फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशमणिपूरवरील राहूल गांधींच्या 'दीड' मिनिटांच्या विधानाला मोदींचं 'दोन' मिनिटांचं प्रत्युत्तर!

मणिपूरवरील राहूल गांधींच्या ‘दीड’ मिनिटांच्या विधानाला मोदींचं ‘दोन’ मिनिटांचं प्रत्युत्तर!

भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णीची पत्रकार परिषदेत मोदींची पाठराखण

मणिपूरवर काँग्रेसकडे ‘तथ्य’नसल्यानेच मोदींच्या उत्तरावर काँग्रेसचा बहीष्कार:.कुलकर्णी यांचा आरोप

देशभर भाजप फाळणीचा १४ ऑगस्ट काळा दिवस म्हणून पाळणार

नागपूरातील सहाही विधान सभा मतदार संघात मूक मोर्चे, सभा

नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२३: मणिपूरच्या संदर्भात विरोधकांनी एक नॅरेटीव्ह सेट करुन ठेवला आहे,लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला असता देशासमोर संपूर्ण तथ्य विरोधकांनी मांडलेच नाही ,कारण विरोधकांकडे तथ्यच नव्हते.मणिपूरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून एका विशिष्टि समाजाला हाताशी धरुन अफूची शेती केली जाते,याच शेतीच्या माध्यमातून म्यांमार,चीन,बांग्लादेशसारखे देश अब्जाधीश झालेत,मणिपूरमध्ये भाजपची सत्ता येताच या विशिष्ट समाजाची अफूची शेती नष्ट करण्यात आली,विरोधकांनी याचे राजकारण केले व दोन समाजातील हिंसाचाराला सुरवात झाली,विशेष म्हणजे सातत्याने मणिपूरचा टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते राहूल गांधी, लोकसभेत बोलताना आपल्या ४७ मिनिटांच्या भाषणात मणिपूरवर फक्त दीड मिनिटंच बोलले,निदान पंतप्रधान मोदींवर कितीही टिका होत असली तरी आपल्या २ तास १३ मिनिटांच्या भाषणात मणिपूरवर मोदी हे दोन मिनिटे बोलले,असे समर्थन, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज एका प्रश्‍नाच्या उत्तरात, पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी मंचावर भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे,माजी नगरसेवक संजय बंगाले,जनसंपर्क प्रमुख चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.मोदींनी तरी मणिपूरवरील तथ्य देशासमोर आपल्या भाषणात का नाही मांडले?असा प्रश्‍न केला असता मोदी या विषयावर बोलले असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली. याप्रसंगी बोलताना कुलकर्णी म्हणाले,की विरोधकांनी अविश्‍वास प्रस्ताव आणला होता तर ‘रणछोडदास’ची भूमिका का स्वीकारली?इतकी चांगली संधी त्यांना मिळाली असता मणिपूरच्या संदर्भात सगळे तथ्य का नाही मांडले?देशातील फक्त मणिपूर या एकाच राज्याचं उदाहरण घ्यायचं मात्र दूसरीकडे राजस्थान,प.बंगाल इत्यादी राज्यात महिलांवर होणा-या अत्याचारांकडे दूर्लक्ष करायचं,अशी नीती स्वीकारुन विरोधक जनतेला भ्रमित करु शकत नाही.ते फक्त एकच कृती करु शकतात ते म्हणजे संसदेतून पलायन करने,अशा शब्दात कुलकर्णी यांनी विरोधकांवर बोचरी टिका केली.अध्यादेश फाडणे,डोळे मारणे,गळ्यात पडणे,फ्लाईंग किस देणे असे कृत्य करु शकतात,अशी टिका राहूल गांधीवर केली.

भारतीय जनता पक्ष हा देशभर १४ ऑगस्ट हा भारताचा फाळणीचा दिवस ‘विभाजन विभीषिका दिवस‘म्हणजे काळा दिवस म्हणून पाळणार,अशी माहिती त्यांनी दिली.१५० वर्ष पारतंत्र्यात राहील्यानंतर स्वातंत्र्याचं मोल हे फार मोठं होतं.कारण इंग्रजांनी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य देताना फक्त भारताची धर्माच्या आधारावर फाळणीच केली नाही तर ५६५ संस्थानिकांना भारत किव पाकिस्तानात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देऊन भारत एकसंघ राहू नये,अशी कुटील व्यूहरचना केली व तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी ती निमूटपणे स्वीकारली.भारत कधीही एकसंघ राहू नये,सतत लुळापांगळा देश रहावा हीच इंग्रजांची मंशा होती.

स्वातंत्र्यापूर्वी २० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट एटली यांनी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला. ३० जून १९४८ पूर्वी सत्तेचे हस्तांतरण करून देश सोडण्याचे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. मात्र, त्याआधी ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही, असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.

