडते,हे वास्तव नाकारता येणार नाही.हजारो किलोमीटरवरुन सकाळीच सभास्थळी आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना मात्र काँग्रेसच्या काही आमदारांनी चक्क वारे खाण्यासाठी सोडून दिले असल्याचे दृष्य सभास्थळी उमटले होते.

उपाशी पोटी अध्यात्म ज्ञान ही जिथे मनात उतरत नाही तिथे राजकीय भाषण कसे पचणार?भूकेची वेदना ही जगातील कोणत्याही राजकीय भाषणापेक्षा श्रेष्ठच असते,याची पुन्हा एकदा प्रचिती अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या या ’है तयार हम’या अतिविराट सभेत उमटली.

एक महाभाग तर टून्न होऊन सभास्थळीच लुढकलेले होते.त्यांना,तुम्ही कशासाठी ‘तयार’ आहात?असा प्रश्‍न विचारणे देखील दूरापस्त होते,अशा विकट अवस्थेत ते होते.

सभास्थळी काँग्रेसचे कार्यकर्ते जमविणे म्हणजे फक्त ‘मुंडके’जमविणे नव्हे,त्या प्रत्येक मुंडक्याखाली विचारधारेवरील तत्वनिष्ठा देखील तितकीच गरजेची असताना,सभास्थळी मात्र वेगळेच दृष्य उमटले होते.

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या