संसद भवन आणि पाणपोईमध्ये फरक नाही का?भाजपमध्ये तर्कशक्तीचा अभाव:वल्लभ यांची टिका
देशात काँग्रेसची सत्ता आल्यास संसदेचे सेंट्रल हॉल पत्रकारांच्या प्रवेशासाठी करणार पुन्हा मुक्त
चौथ्या स्तंभाला कमकुवत करुन लोकतंत्र मजबूत होऊ शकत नाही
गडकरींचा आज वाढदिवस असल्याने त्यांना नाराज करणार नाही मात्र दररोज ३९ किलोमीटर महामार्गाच्या बांधकामाचे गौडबंगाल चांगल्याने माहिती
मोदी स्वत:च्याच खासदारांना घाबरतात म्हणून संसदीय समितीचे गठन करत नाही
‘राजदंडाचा’ लोभ त्यांना काँग्रेस ‘राजधर्म ’निभावणारा पक्ष
मोदींनी ९ वर्षांच्या कामगिरीवर द्यावे ९ प्रश्नांचे उत्तर
नागपूर,ता.२७ मे २०२३: उद्या उद् घाटित होणा-या ‘सेंट्रल व्हीस्टा’ या नव्या संसद भवनाच्या उद् घाटनावर देशातील २० राजकीय पक्षाने बहीष्कार घातला,कारण देशाच्या प्रथम नागरिक असणा-या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांना उद् घाटनाचे निमंत्रण नाही,दलित,आदिवासी महिला राष्ट्रपती तर बनल्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकतंत्राच्या मंदिराचे उद् घाटन एका दलित,आदिवासी महिलेच्या हस्ते उद् घाटित होणे मंजूर नाही,ते विद्यमान राष्ट्रपतींना या लायकीचेच समजत नाही उलट भारतीय जनता पक्षाचे नेते हे संसद भवनात अनेक्सी या नव्या इमारतीची भर पडली,त्याचे उद् घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले तेव्हा राष्ट्रपतींना आमंत्रण होतं का?असा प्रश्न उपस्थित करतात. मूळात लोकशाहीचे मंदिर असणारे संसद भवन आणि संसद भवनातील एखादी पाणपोई,वाचनालय इत्यादी यात फरक नाही का?भाजजमध्ये तर्कशक्तीचा अभाव असल्याची खरमरीत टिका, अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे,ॲड.अभिजित वंजारी,सोशल मिडीया प्रमुख विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील ९ प्रश्नांची उत्तरे मागितली.मोदी यांचे ‘नौ साल नौ सवाल’हा उपक्रम काँग्रेस पक्षातर्फे देशभरातील महत्वाच्या शहरात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून राबविला जात आहे.याच उपक्रमाच्या अंतर्गत गौरव वल्लभ हे नागपूरला आले होते.नवीन संसद भवन हे भाजपच्या मुख्यालयातील पैशांनी नाही निर्मित झाले,हे लोकतंत्राचे मंदिर जनतेच्या पैशांनी निर्मिले गेले आहे,तरी देखील देशातील २० राजकीय पक्ष या भवनाच्या उद् घाटनावर बहीष्कार घालतात,मोदी यांनी याचा विचार करावा,निदान ख-या हिंदूस्थानी नागरिकांचा तरी आवाज ऐकावा,असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
देशात महागाई आणि बेरोजगारी का वाढत आहे?सार्वजनिक मालमत्ता मोदी आपल्या मित्रांना का विकत आहे?मोदी यांच्या काळात गरीब हा आणखी गरीब झाला तर श्रीमंत हे आणखी श्रीमंत झाले असल्याची टिका करीत, २०१४ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर ४१० रुपये होते ते २०२३ मध्ये ११५० रुपये झाले आहेत!पेट्रोल ७१ रुपये प्रति लिटर असताना नागपूरात ते ११२ रुपये प्रति लिटर मिळत आहे.डिजेलचे दर ५५ रुपये प्रति लिटर असताना २०२३ मध्ये ९८ रुपये प्रति लिटर झाले आहे.खाद्य तेलाचे दर प्रति लिटर ९० रुपये असताना १४३ रुपये झाले आहे,३५ रुपये प्रति लिटर दूध असताना ५३ रुपये झाले आहे,हे सर्व दर तब्बल ५१ टक्क्यांपासून तर १६९ टक्क्यांनी वाढले आहेत.जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर हे १०० डॉलर प्रति बॅरलवरुन ७० डॉलरवर आले असताना देशात पेट्रोल,डिजेलचे दर का कमी झाले नाही?असा पहीला प्रश्न त्यांनी उपस्थित केला.देशात महांगाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठला असल्याची टिका याप्रसंगी त्यांनी केली.मोदी यावर काहीही का बोलत नाहीत.
शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट का झाले नाहीत?शेतक-यांसाठी एमएसपी कायदा का झाला नाही?कृषि संबंधित साधनसामग्रींवर जीएसटीचे ओझे लादण्यात आले असून दूसरीकडे सबसिडी ही हळूहळू का बंद करण्यात आली?
मोदी यांच्या कार्यकाळात देशात भ्रष्टाचाराने गंभीर स्वरुप धारण केले असून जनतेचा घामाचा पैसा स्टेट बँक ऑफ इंडिया व भारतीय आर्युविमा निगममधून मोठ्या प्रमाणात भागभांडवलच्या स्वरुपात खास उद्योगपती मित्रांना विशेषत:अदानींना का देण्यात आला?मोदी यावर का बोलत नाहीत?अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?
चीनसारख्या देशाने भारताची १,५०० हेक्टर भूमी बळकावळी असताना मोदी सरकार चायनासोबत १८ बैठका घेऊनसुद्धा मोदी सरकारला चायनाला आपल्या भूमीतून हूसकावून लावण्यात यश का आले नाही?चीनला अद्दल शिकवू म्हणा-या मोदी यांनी उलट चायनाला क्लिन चिट कशी दिली?
निवडणूकीत राजकीय फायदासाठी देशातील सोहाद्रपूर्ण वातावरण बिघडवण्याचं काम केले जात असून ,समाजात भितीचे वातावरण का तयार केले जात आहे,याबद्दल पंतप्रधानांनी सांगावे.जो खासदार ‘गोली मारो…’ची भाषा बोलतो त्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट पद देऊन देशाचा कायदा मंत्री बनवण्यात आले.२०१४ पासून महिला,दलित,अल्पसंख्यांकावरील अत्याचारामध्ये ३३ टक्के वृद्धी झाली,महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण २०१३ मध्ये ३ लाख होते ते आता ४ लाख २० हजार एवढे झाले असून हा डेटा स्वत:भारत सरकारचा आहे.याबाबत मोदी का काहीच बोलत नाहीत?देशात महिला,दलित,अल्पसंख्यांवरील अत्याचारावर पंतप्रधान काहीच का बोलत नाही?जातीनिहाय जनगणनेवर मोदी मूग गिळून का गप्प बसले आहेत?
बिगर भाजपची सरकार असलेल्या राज्यात ऐनकेन प्रकरणे निवडून आलेली सरकारे मोदी का पाडत आहेत?महाराष्ट्रात काय घडले?
ईडीची कारवाई फक्त बिगर भाजपच्याच राजकारण्यांवर का होते?देशभरात भाजपच्या एकाही आमदार किवा खासदारावर ईडीची कारवाई का होत नाही?महाराष्ट्रात तर पाटील नावाच्या भाजपच्या आमदारानेच खूलेआम जाहीर केले की,ते भाजपमध्ये असल्याने त्यांच्यावर ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स विभागाची कारवाई होणार नाही,हे भारतीय संविधानासोबत खिलवाड नाही का?
ज्या संसदेत मनरेगा योजनेविषयी ताळ्या वाजवून वाजवून मोदी यांनी खिल्ली उडवली त्याच मनरेगाने कोविड’-१९ च्या जागतिक त्रासदीच्या वेळेस देशातील किती कोटी गरिबांना जगण्याचा अाधार दिला?त्याच मनरेगासारख्या योजनेला जाणीवपूर्वक आता डबघाईस का आणले जात आहे?
करोनाच्या त्रासदीत देशात ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी सांगितली जाते,त्यांना अद्यापही जाहीर केलेला ५० हजार रुपयांचा मदत निधी का मिळू शकला नाही?मोदी यांनी अचानक लॉक डाऊन घोषित करुन देशातील लाखो मजूरांना २००-३०० किलोमीटर चालत आपल्या राज्यात परत जाण्यास बाध्य केले.सूटकेसवर आपल्या मूलांना बसवून एक आई शेकडो किलोमीटर सूटकेस ओढत असल्याचे दृष्य संपूर्ण देशाने बघितले आहे,मोदी या विषयी काही का बोलत नाही?