फाळणीमुळे आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागली. प्रत्यक्षात स्थलांतराच्या काळात प्रचंड हिंसाचार होऊन जवळपास सव्वा कोटी नागरिकांना सर्वस्व गमावून अक्षरशः रस्त्यावर यावे लागले. सुमारे ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला, तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून (आताचा बांगलादेश) घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात हा आकडा दहा लाखांहून अधिक असावा, असेही ते म्हणाले . ब्रिटिशांचे धोरण आणि तत्कालीन नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा यामुळे आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागली असल्याचा आरोप त्यांनी केला.

मात्र,स्वतंत्र भारताचे पहीले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भोपाल,त्रावणकोर,जोधपूर,हैदराबादसारख्या संस्थानिकांना आपले अधिकार कौशल्य वापरुन भारतात विलीन केले व भारत एकसंघ देश निर्मित केला.फाळणीच्या अनेक दुखद,दूर्देवी अत्याचाराच्या घटना या १४ ऑगस्टशी निगडीत आहेत,ज्यांची जाणीव नवपिढीला नाही.फाळणीच्या त्या दिवशी भारत या देशाने काय गमावले आहे,याचा इतिहास कधीही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी नव्या पिढीसमोर येऊ दिले नाही,असा आरोप कुलकर्णी यांनी या प्रसंगी केला.

फाळणीच्या त्या दिवशी भारतीय म्हणून त्या वेळी जी-जी किंमत चुकवली,त्याच्या जाणीवा,वेदनांचे स्मरण १४ ऑगस्ट रोजी करण्यात येईल.भारताच्या इतिहासात तो काळा दिवसच होता.६० लाख गैर मुस्लिमांनी एकाच दिवशी आपलं घरदार,वैभव,वाडा व माती सोडून राहत्या कपड्यानिशी पलायन केले.अत्याचार चुकवित,इभ्रत वाचवित जिथे जाग मिळेल तिथे आश्रय घेतला.

दूर्देव आहे या देशाचे तेव्हा देशाचे संधोशन केंद्रांपासून तर प्रसार माध्यम केंद्रांपर्यंत डाव्या विचारसरणीच्याच लोकांचे वर्चस्व होते ज्यांनी कधीही सत्य समोर येऊ दिले नाही.या देशात इंग्रजांनी जे-जे फूटीचं पेरलं त्याचीच ‘रि’ डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ओढली.इंग्रजांनी अगदी त्यांच्या लिखाणात ही भारत कधीही एकसंघ राष्ट्र मानला नाही.कथित धर्मनिरपेक्षवाद्यांनी तीच थेअरी चित्रपट,साहित्य,वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडली.खरी तथ्ये नव्या पिढीसमोर आलीच नाही,त्यामुळेच आम्ही काय काय गमावले,याची जाणीव नव्या पिढीला व्हावी यासाठी १४ ऑगस्ट हा काळा दिवस म्हणून पाळणार असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

कथित बुद्धीजीवी,पुरोगामी मंडळी ही पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून मद्याचे प्याले हातात घेऊन गरिबांची कणव घेताना दिसून पडतात.हाच कंपू आता मोदी यांच्या विरोधात एकत्र आला असल्याची खरमरीत टिका त्यांनी ‘इंडिया’नामक विरोधकांवर केली.जो देश आपला इतिहास विसरतो त्याचे भविष्य कधीही उज्जवल होत नाही त्यामुळेच, देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या लाखो भारतीयांच्या संघर्ष व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस, १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका (फाळणीच्या वेदना) स्मृती दिवस’ पाळण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने सोडला असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी नागपूरात १४ ऑगस्ट रोजी होणा-या कार्यक्रमांची माहिती शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली. पूर्व नागपूरात सायंकाळी ४ वाजता व्यंकटेश नगर ते नंदनवन चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येईल.पश्‍चिम नागपूरात सायं ६ वा.लक्ष्मीनगर चौक ते शंकरनगर चौक दरम्यान मूक मोर्चा काढण्यात येईल.उत्तर नागपूरात सायंकाळी ५.३० वा.कमाल चौक आवळे,बाबु चौक ते इंदाेरा चौक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मूक मोर्चा,दक्षिण नागपूर येथे सकाळी ७ वा.सक्करदरा चौक अखंड भारत दिवस,सामुहिक वंदेभारत लद्याखचे खासदार जामयांग नामग्याल यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन,दक्षिण पश्‍चिम मतदारसंघात सायं.५.३० वा.शिवाजी पुतळा ते प्रतापनगर चौक दरम्यान मूक मोर्चा,मध्य नागपूरात सकाळी ९ वा.शहीद चौक ते भारत माता चौक दरम्यान मूक मोर्चा काढण्यात येईल.

देशाचे विभाजन झाल्यामुळे झालेल्या वेदनांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच फाळणीच्या वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केले.

…………………………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या