फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजअक्षरा सिंहने दिला रविवारी भोजपुरी तडका

अक्षरा सिंहने दिला रविवारी भोजपुरी तडका

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा तिस-या दिवशी नागपूरकर थिरकले

नागपूर, २६ नोव्‍हेंबर : रुपेरी पडद्यावर आपल्‍या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणा-या आणि सुरेल आवाजाने मंत्रमुग्‍ध करणा-या अक्षरा सिंहने रविवारी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला भोजपुरी तडका दिला. अक्षराच्‍या गाण्‍यावर नागपूरकर चांगलेच थिरकले. पटांगणावर एकच माहोल झाला.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्‍या खासदार सांस्‍क‍ृतिक महोत्‍सवाचा आज तिसरा दिवस होता. भोजपुरी चित्रपटसृष्‍टीतील आकर्षक व्‍यक्तिमत्‍व असलेली अष्‍टपैलू अभिनेत्री व गायिका अक्षरा सिंग यांची रविवारी ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ पार पडली.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्‍त अम‍ितेश कुमार, निको ग्रुपचे संचालक रमेश जयस्‍वाल, मेट्रोचे सीएमडी श्रावण हर्डीकर, व्‍हीआयएचे अध्‍यक्ष प्रशांत मोहता, एनआयटीचे चेअरमन मनोज सुर्यवंशी, उद्योगपती अशोक गायल, भाजपाचे नागपूर जिल्‍हा अध्‍यक्ष माजी आ. सुधाकर कोहळे, रेल्‍वेचे डीआरएम पांडे, नंदकुमार सारडा यांची उपस्थिती होती. दीपप्रज्‍वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

‘मै हवा हुं तेरे दिल में उतर जाऊंगी’ असे म्‍हणत अक्षरा सिंगने मंचावर प्रवेश केला. प्रत्‍येकाच्‍या जीवनात मातेला अढळ स्‍थान राहिले आहे, असे म्‍हणत अक्षरा सिंग यांनी ‘सारी दुनिया का हात, मेरे सरसे हटे, मां तू अपना हटाना ना’ हे भोजपुरी गीत सर्व मातांना समर्पित केले. त्‍यानंतर अक्षराने ‘नागपूर गरदा उडावत चाली’ हे गाणे व नृत्‍यावर गरदा उडवला. नायिका म्‍हणून करीअरला सुरुवात केली पण गाणे म्‍हणत येत नव्‍हते. रसिकांच्‍या प्रेमापोटी गायला सुरुवात केली असे म्‍हणत अक्षराने ‘मेरे रश्‍के कमर तुने पहली नजर’ या गीतावर ठुमके लगावले. ‘हाल क्‍या है, दिलों का ना पुछो सनम’, ‘इश्‍क और प्‍यार का मजा लिजिए’ सारखी अनेक जोशपूर्ण गाणाी सादर करीत रसिकांना थिरकायला भाग पाडले. मुंबईचा युवा गायक कुणाल पंडितने अक्षराला उत्‍तम साथ दिली. सोबतच, मेरी रुह का परिंदा, धीम धीम ताना, हम्‍मा हम्‍मा आदी गीते सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे.
…….
संविधान प्रास्‍ताविकेचे वाचन-
भारतीय संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संविधानाच्‍या निर्मितीसाठीचा मसुद्याला २६ नोव्‍हेंबर रोजी अंतिम स्‍वरूप देण्‍यात आले होते. तो दिवस ‘राष्‍ट्रीय संविधान दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. त्‍यानिम‍ित्‍त संविधान प्रास्‍ताविकेचे वाचन अविनाश घुशे यांनी केले. नितीन गडकरी व इतर मान्‍यवरांसह पटांगणावर मोठ्या संख्‍येने उपस्थित नागपूरकरांनी त्‍यात सहभाग घेतला.

नृत्‍याविष्‍कारातून सादर झाली नदीची जन्‍मकथा-
उदयोन्‍मुख कलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या उद्देशाने रविवारपासून स्‍थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम सादर केले जाणार असून त्‍या श्रृंखलेतील पहिला कार्यक्रम रविवारी मुख्‍य कार्यक्रमापूर्वी पार पडला. स्‍वरसंगम प्रस्‍तुत किशोर नृत्‍य निकेतनतर्फे प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू किशोर व किशोरी हम्‍पीहोळी यांच्‍या चमूने ‘गंगा-यमुना’ ही नृत्‍यनाटिका सादर केली.

गंगा, यमुना आणि सरस्‍वती या तीन प्रमुख नद्यांच्‍या त्रिवेणी संगमावर आधारित या नृत्‍यनाटिकेतून नदीच्‍या जन्‍माची कहाणी, जलप्रदूषण व कोरोना काळात लागलेल्‍या लॉकडाऊनमध्‍ये नद्यांची झालेली स्‍वच्‍छता यावर भाष्‍य करणारी कहाणी भरतनाट्यम नृत्‍यनाटिकेच्‍या माध्‍यमातून प्रस्‍तुत करण्‍यात आली.

यात ऐश्‍वर्या मोघे, प्राची बारापात्रे, श्रेया जोशी, काजल खिची, कोमल म्हैसबडवे, आधा मोहुर्ले, इंद्रायणी इंदूरकर, कल्‍याणी चिकुलवार, सपना पटेल, भूम‍िका मेंडुले, रुपल मंदावार, रिद्धी इंगे, गौरी भागवत, प्रणाली रसाळ, पृथा राऊत, जान्‍हवी बेतावार, गुढी मोहुर्ले, कामाक्षी हम्पीहोळी व किशोरी हम्‍पीहोळी या कलाकारांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी लालजी श्रीवास, मुकुंद श्रीवास, नकुल श्रीवास, विशाल यादव व अंकिता देशकर-विश्‍वरुपे यांचे सहकार्य लाभले. कांचनताई गडकरी व अपर्णा अम‍ितेश कुमार यांच्‍या हस्‍ते कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला.
…….
आज सोमवारी महोत्‍सवात …
सकाळी ६.३० वाजता : श्री रुद्र पठण
सायं. ६ वाजता : २७ नोव्‍हेंबर : विशाल शेळके यांचा बॉलिवूड गीतांचा कार्यक्रम
सायं. ६.३० वाजता : संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य ‘क्रांतीनायक’
………………………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या