फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश'केसीआर' नेमकी कोणाची ‘बी’टीम?वादाला उधाण

‘केसीआर’ नेमकी कोणाची ‘बी’टीम?वादाला उधाण

महाराष्ट्रात बीआरएसचा प्रवेश अन्.. केसीआरच्या सुपूत्राचे राजकीय भविष्य

नागपूर,ता.१७ जून २०२३: ‘दूरुन डोंगर साजरे’ही म्हण प्रगल्भ,सुसंस्कृत व वैचारिक महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहे.गेल्या तीन महिन्यांपासून शेजारील तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’या राजकीय पक्षाने नांदेड व औरगांबाद मार्गे आता विदर्भात प्रवेश केला आहे.नुकताच त्यांचा कार्यकर्ता मेळावा नागपूरात सुरेश भट सभागृहात पार पडला.त्यांच्या या जंगी सभेनंतर अनेक तर्क-विर्तकांना मात्र उधाण आले आहे.नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील बीआरएस ही भारतीय जनता पक्षाची ‘बी‘टीम असल्याचा आरोप केला आहे.मात्र,बीआरएसचा महाराष्ट्रातील प्रवेश हा केसीआर यांचे ४६ वर्षीय सुपूत्र पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व आयटी मंत्रालयाचे मंत्री के.टी.रामाराव यांचा राजकीय वारसा घट्ट करने व महाराष्ट्रात बिगर भाजप मतांची पोकळी आपल्याकडे ओढणे हा हेतू असल्याचे बोलले जात आहे.

याचाच अर्थ भाजपच्या मतांशिवाय महाराष्ट्रात जी १० टक्के बिगर भरवश्‍याची मतांची पोकळी आहे ती भरुन काढण्यासाठी पर्यायाने बीआरएसकडे ओढण्यासाठी महाराष्ट्रात बीआरएसचा प्रवेश झाला असल्याचा दावा बुद्धीजीवी करीत असून, शरद पवार यांनी केलेला आरोप हा याच संभाव्य शक्यतेने केला असावा,असा ही कयास आता लावला जात आहे.

महत्वाचे म्हणजे जरी शरद पवार यांनी बीआरएसला भाजपची ‘बी‘टिम संबोधले असले तरी तेलंगणात बीआरएस विरुद्ध भाजपा यांच्यात प्रंचड वैरभाव दिसून पडतो.दोन्ही पक्षाचे नेते हे एकमेकाविरुद्ध ट्टिटर वॉर छेडण्याची एक ही संधी सोडताना दिसत नाही मात्र,भाजपचा विरोध हा बीआरएसला आपलं राजकीय अस्तित्व त्या राज्यात टिकवून ठेवण्यासाठी गरजेचे आहे अन्यथा हा पक्षच संपुष्टात येईल,हे वास्तव आहे.

मूळात तेलंगणाची निर्मितीच ही भावनिक आधारावर झाली असून, भावनेच्या त्या लाटेत केसीआर यांना दोनवेळा मुख्यमंत्री होण्याची संधी ही मिळाली आहे.ज्या प्रकारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील जाणीव आहे पुढील काही निवडणूकांमध्ये फक्त त्यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर भाजप देशाची सत्ता मिळवू शकत नाही, त्याचप्रमाणे केसीआर यांना देखील हे वास्तव माहीती असल्यानेच त्यांनी त्यांच्या सुपूत्राला तेलंगणाचे ’भविष्य’ बनविण्यासाठी, पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवले,एवढंच नव्हे तर आयटी क्षेत्राशिवाय उद्योग इत्यादी महत्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली.

(छायाचित्र: केसीआर यांचे सुपूत्र व पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के.टी.रामाराव)

आता प्रश्‍न उरतो महाराष्ट्रात मग बीआरएस नेमकी कोणत्या पक्षाची मते खाणार?ढोबलमानाने हे सिद्ध झाले आहे ज्या पक्षाला ३३ टक्के मते मिळतात त्या पक्षाला बहूमताचा जादुई आकडा प्राप्त होत असतो.महाराष्ट्रात भाजपला कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान आहे.भाजप देखील आता ओबीसींचा पक्ष मानला जातो.केवळ सवर्ण मते भाजपला सत्तेच्या दारी पोहोचविण्यात असमर्थ आहे.कर्नाटकमध्ये भाजपला फक्त २३ टक्के मिळाल्याने सत्ता हातातून निसटली.