घटनात्मक आणि लोकशाही संस्थांचे अधिकार का कमी केले जात आहेत?विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि सरकारांना का टार्गेट केले जात आहे?
मोदी यांनी आपली चुप्पी तोडावी आणि आमच्या ९ प्रश्नांची उत्तरे द्यावी,असे आव्हान याप्रसंगी गौरव वल्लभ यांनी केले.पंडित नेहरु नेहमी म्हणत असत,तुम्हाला चांगले वाटो अथवा वाईट,तथ्य हे तथ्यच राहतात.मोदी यांना नागपूरशी जरा जास्तच प्रेम आहे कारण संघभूमी येथेच आहे त्यामुळे ते आमचं नक्कीच ऐकतील व आमच्या ९ प्रश्नांची उत्तरे देतील,असा टोला त्यांनी हाणला.
सध्या देशात राजदंडाविषयीची खोटी महती सर्वदूर पसरवली जात आहे,हा राजदंड उद्या होणा-या नवीन संसद भवनाच्या उद् घाटन सोहळ्यात रितसर संसद भवनाची शोभा बनणार आहे मात्र त्या मागील भाजप सांगत असलेला इतिहास कपोलकल्पीत आहे. काँग्रेस मात्र ‘राजदंडाची’ नव्हे तर ‘राजधर्माची’ गोष्ट करते.माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनीसुद्धा गुजरात दंगलीनंतर मोदी यांना ‘राजधर्माचे पालन करा’असे सूचित केले होते,अशी आठवण याप्रसंगी गौरव वल्लभ यांनी करुन दिली.
२०१४ पूर्वी देशाच्या संसदेत सेंट्रल हॉलमध्ये देशभरातील पत्रकारांना मुक्त प्रवेश होता.मोदी यांच्या कारकीर्दीत मात्र पत्रकारांसाठी प्रवेश बंद करण्यात आला,काँग्रेसची सत्ता आल्यास पुन्हा पत्रकारांना संसदेत मुक्त प्रवेश मिळणार का?या प्रश्नावर बोलताना,पत्रकारिता हा तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.मी एक लहानसा कार्यकर्ता असूनसुद्धा तुमचे तीक्ष्ण प्रश्न स्वीकारत आहोत,असे म्हणत, हीच जर भाजपची पत्रकार परिषद असती तर त्यात फक्त ‘दोघेच’(मोदी आणि शहा)दिसले असते आणि पत्रकार परिषदेत प्रवेश करण्यापूर्वीच तुमची ‘संघ आयू’ची विचारणा झाली असती,असा टोला त्यांनी हाणला.मोदी यांनी निदान पत्रकारांच्या तरी ‘मन की बात‘ऐकावी व त्यांना प्रवेश मुक्त करावा,असा टोला त्यांनी हाणला.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग मंत्री म्हणून दररोज ३९ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा रेकॉर्ड बनवला आहे,याकडे वल्लभ यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या,आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे मी त्यांना किमान आज नाराज नाही करु शकत मात्र त्यांनी महामार्ग बांधण्याचा रेकॉर्ड कसा बनवला यामागील गौडबंगाल आम्हाला माहिती असल्याचा टोला त्यांनी हाणला.दोन लेनच्या महामार्गाला चार लेनचे बनवणे,चार लेनच्या महामार्गाचे किलोमीटर दुप्पट करने आणि त्यांना ३९ किलोमीटर घोषित करने,याविषयी अधिक बोललो असतो मात्र आज त्यांचा वाढदिवस असल्याने बोलणार नाही,असे सांगून त्यांनी विषय टाळला.
एका प्रश्नाच्या उत्तरात,मोदी हे विरोधकांच्या कोणत्याही मागणीवर संसदेची संयुक्त समिती स्थापित करत नाही कारण,ते स्वत: त्यांच्या खासदारांना घाबरतात,असा आरोप करीत त्यांचे अनेक खासदारच त्यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराज असून, मोदी याच भीतीने समितीच(जेपीसी)स्थापित करीत नसल्याचा दावा त्यांनी केला.
…………….