महाराष्ट्रात हे घडू नये म्हणून केसीआरच्या गुलाबी वादळाला फक्त १० टक्के मतांची बिगर भाजपची मते खेचण्यासाठी धडकवण्यात आले असल्याची चर्चा घडत आहे.ही मते काँग्रेस,राष्ट्रवादीसह,वंचित,रिपब्लिकन,मनसे इत्यादी विविध पक्षांची असू शकतात.मतांची टक्केवारीच राजकीय पक्षांचा जय-पराजय निश्‍चित करीत असते.कर्नाटकात भोवलेली चूक महाराष्ट्रात घडू नये म्हणून विरोधकांच्या मतांची बेगमी करण्यासाठी केसीआर महाराष्ट्रात राजकीय हवा निर्माण करीत असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे,ज्या पद्धतीने केसीआर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनविषयीचे विधान केले ते बघता,यावर देखील राज्यातील बुद्धीजीवी विश्‍वास ठेवायला तयार नाहीत.‘तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो’अशी ही बनवाबनवीचा हा ट्रेलर असल्याची चर्चा खासगीत झडत आहे.केसीआर यांचा आत्मविश्‍वास महाराष्ट्राच्या उपराजधानीत वाखाण्यासारखा होता.सिंहेच्या गुहेत येऊ डरकाळ्या फोडण्या मागे निश्‍चितच गुहेत आपलेच कोणी तरी आहे, याची खात्री असावी म्हणूनच उघडपणे फडणवीस यांचे नाव घेण्याचे धाडस केसीआर यांनी केले असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मतांची खूप मोठी पोकळी आहे ही बाब देशातील राजकीय विश्‍लेषक ही मान्य करतात.त्यामुळेच नांदेड,औरंगाबाद,कोल्हापूर,बिड इत्यादी या पट्ट्यात बीआरएसने आमदार उभे करण्याचा निश्‍चय केला आहे.यासाठी पक्ष वाटेल तसा पैसा खर्च करण्याची ताकत ही ठेवते.याची झलक नागपूरात देखील मिळाली.एकाच सभेसाठी कोट्यावधीची गंगा नागपूरातील नाग नदीतून प्रवाहित होऊन कार्यकर्त्यांपासुन तर ठराविक माध्यकर्मींपर्यंत पाेहोचलीसुद्धा..!

मात्र,मराष्ट्राची स्थिती ही उत्तर किवा दक्ष्ण राज्यांसारखी नाही.महाराष्ट्राला एक वैचारिक व सांस्कृतिक प्रगल्भता आहे.इथलं राजकारण इतर राज्यांप्रमाणे कधीही एकतर्फी झुकणारे नाही.इथले राजकारण तेली,कुणबी,माळी,मराठा,अनुसूचित जाती-जमातींमध्ये विभागणारे असल्यामुळे बीआरएससारख्या एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्रात येऊन मतांच्या विभाजनाचा लाभ स्वत:च्या पदरात पाडण्यात खूप कष्ट लागणार नाही,असे मत व्यक्त केले जात आहे.

याचाच अर्थ स्वत:च्या राज्यात स्वत:च्या मुलाचे राजकीय भविष्य सुरक्ष्त करने व महाराष्ट्रसारख्या राज्यात येऊन बिजनेस पॉईंट ऑफ व्यूहने राजकारण करने हे दोन्ही हेतू, केसीआर यांचे गुलाबी वादळ महाराष्ट्रात धडकण्या मागे असल्याची चर्चा आहे.

मनसेसारख्या पक्षाला मतांची पोकळी साधणारे राजकारण जमले नाही.मनसे प्रमुख यांना मुंंबईत बसून, घरातूनच राजकारण चालवायचे आहे,अशी टिका मराठी माणूसच करताना आढळतो.केजरीवाल हे तर अण्णा हजारे यांच्यासारख्या मराठी माणसाच्या पाठींब्यावर देशाच्या राजधानीत जरी स्थिरावले तरी महाराष्ट्र हे पंजाब नाही,हे त्यांना देखील चांगल्याने उमजलं आहे.

महत्वाचे म्हणजे,ज्याप्रमाणे एमआयएमला भाजपची ‘बी’टिम म्हटले जाते तोच आरोप आता बीआरएसवर केला जात आहे.एमआयएमने देश किवा राज्याचे सोडा नागपूरातच मध्य नागपूरात काँग्रेसची जवळपास आठ हजार मते खेचली व काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके याच्यासारख्या युवकाने, भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला अर्थात आमदार विकास कुंभारे यांना तगडी टक्कर अगदी शेवटपर्यंत देऊन सुद्धा मात्र फक्त पावणे तीन हजार मतांच्या फरकाने काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला अन्यथा नागपूरात सहा विधान सभा मतदारसंघापैकी काँग्रेसला उत्तर व पश्‍चिमसोबतच मध्य नागपूरात देखील विजय मिळवता आला असता.

याचाच अर्थ एमआयएमसारखे राजकीय पक्ष स्वत: चे उमेदवार निवडून आणू शकत नाही मात्र इतर पक्षाची मते खाऊन त्यांचा उमेदवार पाडण्याची ताकद निश्‍चितच ठेवीत असतात.मते खेचणे,‘वंचित’लाही याच कारणासाठी भाजपची ‘बी‘टीम संबोधिले जाते कारण याचा फायदा पर्यायाने भाजपला होतो.आता बीआरएसकडेही याच अनुषंगाने बघितले जात असून,पंतप्रधान मोदी यांनीच महाराष्ट्रात बीआरएसची ही प्रोव्हीजन करुन दिली असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ज्या तेलंगणा राज्यात बीआरएस भाजपच्या अगदी हात धूवून मागे लागलेली असते,तीच महाराष्ट्रात येताच आम्हाला कोणत्याही पक्षावर टिका करायची नसल्याचे सांगून फक्त धोरण मांडणार असल्याची वल्गना करतेय व ‘तेलंगणा पॅटर्नची’ भूरळ पाडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करत आहे,देशात एकदा ‘गुजरात पॅटर्न’चा फूगा आधीच फूटला असताना आता महारष्ट्रातील जनता या गुलाबी रंगाच्या तेलंगणा पॅटर्नला किती भूलते,हा येणारा काळच सांगू शकेल.
……………………

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या